< Jeremijas 35 >
1 Šis ir tas vārds, kas notika uz Jeremiju no Tā Kunga, Jojaķima, Josijas dēla, Jūda ķēniņa, dienās sacīdams:
१यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या दिवसात यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले ते हे आहे. ते म्हणाले,
2 Noej pie Rekabiešiem un runā ar tiem un ved tos Tā Kunga namā, vienā no tiem kambariem, un dod tiem vīnu dzert.
२“रेखाब्याच्या घराण्याकडे जा आणि त्यांच्याशी बोल. मग त्यांना माझ्या घरातील एका खोलीत आण आणि त्यांना पिण्यास मद्य दे.”
3 Tad es ņēmu Jaazaniju, Jeremijas dēlu, Habacinijas dēla dēlu, līdz ar viņa brāļiem un visiem viņa dēliem un visu Rekabiešu namu,
३म्हणून मी हबसिन्याचा मुलगा यिर्मया याचा मुलगा याजना आणि त्याच्या भावांना व सर्व मुलांना आणि रेखाब्याच्या सर्व घराण्याला घेतले.
4 Un tos vedu Tā Kunga namā Jegdalijas dēla, Dieva vīra Anana dēlu kambarī, kas ir sānis lielkungu kambarim, virs durvju sarga Mazejas, Šaluma dēla, kambara.
४मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात, देवाचा मनुष्य इग्दल्याचा मुलगा हानान याच्या खोलीत आणले. या खोल्या शल्लुमाचा मुलगा मासेया द्वारपाल, याच्या बाजूच्या खोलीच्या वर असलेल्या नेत्यांची होती.
5 Un Rekabiešu nama bērniem es cēlu priekšā kausus pilnus ar vīnu un biķerus un uz tiem sacīju: dzeriet vīnu!
५नंतर मी रेखाब्यांसमोर द्राक्षरसाने भरलेले कटोरे व पेले ठेवले आणि त्यांना म्हणालो, “थोडा द्राक्षरस प्या.”
6 Bet tie sacīja: mēs nedzeram vīna, jo Jonadabs, Rekaba dēls, mūsu tēvs, mums pavēlējis un sacījis: jums nebūs vīna dzert, ne jums, ne jūsu bērniem ne mūžam.
६पण ते म्हणाले, “आम्ही द्राक्षरस पिणार नाही, कारण आमचे पूर्वज, रेखाब यांचा मुलगा योनादाब, यांने आम्हास आज्ञा दिली, ‘तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी सर्वकाळपर्यंत कोणताही द्राक्षरस पिऊ नये.’
7 Un namus jums nebūs taisīt nedz sēklu sēt nedz vīna dārzus dēstīt nedz turēt, bet jums būs teltīs dzīvot visu savu mūžu, ka ilgi dzīvojat tai zemē, kur jūs piemītat.
७शिवाय कोणतेही घरे बांधू नका, कोणतेही बी पेरु नका, किंवा कोणतेही द्राक्षमळे लावू नका. हे तुमच्यासाठी नाहीत. तर तुम्ही आपल्या सर्व दिवसात तंबूत राहिले पाहिजे, याकरीता ज्या देशात तुम्ही परदेशी आहात त्यामध्ये दीर्घकाळ जगावे.
8 Tad mēs Jonadaba, Rekaba dēla, sava tēva, balsij esam klausījuši visās lietās, ko viņš mums pavēlējis, tā ka mēs vīna savu mūžu nedzeram, ne mēs, ne mūsu sievas, ne mūsu dēli, ne mūsu meitas,
८आमचा पूर्वज रेखाब याचा मुलगा योनादाब याची वाणी आम्ही पाळत आलो आहोत, त्यामध्ये आम्ही आमच्या स्त्रिया, आमची मुले, आणि आमच्या मुलींनी आपल्या सर्व दिवसात द्राक्षरस पिऊ नये अशी आज्ञा त्याने आम्हास दिली आहे.
9 Un ka mēs namus neuztaisam sev par mājokli, arī vīna dārzu mums nav, ne tīruma, ne sējuma;
९आणि आम्ही त्यामध्ये राहण्यासाठी कधीही घरे बांधीत नाही आणि तेथे आमच्या स्वत: च्या मालकीची शेते व द्राक्षमळे नाहीत.
10 Bet mēs mītam teltīs, un klausam un darām visu, ko mums mūsu tēvs Jonadabs pavēlējis.
१०आम्ही तंबूत राहतो आणि ऐकतो व आमचा पूर्वज योनादाब यांने आम्हास सर्व आज्ञापिल्याप्रमाणे वागत आलो.
