< Jesajas 22 >
1 Spriedums par parādīšanas ieleju. Kas tev ir, ka jūs visi kāpiet uz jumtiem?
१दृष्टांताच्या खोऱ्याविषयी ही देववाणी; तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे?
2 Tu biji trokšņa pilna, ļaužu pilna pilsēta, līksma pils. Tavi nokautie nav ar zobenu nokauti nedz karā krituši.
२एक गोंगाटाने भरलेले शहर, आंनदाने भरलेली नगरी, तुझ्यातील जे तलवारीने ठार केलेले नाहीत आणि जे युद्धात मारले गेले नाहीत.
3 Visi tavi virsnieki kopā bēguši, bez stopiem tie ir gūstīti, visi, kas pie tevis top atrasti, ir sasieti, tie tālu bēguši.
३तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुर्धारांनी धरले आहे, तुझ्यामध्ये जे सापडले त्या सर्वांना त्यांनी एकवट करून बांधले, ते दूर पळाले आहेत.
4 Tādēļ es saku: Atstājaties nost no manis, lai es gauži raudu, nepūlējaties, mani iepriecināt par manas tautas nopostīšanu.
४यास्तव मी म्हणालो, माझ्याकडे पाहू नका, मी कष्टाने रडेन, माझ्या लोकांच्या मुलीच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करु नका.
5 Jo tā ir trokšņa un posta un jukas diena no Tā Kunga Dieva Cebaot parādīšanas ielejā, kur mūri grūst, un brēkšana atskan kalnos.
५कारण हा गोंगाटाचा, पायाखाली तुडवण्याचा आणि गडबडीचा दिवस सेनाधीश परमेश्वर, प्रभू याजकडून दृष्टांताच्या खोऱ्यात आला आहे. त्या दिवशी लोक भिंती फोडतील आणि डोंगराकडे ओरडतील.
6 Jo Elams nes bultu maku, tur ir vīri uz ratiem, tur ir jātnieki, un Ķire nāk ar spožām priekšturamām bruņām.
६एलामाने मनुष्यांचा रथ आणि घोडेस्वार घेऊन बाणांचा भाता वाहिला, आणि कीराने ढाल उघडी केली.
7 Un tavas jaukās ielejas būs pilnas ratu, un jātnieki apmetīsies pret vārtiem.
७आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे रथांनी भरून गेले आणि घोडस्वार वेशींजवळ आपापली जागा घेतील.
8 Viņš atsegs apsegu no Jūda, un tai dienā tu lūkosi pēc tām bruņām ciedru koku namā.
८त्याने यहूदावरील रक्षण काढून घेतले आहे, आणि त्या दिवशी तू वनांतील घरांत शस्त्रांवर दृष्टी लावली.
9 Un jūs redzat Dāvida pilsētas plaisas esam daudz, un jūs krājat lejas dīķa ūdeni.
९दाविदाच्या नगराला पुष्कळ भगदाडे पडलेली तुम्ही पाहिले आहे, आणि तुम्ही खालच्या तळ्यातील पाणी जमा केले.
10 Un jūs skaitiet Jeruzālemes namus un nolaužat namus, mūri stiprināt.
१०तू यरूशलेमेच्या घरांची मोजदाद केली, आणि भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोडली.
11 Jūs rokat arīdzan grāvi starp abējiem mūriem priekš vecā dīķa ūdens. Bet jūs neskatāties uz to, kas to dara, un nelūkojiet uz to, kas to sen nolicis.
११दोन भिंतीच्या मध्ये हौद बांधून जुन्या तळ्याच्या पाण्यासाठी सोय केली. पण तू शहर बांधनाऱ्याचा विचार केला नाही, ज्याने त्या बद्दल पूर्वीच योजिले होते.
12 Un tai dienā Tas Kungs Dievs Cebaot aicinās raudāt un žēloties, un apcirpties un maisus apvilkt.
१२त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला, रडावे, शोक करावा व टक्कल पाडावे आणि गोणताट घालावे.
13 Bet redzi, prieks un līksmība, vēršu kaušana un avju kaušana, gaļas ēšana un vīna dzeršana: ēdīsim un dzersim, jo rītu mums jāmirst
१३परंतू त्याऐवजी, पाहा, उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचेच आहे.
