< Jeremijas 33 >
1 Un Tā Kunga vārds notika uz Jeremiju otru reizi, kad viņš vēl bija ieslēgts cietuma pagalmā, sacīdams:
१नंतर यिर्मया पहारेकऱ्यांच्या अंगणात अजूनही बंदीस्त असता त्याच्याकडे दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,
2 Tā saka Tas Kungs, kas to dara, Tas Kungs, kas to izdara, lai tas notiek - Kungs ir viņa vārds -
२परमेश्वर जो हे करतो, परमेश्वर जो हे स्थापित करण्यासाठी योजितो, परमेश्वर हे त्याचे नाव आहे, तो असे म्हणतो,
3 Piesauc Mani, tad Es tev atbildēšu un tev darīšu zināmas lielas un brīnišķas lietas, ko tu nezini.
३मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन.
4 Jo tā saka Tas Kungs, Israēla Dievs, par šīs pilsētas namiem un par Jūda ķēniņa namiem, kas tiek nolauzīti vaļņu un zobena priekšā,
४कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, नगराची घरे व यहूदाच्या राजाची घरे वेढ्याच्या उतरंडीमुळे व तलवारीमुळे पडले आहे याविषयी म्हणत आहे.
5 Par tiem, kas nāk karot pret Kaldejiem, lai tos (namus) pilda ar miroņu miesām, ko Es nokauju Savā bardzībā un Savā dusmībā, un tādēļ ka Es Savu vaigu no šīs pilsētas esmu apslēpis, visa viņu ļaunuma dēļ:
५खास्दी लढाईस येत असताना ज्या लोकांस मी आपल्या क्रोधाने आणि कोपाने ठार केले तेव्हा त्यांच्या सर्व दुष्टतेमुळे मी आपले मुख या नगरापासून लपविले आहे त्यांच्या मृतदेहाने जी घरे भरली.
6 Redzi, Es to sasiešu un dziedināšu, un tos darīšu veselus, un tiem parādīšu pilnīgu un pastāvīgu laimi.
६पण पाहा, मी या नगराला आरोग्य आणि उपचार आणून देईन. कारण मी त्यांना बरे करीन आणि शांतीची व सत्यतेची विपुलता त्यांना देईन.
7 Un Es vedīšu atpakaļ Jūda cietumniekus un Israēla cietumniekus, un tos uztaisīšu tā kā papriekš.
७कारण मी यहूदी आणि इस्राएल यांचे भाकीत परत आणीन; मी पूर्वीप्रमाणेच त्यांना बांधीन.
8 Un Es tos šķīstīšu no visa viņu nozieguma, ar ko tie pret Mani grēkojuši, un Es tiem piedošu visus viņu pārkāpumus, ar ko tie pret Mani grēkojuši un ar ko tie no Manis atkāpušies.
८मग त्यांनी ज्या अन्यायाने माझ्याविरूद्ध पाप केले त्या सर्वापासून मी त्यांना धुवून स्वच्छ करीन. मी त्यांनी ज्या आपल्या सर्व अन्यायाने माझ्याविरूद्ध पाप केले व ज्या सर्व मार्गाने त्यांनी माझ्याविरूद्ध बंड केले त्या सर्वांची मी त्यांना क्षमा करीन.
9 Un tad(Jeruzāleme) Man būs par prieka vārdu, par slavu un par godu pie visām tautām virs zemes, kas dzirdēs visu to labumu, ko Es tiem daru, un tās bīsies un drebēs par visu to labumu un par visu to mieru, ko Es viņai dodu.
९कारण हे नगर पृथ्वीतल्या सर्व राष्ट्रांसमोर मला आंनदाचे नाव, स्तुतीचे गीत, सन्मानास कारण असे होईल. त्यांचे सर्व हित मी करीन ते ती ऐकतील आणि जे सर्व हित व जे सर्व कुशल मी त्यांना प्राप्त करून देईन त्यावरून ती भयभीत होतील व थरथर कापतील.
