< Lūkas Evaņg̒elijs 16 >
1 Un Viņš sacīja arī uz Saviem mācekļiem: “Kādam bagātam vīram bija nama turētājs, un tas viņa priekšā tapa apsūdzēts, ka viņa mantu esot izšķērdējis.
१येशूने त्याच्या शिष्यांना एक दाखला सांगितला, “कोणीएक श्रीमंत मनुष्य असून, त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो, अशी तक्रार त्या श्रीमंत मनुष्याकडे करण्यात आली.
2 Un to aicinājis, viņš uz to sacīja: kā es to dzirdu par tevi? Atbildi par savu nama turēšanu; jo tu joprojām nevari būt nama valdītājs.
२म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकत आहे? तर आता तुझ्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहावयचा नाही.
3 Bet tas nama turētājs runāja pats pie sevis: ko nu darīšu? Mans kungs man atņem nama valdīšanu. Rakt nespēju, diedelēt kaunos.
३तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत तर मी आता काय करू? शेतात कष्ट करण्याएवढे बळ माझ्या अंगात नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते.
4 Es zinu, ko darīšu, kad no amata topu nocelts, lai tie mani uzņem savos namos.
४मला कारभाऱ्याच्या कामावरून ते काढून टाकतील तरीही लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे यासाठी मी काय करावे हे मला माहिती आहे.
5 Un saaicinājis visus sava kunga parādniekus, viņš sacīja uz to pirmo: cik tu manam kungam esi parādā?
५मग कारभाऱ्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, तू माझ्या मालकाकडून किती कर्ज घेतले आहे जे तुला फेडायचे आहे.
6 Un tas sacīja: simts mucu eļļas. Un viņš uz to sacīja: ņem savu grāmatu, sēdies un raksti tūdaļ piecdesmit.
६तो म्हणाला, तीन हजार लिटर तेल. त्याने त्यास म्हटले, ही तुझी हिशोबाची वही घे आणि लवकर बसून यावर दीड हजार मांड
7 Tad viņš uz to otru sacīja: bet tu, cik tu esi parādā? Un tas sacīja: simts mēru kviešu. Un viņš uz to sacīja: ņem savu grāmatu un raksti astoņdesmit.
७नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, वीस हजार किलो गहू तो त्यास म्हणाला, ही तुझी हिशोबाची वही घे व सोळा हजार मांड.
8 Un Tas Kungs uzteica to netaisno nama turētāju, ka tas gudri bija darījis; jo šīs pasaules bērni ir gudrāki savā kārtā nekā tie gaismas bērni. (aiōn )
८अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरुन धन्याने त्याची वाहवा केली; कारण या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. (aiōn )
9 Un Es jums saku: dariet sev draugus no tās netaisnās mantas, ka tie, kad jums nu pietrūkst, jūs uzņem tais mūžīgos dzīvokļos. (aiōnios )
९मी तुम्हास सांगतो, तुमच्यासाठी, तुमच्या अनीतीच्या धनाने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा हे धन संपेल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे (aiōnios )
10 Kas vismazākā lietā ir uzticīgs, tas arīdzan lielākā ir uzticīgs; bet kas vismazākā ir netaisns, tas arī lielākā ir netaisns.
१०एखाद्यावर थोडासा विश्वास टाकणे शक्य असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास टाकणे शक्य आहे व जो कोणी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी आहे तो जास्त गोष्टींविषयी अन्यायी राहील.
11 Ja tad jūs pie netaisnās mantas neesat uzticīgi, kas jums uzticēs patieso?
११म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या धनाविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील?
12 Un kad jūs iekš svešas lietas neesat uzticīgi, kas jums dos jūsu pašu?
१२जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हास कोण देईल?
13 Neviens kalps nevar kalpot diviem kungiem; jo tas vienu ienīdēs un otru mīlēs, jeb vienam pieķersies un otru atmetīs. Jūs nevarat kalpot Dievam un mantai.”
१३कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो राग करील व दुसऱ्यावर तो प्रीती करील किंवा एकाला तो धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही.”
14 Bet šo visu arī tie farizeji dzirdēja, kas mantu mīlēja, un tie Viņu apsmēja.
१४मग ते परूशी धनाचे लोभी होते त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी येशूचा तिरस्कार केला.
