< Ceturtā Mozus 10 >

1 Un Tas Kungs runāja uz Mozu un sacīja:
परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2 Taisi sev divas trumetes(taures), no sudraba tev tās būs izkalt, un tās lai ir priekš draudzes sasaukšanas un priekš lēģera pacelšanas.
चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा.
3 Kad ar viņām abām pūtīs, tad visai draudzei pie tevis būs sapulcēties priekš saiešanas telts durvīm,
सर्व मंडळीला दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र बोलविण्यासाठी याजकाने कर्णे वाजवावे.
4 Bet ja ar vienu vien pūtīs, tad tiem lieliem kungiem, tiem virsniekiem pār Israēla tūkstošiem pie tevis būs sapulcēties.
जर याजकाने एकच कर्णा वाजविला तर मग अधिकाऱ्यांनी, इस्राएलांच्या वंशाच्या अधिपतीनी तुझ्याकडे जमावे.
5 Kad jūs ar varenu skaņu pūšat, tad tiem lēģeriem būs celties, kas pret rītiem apmetušies.
जेव्हा तू कर्णा मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे पूर्वेकडील छावण्यांनी त्यांचा प्रवासास सुरवात करावी.
6 Bet kad jūs ar varenu skaņu otrā kārtā pūšat, tad tiem lēģeriem būs celties, kas pret dienas vidiem apmetušies; ar varenu skaņu būs pūst, kad viņiem jāceļas.
जेव्हा दुसऱ्या वेळी मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे तेव्हा दक्षिणेकडील छावण्यांनी प्रवासास सुरवात करावी; त्यांच्या प्रवासासाठी मोठ्याने फुंकून इशारा द्यावा.
7 Bet to draudzi sapulcinājot jums būs pūst, tomēr ne ar varenu skaņu.
जेव्हा मंडळीला एकत्र जमावावयाचे असेल तेव्हा कर्णा फुंका, पण मोठ्याने फुंकू नये.
8 Un Ārona dēliem, tiem priesteriem, būs tās trumetes pūst, un tas lai jums ir par likumu mūžīgi pie jūsu pēcnākamiem.
अहरोनाचे मुले, याजक, यांनीच कर्णे वाजवावीत. हा तुमच्या लोकांस पिढ्यानपिढ्याचा कायमचा नियम आहे.
9 Un kad jūs savā zemē iesiet karā pret saviem ienaidniekiem, kas jūs spiež, tad jums būs pūst ar varenu skaņu; tad Tas Kungs, jūsu Dievs, jūs pieminēs, un jūs tapsiet izglābti no saviem ienaidniekiem.
तुम्ही जेव्हा तुमच्या देशात तुम्हावर जुलूम करणाऱ्या शत्रूविरूद्ध लढायला जाता, मग तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. मी, परमेश्वर, तुमचा देव तुमची आठवण करीन आणि तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.
10 Un savā līksmības laikā un savos svētkos un savos jaunos mēnešos jums arīdzan trumetes būs pūst, pie saviem dedzināmiem upuriem un pie saviem pateicības upuriem, lai jūsu Dievs jūs piemin. Es esmu Tas Kungs, jūsu Dievs.
१०तसेच तुम्ही आनंदाच्या प्रसंगी, तुमचे दोन्ही नियमीत सण व महिन्याच्या सुरवातीच्या दिवशी तुमची होमार्पणाच्या, शांत्यर्पणाच्या यज्ञांच्या सन्मानासाठी तुम्ही कर्णे वाजवावेत. तुमच्या परमेश्वरास तुमची आठवण करून देण्याची ही एक कृती आहे. हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.
11 Un notikās otrā gadā, otrā mēnesī, divdesmitā mēneša dienā, ka tās padebesis pacēlās no tā liecības dzīvokļa.
११दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या महिन्यात, महिन्याच्या विसाव्या दिवशी, साक्षपटाच्या निवासमंडपापासून ढग वर घेतला गेला.
12 Un Israēla bērni cēlās pēc saviem pulkiem no Sinaī tuksneša, un tas padebesis nolaidās Pārana tuksnesī.
१२तेव्हा इस्राएल लोक सीनाय रानातून आपल्या प्रवासास निघाले. ढग पारानाच्या रानात थांबला.
13 Tā tie pirmoreiz cēlās pēc Tā Kunga vārda caur Mozu.
१३परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हा पहिला प्रवास केला.
14 Pa priekšu cēlās Jūda bērnu lēģera karogs, pēc saviem pulkiem, un pār viņa pulku bija Nahšons, Aminadaba dēls,
१४पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीच्या निशाणाखालील त्यांच्या वैयक्तिक सैन्यासह बाहेर निघाले. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन यहूदाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
15 Un pār Īsašara bērnu cilts pulku bija Netaneēls, Cuara dēls,
१५सुवाराचा मुलगा नथनेल इस्साखार वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
16 Un pār Zebulona bērnu cilts pulku bija Eliabs, Helona dēls.
१६हेलोनाचा मुलगा अलीयाब जबुलून वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
17 Un tas dzīvoklis tapa nocelts, un Geršona bērni un Merarus bērni cēlās un nesa to dzīvokli.
१७गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली.