10 Tā saka Tas Kungs: šinī vietā, par ko jūs sakāt, tā ir postaža bez cilvēka un lopa, pa Jūda pilsētām un pa Jeruzālemes ielām, kas ir postītas, ka tur nav ne cilvēka, ne iedzīvotāja, ne lopa,
१०परमेश्वर असे म्हणतो, या स्थानाविषयी तुम्ही आता म्हणता की हे ओसाड आहे. तेथे यहूद्याच्या नगरात कोणी माणसे व प्राणी नाहीत आणि यरूशलेमेचे रस्ते निर्जन झाले आहेत, माणसे व पशू नाहीत.
11 Tur atkal dzirdēs prieka balsi un līksmības balsi, brūtgāna balsi un brūtes balsi, balsi no tiem, kas saka: teiciet To Kungu Cebaot, jo Tas Kungs ir labs, jo Viņa žēlastība paliek mūžīgi, - un kas nes pateicības upuri Tā Kunga namā. Jo Es vedīšu atpakaļ tās zemes cietumniekus kā papriekš, saka Tas Kungs.
११तेथे पुन्हा आनंद व हर्षाचा शब्द ऐकू येईल. नवऱ्याची व नवरीची वाणी ऐकू येईल, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सर्वकाळची आहे. असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात उपकारस्तुतीचे अर्पण आणतील त्यांचा आवाज पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास परत उलटवून सुरुवातीला जसे होते तसे करीन, असे परमेश्वर म्हणतो.
12 Tā saka Tas Kungs Cebaot: šinī vietā, kas ir postaža bez cilvēka un lopa, un visās apkārtējās pilsētās būs atkal ganu dzīvokļi, kas ganīs ganāmus pulkus.
१२सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, या निर्जन स्थानात, जेथे आता मनुष्य व प्राणी कोणीही नाही. त्यातल्या सर्व नगरात कळप बसविणाऱ्या मेंढपाळांची वस्ती पुन्हा होईल.
13 Pa kalnu pilsētām un lejas pilsētām un pa dienvidu(Negebas) pilsētām un Benjamina zemē un ap Jeruzālemi un pa Jūda pilsētām ganāmi pulki atkal ies apakš skaitītāju rokām, saka Tas Kungs.
१३डोंगराळ प्रदेशातील नगरात, मैदानातील नगरात, आणि दक्षिणप्रदेशातील नगरात, बन्यामिनाच्या देशात, यरूशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशात व यहूदाच्या नगरात, व नेगेबातील प्रदेशात मोजदाद करणाऱ्याच्या हाती पुन्हा कळप जातील, असे परमेश्वर म्हणतो.
14 Redzi, nāks dienas, saka Tas Kungs, ka Es piepildīšu to labo vārdu, ko Es esmu runājis uz Israēla namu un Jūda namu.
१४परमेश्वराचे असे म्हणणे आहे, पाहा! असे दिवस येत आहेत जे मी इस्राएल आणि यहूदाच्या घराण्यासाठी जे वचन दिले आहे ते मी करीन.
15 Tanīs dienās un tanī laikā Es Dāvidam likšu izplaukt taisnības Zaram, un tas darīs tiesu un taisnību virs zemes.
१५त्या दिवसात आणि त्यावेळी मी दावीदासाठी धार्मिकतेची शाखा वाढवीन आणि ती देशात न्याय आणि धार्मिकता चालवील.
16 Tanīs dienās Jūda taps atpestīts, un Jeruzāleme dzīvos bez bailēm, un šis ir tas (vārds), ar ko Viņu sauks: Tas Kungs mūsu taisnība.
१६त्या दिवसात यहूदाचे तारण होईल आणि यरूशलेम सुरक्षित राहील. कारण तिला परमेश्वर आमची धार्मिकता आहे या नावाने बोलवतील.