15 Un Viņš uz tiem sacīja: “Jūs esat tie, kas paši taisnojās cilvēku priekšā, bet Dievs pazīst jūsu sirdis; jo kas cilvēku starpā ir augsts, tas ir negantība Dieva priekšā.
१५येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. जे लोकांस त्यांच्या दृष्टीत महान वाटते ते देवाच्या नजरेमध्ये अमंगळ आहे.
16 Bauslība un pravieši ir līdz Jānim; no tā laika Dieva valstības evaņģēlijs top sludināts, un ikkatrs ar varu laužās tur iekšā.
१६योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे हे होते आणि तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवली जात आहे व प्रत्येकजण त्यामध्ये शिरण्याचा जोराने प्रयत्न करीत आहे.
17 Vieglāki ir, ka debess un zeme zūd, nekā no bauslības viena rakstu zīmīte zustu.
१७नियमशास्त्राचा एकही काना किंवा मात्रा नाहीसा होण्यापेक्षा आकाश व पृथ्वीचे नाहीसे होणे सोपे आहे.
18 Ikviens, kas no savas sievas šķirās un precē citu, tas pārkāpj laulību, un ikviens, kas vienu no vīra atšķirtu precē, tas pārkāpj laulību.
१८जो कोणी आपल्या पत्नीला सोडून देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी, पतीने सोडून दिलेल्या स्त्री सोबत लग्न करतो तो व्यभिचार करतो.
19 Kāds bagāts vīrs bija, tas ģērbās ar purpuru un dārgu audekli, un dzīvoja ikdienas kārumā un līksmībā.
१९कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे.
20 Bet arī kāds nabags bija, vārdā Lāzarus, tas gulēja priekš viņa durvīm, pilns ar vātīm,
२०त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोड आलेले होते.
21 Un gribēja paēst no tām druskām, kas krita no tā bagātā galda. Bet tikai suņi nāca un laizīja viņa vātis.
२१त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करत असे याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.
22 Bet gadījās, ka tas nabags nomira un no eņģeļiem tapa aiznests Ābrahāma klēpī, un tas bagātais arīdzan nomira un tapa aprakts.
२२मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्यास अब्राहामाच्या ऊराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्यास पुरले गेले.
23 Kad tas nu bija ellē un mokās, tad tas pacēla savas acis un redzēja Ābrahāmu no tālienes un Lāzaru viņa klēpī, (Hadēs )
२३श्रीमंत मनुष्य मृतलोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले, (Hadēs )
24 Un sauca un sacīja: tēvs Ābrahām, apžēlojies par mani un sūti Lāzaru, lai tas savu pirksta galu iemērc ūdenī un dzisina manu mēli, jo es ciešu lielas mokas šinīs uguns liesmās.
२४तो ओरडून म्हणाला, हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुखः सहन करीत आहे.
25 Bet Ābrahāms atbildēja: piemini, dēls, ka tu savu labumu esi dabūjis savā dzīvības laikā, un Lāzarus turpretī ļaunumu, bet tagad šis top iepriecināts, bet tu topi mocīts.
२५परंतु अब्राहाम म्हणाला, माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता त्यास आराम मिळत आहे व तू दुःखात आहेस.
26 Un turklāt starp jums un mums ir liela starpa, ka tie, kas no šejienes gribētu noiet pie jums, nevar; nedz arī no turienes pārnākt pie mums.
२६आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही.
27 Un viņš sacīja: tad es tevi lūdzu, tēvs, sūti viņu uz mana tēva namu.
२७तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग तुला मी विनंती करतो की, पित्या, लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव,
28 Jo man vēl pieci brāļi; lai viņš tos pamāca, ka tie arīdzan nenāk šinī moku vietā.
२८लाजराला माझ्या पाच भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत.
29 Ābrāms uz to sacīja: tiem ir Mozus un pravieši, lai tie tos klausa.
२९पण अब्राहाम म्हणाला, तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.
30 Bet tas sacīja: Nē, tēvs Ābrahām, bet kad viens no mirušiem pie tiem ietu, tad tie atgrieztos no grēkiem.
३०तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही, हे पित्या अब्राहामा, मरण पावलेल्यामधून कोणी माझ्या भावांकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.
31 Tad viņš uz to sacīja: kad tie neklausa Mozu un praviešus, tad tie arī neticēs, kaut ir kāds no miroņiem augšāmceltos.”
३१अब्राहाम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.”