< Jesajas 7 >
1 Un notikās Ahaza, Jūda ķēniņa, dienās, - tas bija Uzijas dēla Jotama dēls, - ka Recins, Sīrijas ķēniņš, un Pekas, Remalijas dēls, Israēla ķēniņš, uz Jeruzālemi cēlās, pret viņu karot, bet karodami pret viņu tie nekā neiespēja.
१यहूदाचा राजा आहाज, जो योथामाचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र, त्याच्या कारकीर्दित अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह, जे रमाल्याचा पुत्र, हे यरूशलेमावर लढाई करण्याकरीता चालून गेले, परंतु त्यांची त्यावर सरशी झाली नाही.
2 Un Dāvida namam teica un sacīja: Sīrieši apmetušies pret Efraīmu. Tad viņa sirds un viņa ļaužu sirds drebēja, tā kā meža koki dreb no vēja.
२दावीदाच्या घराण्याला कळविण्यात आले की, अराम आणि एफ्राईम हे एक झाले आहेत. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे आहाज आणि त्याच्या लोकांची मने भीतीने कंपीत झाली.
3 Un Tas Kungs sacīja uz Jesaju: izej jel Ahazam pretī, tu un tavs dēls ŠearJašubs, augšēja dīķa grāvja galā, ceļmalā, pie vadmalnieku tīruma,
३मग परमेश्वर यशयाला म्हणाला, “आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शआरयाशूब याजबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या तळ्याचे पाणी मिळते तेथे जा.
4 Un saki uz viņu: sargies un esi klusu, nebīsties, un lai tava sirds nebaiļojās no šiem diviem kūpošiem prauliem, no Recina un Sīriešu un Remalijas dēla karstām dusmām.
४त्यास सांग, सावध हो, शांत रहा, भिऊ नको किंवा या दोन जळत्या कोलीतांमुळे रसीन, अराम, आणि रमाल्याचा पुत्र पेकह यांच्या उग्र क्रोधामुळे खचून जाऊ नको.
5 Tādēļ ka Sīrieši pret tevi ļaunu sadomājuši ar Efraīmu un Remalijas dēlu sacīdami:
५अराम, एफ्राईम, व रमाल्याच्या पुत्राने तुमच्या विरूद्ध दुष्ट योजना केली आहे, ते म्हणतात,
6 Celsimies pret Jūdu un izbiedēsim to un uzņemsim to un celsim tur Tabeala dēlu par ķēniņu; -
६आपण यहूदावर चालून जाऊ व त्यास घाबरे करू, त्याची तटबंदी फोडून तेथे ताबेलाच्या पुत्राला राजा करु.
7 Tā saka Tas Kungs Dievs: tas nenotiks un nebūs.
७प्रभू परमेश्वर म्हणतो, असे काही होणार नाही; असे काही घडणार नाही,
8 Bet Damaskus būs Sīrijas galva, un Recins Damaskus galva, un vēl būs sešdesmit pieci gadi, tad Efraīms taps satriekts, ka vairs nebūs tauta.
८कारण अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन आहे. पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.
9 Un Samarija būs Efraīma galva, un Remalijas dēls Samarijas galva. Ja neticēsiet, tad nepastāvēsiet.
९एफ्राईमाचे शीर शोमरोन आणि शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र आहे. तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षीत राहणार नाहीस.”
10 Un Tas Kungs runāja vēl uz Ahazu un sacīja:
१०परमेश्वर पुन्हा आहाजाशी बोलला,
11 Prasies kādu zīmi no Tā Kunga, sava Dieva, prasi to, vai dziļi dziļumā vai augsti augstumā! (Sheol )
११“तुझा देव परमेश्वर याला चिन्ह माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग.” (Sheol )
12 Tad Ahazs sacīja: es neprasīšu, es arī To Kungu nekārdināšu.
१२परंतु आहाज म्हणाला, “मी मागणार नाही किंवा परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”
13 Tad viņš sacīja: klausiet jel, jūs no Dāvida nama, vai tas jums vēl maz, kaitināt cilvēkus, ka nu arī kaitinājiet manu Dievu?
१३मग यशयाने उत्तर दिले, “दावीदाच्या घराण्या, ऐक लोकांच्या धीराला तुम्ही कसोटीला लावले ऐवढे पुरे नाही काय? माझ्या देवाच्या सहनशीलतेला पण तुम्ही कसोटीला लावावे काय?