18 Pēc tam cēlās Rūbena lēģera karogs pēc saviem pulkiem, un pār viņa pulku bija Elicurs, Šedeūra dēls.
१८त्यानंतर, रऊबेनाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी त्यांच्या प्रवासास सुरवात केली. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
19 Un pār Sīmeana bērnu cilts pulku bija Šelumiēls, Curi-Šadaja dēls.
१९सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल शिमोन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
20 Un pār Gada bērnu cilts pulku bija Eliazavs, Deguēļa dēls.
२०रगुवेलाचा मुलगा एल्यासाप गाद वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
21 Tad Kehāta bērni cēlās un nesa tās svētuma lietas, un tas dzīvoklis tika uzcelts, kamēr šie atnāca.
२१कहाथींनी प्रवासास सुरवात केली. ते पवित्रस्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते पुढच्या तळावर जाऊन पोहोचेपर्यंत अगोदरच्या इतरांनी पवित्र निवासमंडप उभा करून तयार ठेवला होता.
22 Un pēc tam cēlās Efraīma bērnu lēģera karogs pēc saviem pulkiem, un pār viņa pulku bija Elišamus, Amiuda dēls.
२२त्यानंतर एफ्राइम वंशाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी प्रवासास सुरवात केली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
23 Un pār Manasus bērnu cilts pulku bija Gamaliēls, Pedacura dēls.
२३पदाहसुराचा मुलगा गमलीयेल मनश्शे वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
24 Un pār Benjamina bērnu cilts pulku bija Abidans, Gideona dēls.
२४गिदोनीचा मुलगा अबीदान बन्यामीन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
25 Tad cēlās Dana bērnu lēģera karogs visu lēģeru beidzamā galā pēc saviem pulkiem, un pār viņa pulku bija Ahiēzars, Ami-Šadaja dēls.
२५दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै चा मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
26 Un pār Ašera bērnu cilts pulku bija Paģiēls, Okrana dēls.
२६आक्रानाचा मुलगा पगीयेल आशेर वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
27 Un pār Naftalus bērnu cilts pulku bija Ahirus, Enana dēls.
२७एनानाचा मुलगा अहीरा नफताली वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
28 Tā Israēla bērni cēlās pēc saviem pulkiem.
२८ह्याप्रकारे इस्राएल लोकांचे सैन्य त्यांच्या प्रवासास सुरवात करीत.
29 Un Mozus sacīja uz Hobabu, Reguēļa, tā Midijanieša, dēlu, Mozus sievas brāli: mēs ejam uz to vietu, par ko Tas Kungs ir sacījis: “To Es jums došu.” Nāc līdz ar mums, mēs tev gribam labu darīt, jo Tas Kungs Israēlim labumu apsolījis.
२९मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याच्याशी बोलला. रगुवेल मोशेच्या पत्नीचा पिता होता. मोशे होबेबाशी बोलला व म्हणाला, “परमेश्वराने वर्णन केलेल्या देशात आम्ही जात आहोत. तो देश देण्याचे परमेश्वराने आम्हास वचन दिले आहे. तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुझे चांगले करू. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी चांगले करण्याचे वचन दिले आहे.”
30 Bet viņš sacīja: es neiešu, bet es gribu iet uz savu zemi un pie saviem radiem.
३०परंतु होबाबाने उत्तर दिले “मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी माझ्या देशात व माझ्या स्वतःच्या लोकात जाईल.”
31 Bet tas viņam sacīja: neatstājies no mums, jo tāpēc ka tu zini, kur mums tuksnesī jāapmetas, tad tev būs mums būt par aci.
३१मग मोशेने त्यास उत्तर दिले, “कृपा करून तू आम्हास सोडून जाऊ नको. तुला रानात कसा तळ द्यायचा हे माहित आहे. तू आमचा वाटाड्या हो.
32 Un notiks, ja tu mums iesi līdz un mums nāks tas labums, ko Tas Kungs mums darīs, tad mēs tev arīdzan gribam labu darīt.
३२तू जर आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर जे काही आमचे चांगले करील तेच आम्ही तुझे करू.”
33 Un tie cēlās no Tā Kunga kalna treju dienu gājumu, un Tā Kunga derības šķirsts viņiem gāja priekšā treju dienu gājumu, viņiem rādīt dusamu vietu.
३३परमेश्वराच्या पर्वतापासून तीन दिवसाचा प्रवास करीत गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्यासाठी जागा शोधायला तीन दिवसाच्या वाटेवर त्यांच्यापुढे गेला.
34 Un Tā Kunga padebesis bija pār viņiem dienas laikā, kad tie no lēģera cēlās.
३४जसा ते प्रवास करत होते तसा परमेश्वराचा ढग दिवसरात्र त्यांच्यावर होता.
35 Un notikās, kad tas šķirsts cēlās, tad Mozus sacīja: celies, Kungs, lai Tavi ienaidnieki top izkaisīti un Tavi nīdētāji lai bēg priekš Tava vaiga.
३५जेव्हा कराराचा कोश प्रवासास निघत तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची पांगापांग कर, जे तुझा द्वेष करतात ते तुझ्यापासून पळून जावोत.”
36 Un kad tas dusēja, tad viņš sacīja: atgriezies, Kungs, pie Israēla pulku tūkstošiem.
३६जेव्हा कराराचा कोश थांबत असे, तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”

< Ceturtā Mozus 10 >