< Jesajas 39 >
1 Tanī laikā Merodaks BalAdans, BalAdana dēls, Bābeles ķēniņš, sūtīja grāmatas un dāvanas pie Hizkijas, jo tas bija dzirdējis, ka viņš bija slims bijis un atkal palicis vesels.
१त्या वेळेला, बलदानाचा मुलगा मरोदख-बलदान, बाबेलचा राजा याने हिज्कीयाला पत्रे आणि भेटी पाठवल्या; कारण त्याने हिज्किया आजारी असल्याचे आणि बरा झाल्याचे ऐकले होते.
2 Un Hizkija priecājās par tiem un tiem rādīja savu mantas namu, to sudrabu un zeltu, tās dārgās zāles un to smalko eļļu un visu savu bruņu namu un visu, kas viņa mantās bija; nekas nebija visā viņa namā un visā viņa valstī, ko Hizkija tiem nebūtu rādījis.
२या गोष्टीमुळे हिज्कीयाला आनंद झाला; त्याने आपल्या भांडारातील मोल्यवान वस्तू चांदी, सोने, मसाले, अमूल्य तेल आणि त्याचे शस्त्रगार आणि त्याच्या भांडारात हे सर्व सापडले ते सर्व दाखवले. हिज्कीयाने त्यांना दाखविले नाही असे त्याच्या घरात किंवा त्याच्या सर्व राज्यात काहीच राहिले नव्हते.
3 Tad pravietis Jesaja nāca pie ķēniņa Hizkijas un uz to sacīja: Ko šie vīri sacījuši un no kurienes tie pie tevis nākuši? Un Hizkija sacīja: Tie no tālas zemes pie manis nākuši, no Bābeles.
३मग यशया संदेष्टा हिज्कीया राजाकडे आला आणि त्यास विचारले, “ही माणसे तुला काय म्हणत होती? ती कोठून आली होती?” हिज्कीया म्हणाला, “ती दूरच्या बाबेल देशातून माझ्याकडे आली होती.”
4 Un viņš sacīja: Ko tie laba redzējuši tavā namā? Un Hizkija sacīja: Tie visu redzējuši, kas manā namā, nekā nav no manām mantām, ko es tiem nebūtu rādījis.
४यशयाने विचारले, “तुझ्या घरात त्यांनी काय काय पाहिले?” हिज्कीयाने उत्तर दिले, “माझ्या घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. मी त्यांना माझ्या सर्व मोलवान वस्तू दाखविल्या नाहीत असे काहीच नाही.”
5 Tad Jesaja sacīja uz Hizkiju: Klausies Tā Kunga Cebaot vārdu.
५मग यशया हिज्कीयाला म्हणाला, सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक
6 Redzi, dienas nāks, ka viss, kas ir tavā namā, un ko tavi tēvi līdz šai dienai sakrājuši, taps novests uz Bābeli, nekas netaps atlicināts, saka Tas Kungs.
६पाहा, असे दिवस येणार आहेत की, जेव्हा तुझ्या महालातील प्रत्येक गोष्ट, ज्या तुझ्या पूर्वजांनी आतापर्यंत जमविले आहे ते सर्व बाबेलाला घेऊन जातील. काहीच उरणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
7 Un no taviem dēliem, kas no tevis nāks, ko tu dzemdināsi, viņi ņems, ka tie būs par kambar junkuriem Bābeles ķēniņa pilī.
७आणि तुझ्यापासून जी मुले जन्मतील, ज्यांचा तू स्वतः पिता असशील त्यांना घेऊन जातील आणि बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले षंढ म्हणून राहतील.
8 Un Hizkija sacīja uz Jesaju: Tā Kunga vārds ir labs, ko tu runājis. Un viņš sacīja: Kad tik miers un drošība pastāv manā laikā.
८मग हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराचे वचन तू बोललास ते विश्वासयोग्य आहे.” कारण त्याने विचार केला, माझ्या दिवसात तेथे शांतता आणि स्थिरता राहील.