14 Tādēļ Tas Kungs pats jums dos zīmi: redzi, jumprava būs grūta un dzemdēs dēlu un nosauks viņa vārdu Immanuel (Dievs ar mums).
१४म्हणून प्रभू स्वतः तुम्हास एक चिन्ह देईल, पहा, एक तरुण स्त्री गर्भवती होऊन मुलाला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देईल.
15 Sviestu un medu viņš ēdīs, kad viņš zin ļaunu atmest un labu uzņemt.
१५तो वाईटाला नाकारील आणि चांगले ते पसंत करणे हे जेव्हा त्यास समजेल तेव्हा तो लोणी व मध यांचे सेवन करील.
16 Jo pirms tas puisītis zin ļaunu atmest un labu uzņemt, zeme būs izpostīta, no kuras diviem ķēniņiem tev bailes.
१६कारण त्या मुलाला वाईट नाकारून व चांगले ते पसंत करावे हे कळू लागण्याआधीच ज्या दोन राजांची तुला धास्ती पडली आहे त्यांची भूमी उजाड होईल.
17 Un Tas Kungs atvedīs pār tevi un pār taviem ļaudīm un pār tavu tēva namu dienas, kādas nav nākušas no tā brīža, kamēr Efraīms no Jūda ir atkāpies, proti Asīrijas ķēniņu.
१७एफ्राईम यहूदापासून वेगळा आला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुझ्यावर, तुझ्या लोकांवर आणि तुझ्या वडिलाच्या घराण्यावर आणील; तो अश्शूरच्या राजाला तुजविरूद्ध आणील.”
18 Jo tai dienā Tas Kungs pasvilps tām mušām, kas ir Ēģiptes upju galā, un to biti, kas Asīrijas zemē.
१८त्यावेळी मिसरच्या दूरच्या ओढ्यांमधून माशीला व अश्शूर देशातील मधमाशीला परमेश्वर शीळ घालून बोलावील.
19 Un tie nāks un apmetīsies visi dziļās ielejās un kalnu gravās un visos ērkšķu krūmos un visās ganībās.
१९त्या सगळ्या खोऱ्यात व खडकाच्या कपारीत सगळ्या काटेरी झुडपात व सर्व कुरणांत तळ देतील.
20 Tai dienā Tas Kungs ar derētu dzenamu nazi, kas viņpus upes, caur Asīrijas ķēniņu, nodzīs galvu un kāju matus, ir visu bārdu Viņš nodzīs.
२०त्यावेळी प्रभू अश्शूरच्या राजाचा एका भाड्याने घेतलेल्या वस्तऱ्याप्रमाणे उपयोग करून, तुमच्या डोक्याच्या व पायांच्या केसांचा मुंडण करील तो तुमची दाढी देखील तासून काढील.
21 Un tai dienā cilvēks turēs kādu gotiņu un kādas divas aitiņas.
२१त्या दिवशी मनुष्य एक कालवड व दोन मेंढ्या पाळील.
22 Un tie tik daudz piena dos, ka tas sviestu ēdīs, jo ikkatrs, kas tai zemē atliks, tas ēdīs sviestu un medu.
२२आणि त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल, कारण देशात मागे राहीलेला प्रत्येक मनुष्य लोणी व मध खाईल.
23 Un tai dienā notiks, ka ikkatrā vietā, kur bijuši tūkstoš vīna koki, kas maksāja tūkstoš sudraba gabalus, tur būs ērkšķi un krūmi,
२३त्यावेळी जेथे हजार शेकेल चांदीच्या नाण्याएवढ्या किंमतीची हजार द्राक्षवेली होत्या, तेथे तण आणि काटेकुटे याव्यतिरिक्त काहीही राहणार नाही
24 Ka ar bultām un stopiem tur būs jāiet, jo visa tā zeme būs ērkšķi un krūmi.
२४माणसे तेथे बाण घेऊन शिकारीसाठी जातील कारण सर्व भूमी तण व काटेकुटे यांनी भरलेली असते.
25 Un uz visiem tiem kalniem, ko citkārt apkapāja ar kapļiem, tur tu neiesi, bīdamies no ērkšķiem un krūmiem, bet lieli lopi tur staigās, un sīki lopi tos mīdīs.
२५ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणून शेती करीत त्या सर्वापासून ते काटेरीझुडपांच्या भीतीमुळे दूर राहतील, पण गुरेढोरे व मेढ्या तेवढ्या चरण्यासाठी तेथे जातील.