11 Bet notikās, kad NebukadNecars, Bābeles ķēniņš, pret šo zemi cēlās, tad mēs sacījām: nāciet, iesim uz Jeruzālemi no Kaldeju kara spēka un no Sīriešu spēka; tā mēs esam apmetušies Jeruzālemē.
११पण जेव्हा बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने देशावर हल्ला केल्यावर, आम्ही म्हणालो, खास्द्यांच्या व अराम्यांच्या सैन्यापासून आपण यरूशलेमेला निसटून जाऊ. म्हणून आम्ही यरूशलेमेमध्ये राहत आहोत.”
12 Tad Tā Kunga vārds notika uz Jeremiju sacīdams:
१२मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
13 Tā saka Tas Kungs Cebaot Israēla Dievs: ej un saki Jūda vīriem un Jeruzālemes iedzīvotājiem: Vai negribat mācību pieņemt un klausīt Maniem Vārdiem? saka Tas Kungs.
१३सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, “जा आणि यहूदातील मनुष्यांना व यरूशलेमेच्या रहीवाश्यांना सांग, तुम्ही माझी वचने ऐकूण आणि ती शासन स्विकारणार नाही का?” असे परमेश्वर म्हणतो.
14 Jonadaba, Nekaba dēla, vārdi tiek pastāvīgi turēti, kas saviem bērniem aizliedzis vīnu dzert, un tie līdz šai dienai nav dzēruši, bet klausījuši sava tēva pavēlei. Bet Es uz jums esmu runājis vienmēr vienā runāšanā, un jūs Man neesat klausījuši.
१४रेखाबाचा मुलगा योनादाब याने आपल्या मुलांना कोणताही द्राक्षरस पिऊ नका अशी आज्ञा दिली त्यांनी त्याचा शब्द आजपर्यंत पाळला. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या आज्ञेचे पालन केले. पण मी स्वत: तुम्हास पुन्हा पुन्हा सांगत आलो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही.
15 Un Es pie jums esmu sūtījis bez mitas vienā sūtīšanā visus Savus kalpus, tos praviešus, un sacījis: atgriežaties jel ikviens no sava niknā ceļa un dariet labus darbus un nedzenaties citiem dieviem pakaļ, tiem kalpot, tad jūs paliksiet tai zemē, ko esmu devis jums un jūsu tēviem. Bet jūs savas ausis neesat atgriezuši nedz Mani klausījuši.
१५इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही.
16 Jonadaba, Rekaba dēla, bērni pastāvīgi ir turējuši sava tēva pavēli, ko viņš pavēlējis, bet šie ļaudis Man neklausa.
१६कारण रेखाबाचा मुलगा योनादाबाच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेल्या आज्ञा पाळल्या, पण या लोकांनी माझे ऐकण्याचे नाकारले.
17 Tādēļ, tā saka Tas Kungs, tas Dievs Cebaot, Israēla Dievs: redzi, Es vedīšu pār Jūdu un pār visiem Jeruzālemes iedzīvotājiem visu ļaunumu, ko Es pret tiem esmu runājis, tādēļ ka Es uz tiem esmu runājis, bet tie nav klausījuši, Es tos esmu aicinājis, bet tie nav atbildējuši.
१७म्हणून परमेश्वर, सैन्यांचा देव आणि इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “पाहा, जे सर्व अरिष्ट मी त्यांच्याविरुद्ध आणणार म्हणून मी म्हणालो आहे, ते सर्व मी यहूदावर आणि यरूशलेमेच्या राहणाऱ्यांवर आणीन, कारण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी उत्तर दिले नाही.”
18 Un uz Rekabiešu namu Jeremija sacīja: tā saka Tas Kungs Cebaot, Israēla Dievs: tādēļ ka jūs esat klausījuši Jonadaba, sava tēva, likumam un sargājuši visas viņa pavēles un darījuši visu, ko viņš jums bija pavēlējis,
१८यिर्मया रेखाबाच्या कुटुंबियांना म्हणाला, “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपला पूर्वज योनादाब ह्यांच्या आज्ञा ऐकल्या आणि त्या सर्व पाळल्या. जे त्याने करण्यास आज्ञापिले त्याप्रमाणे तुम्ही केले आहे.
19 Tādēļ tā saka Tas Kungs Cebaot, Israēla Dievs: Jonadabam, Rekaba dēlam, ne mūžam netrūks vīra, kas stavēs Manā priekšā.
१९म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, रेखाबाचा मुलगा योनादाब याच्या वंशजांपैकी कोणीतरी एक नेहमीच माझ्या सेवेत राहील.”