17 Jo tā saka Tas Kungs: Dāvidam netrūks vīra, kas sēdēs Israēla nama goda krēslā.
१७कारण परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलाच्या घराण्याच्या सिंहासनावर बसणाऱ्यांची उणीव दावीदाला कधीच पडणार नाही.
18 Arī priesteru, levitu netrūks Manā priekšā, kas upurē dedzināmos upurus un iededzina ēdamus upurus un sataisa kaujamus upurus mūžīgi.
१८तसेच माझ्यासमोर होमार्पणे अर्पिणारा, अन्नार्पणाचा यज्ञ करणारा व नित्य यज्ञ करणारा यांची लेवीय याजकास उणीव पडणार नाही.”
19 Un Tā Kunga vārds notika uz Jeremiju un sacīja:
१९यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
20 Tā saka Tas Kungs: ja jūs varat iznīcināt Manu derību ar dienu un Manu derību ar nakti, ka dienas un nakts vairs nav savā laikā,
२०परमेश्वर असे म्हणतो, “जर तू दिवस आणि रात्र या विषयीचा जो माझा करार तुमच्याने मोडवेल यासाठी की, दिवस आणि रात्र आपापल्या योग्यवेळी होऊ नयेत म्हणून,
21 Tad arī iznīks Mana derība ar Manu kalpu Dāvidu, ka tam dēla nebūs, kas valda uz viņa goda krēsla, un (Mana derība) ar levitiem, priesteriem, Maniem kalpotājiem.
२१तर माझा सेवक दावीद याच्याशी जो करार आहे तोही मोडून जाईल यासाठी की त्यास त्याच्या सिंहासनावर राज्य करायला मुलगा होऊ नये आणि माझी सेवा करणारे लेवी जे याजक त्यांच्याशी जो करार आहे तोही मोडून जाईल.
22 Tā kā debess pulku nevar skaitīt un jūras smiltis nevar mērot, tāpat Es vairošu Sava kalpa Dāvida dzimumu un levitus, kas Man kalpo.
२२ज्याप्रमाणे आकाशातील सैन्य मोजू शकत नाही आणि जसे समुद्रकाठच्या वाळूचे मापन होऊ शकत नाही. त्याप्रमाणे माझा सेवक दावीद याच्या वंशजांना आणि जे लेवी माझी सेवा करतात त्यांनाही मी बहुगुणित करीन.”
23 Un Tā Kunga vārds notika uz Jeremiju sacīdams:
२३यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
24 Vai tu neredzi, ko šie ļaudis runā un saka? Tās divas ciltis, ko Tas Kungs bija izredzējis, Viņš nu atmetis, un tie nievā Manus ļaudis, tā kā tie vairs nebūtu tauta viņu priekšā.
२४“हे लोक जे काय बोलले, ते तू ऐकलेस लक्षात घेतले नाहीस, ते म्हणतात की, जी दोन घराणी परमेश्वराने निवडली ती त्यांना सोडून दिले आहेत काय? याप्रकारे त्यांच्या दृष्टीने पुन्हा राष्ट्र होऊ नये असे ते माझ्या लोकांस तुच्छ लेखतात.”
25 Tā saka Tas Kungs: ja Mana derība ar dienu un nakti nepastāv, ja Es debess un zemes likumus neesmu cēlis,
२५परमेश्वर असे म्हणतो, “जर माझा दिवस व रात्र याविषयीचा माझा करार अढळ नाही किंवा मी जर आकाशाचे आणि पृथ्वीचे नियम स्थापिले नाहीत,
26 Tad Es arī atmetīšu Jēkaba un Sava kalpa Dāvida dzimumu, ka neņemu no viņa dzimuma valdītājus pār Ābrahāma, Īzaka un Jēkaba dzimumu. Jo Es vedīšu atpakaļ viņu cietumniekus un apžēlošos par viņiem.
२६तर याकोबाची संतती व माझा सेवक दावीद याच्या संततीचा मी त्याग करीन आणि दावीदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या संततीवर सत्ता चालविण्यास ठेवणार नाही; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन व त्याजवर दया करीन.”