14 Bet Tas Kungs Cebaot darījis zināmu manās ausīs: tiešām, šis noziegums jums netaps piedots, kamēr jūs mirsiet, saka Tas Kungs Dievs Cebaot.
१४आणि सैन्याच्या परमेश्वराने माझ्या कानात हे सांगितले की, जरी तू मेलास, तरी या तुझ्या पापांची क्षमा केली जाणार नाही. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
15 Tā saka Tas Kungs Dievs Cebaot: celies, ej pie šī mantas sarga, pie Šebnas, kas celts pār to namu, (un saki)
१५सेनाधीश परमेश्वर, प्रभू असे म्हणतो, हा कारभारी शेबना, जो राजाच्या घरावर नेमला आहे, त्याकडे जा व त्यास बोल;
16 Ko tu še dari, un kam tu še to dari, ka tu še kapu sev izcērt, ka kalnā roc savu kapu, klintī sev izcērt mājokli?
१६तू येथे काय करीत आहेस? तू कोण आहेस? जसा कोणी आपली कबर उंच ठिकाणांत खोदतो आणि आपले राहण्याचे स्थान खडकामध्ये करतो तशी तू आपणासाठी कबर खोदीत आहेस.
17 Redzi, Tas Kungs ar varenu sviedienu tevi nosviedīs, cieti tevi sagrābis.
१७पाहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला फेकून देईल आणि तुला घट्ट धरील.
18 Velšus Viņš tevi aizvels ar tādu velšanu kā lodi uz zemi, lielu un plašu; tur tu nomirsi, tur paliks tavas godības rati, tu negods sava kunga namam.
१८तो तुला गुंडाळून चेंडुसारखा मोठ्या देशात फेकून देईन, तू आपल्या धन्याच्या घरात अप्रतिष्ठा असा आहेस तो तू मरशील, आणि तुझ्या गौरवाचे रथ तेथेच राहतील.
19 Un Es tevi nogāzīšu no tavas vietas, un no tava amata Es tevi nocelšu.
१९प्रभू परमेश्वर म्हणतो मी तुला उच्च पदावरून काढून टाकिल तुझे उच्च पद हिसकावून घेईल. तू खाली ओढला जाशील.
20 Un notiks tai dienā, tad Es aicināšu Savu kalpu Elijaķimu, Hilķijas dēlu,
२०आणि त्या दिवशी असे होईल हिल्कीयाचा पुत्र एल्याकीम यास मी बोलावीन.
21 Un Es viņu apģērbšu ar taviem svārkiem un viņu apjozīšu ar tavu jostu, un tavu valdīšanu Es nodošu viņa rokā, un viņš būs par tēvu Jeruzālemes iedzīvotājiem un Jūda namam.
२१तुझा झगा मी त्यास घालीन आणि तुझा कमरबंध त्यास देईन व तुझे अधिकर मी त्याच्या हाती देईन. यरूशलेमेच्या राहणाऱ्यांना व यहूदाच्या घराण्याला पिता असा होईल.
22 Un Es Dāvida nama atslēgu likšu uz viņa pleciem, un kur viņš atvērs, tur neviens neaizslēgs, un kur viņš aizslēgs, tur neviens neatvērs.
२२दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन, तो उघडील आणि कोणीच ते बंद करणार नाही, आणि जे काही बंद करील ते कोणीच उघडू शकणार नाही.
23 Un Es viņu iesitīšu kā naglu stiprā vietā, un viņš būs par goda krēslu sava tēva namā.
२३त्यास मी सुरक्षीत ठिकाणी खिळ्याप्रमाणे पक्का करीन, आणि तो आपल्या पित्याच्या घराला वैभवशाली राजासन असे होईल.
24 Un pie viņa pieķersies visa viņa tēva nama godība, bērni un bērnu bērni, visi mazie trauki, bļodas un krūzes.
२४त्याच्या पित्याच्या घराण्यातील सर्व गौरव, मुले व संतती, सर्व लहान पात्रे, पेल्यापासून सुरईपर्यंत सर्व भांडी तिच्यावर टांगून ठेवतील.
25 Tai dienā, saka Tas Kungs Cebaot, tā nagla lieksies, kas stiprā vietā bija iesista, tā lūzīs un kritīs, un tā nasta pie tās ies bojā; jo Tas Kungs to ir runājis.
२५सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, मग असे घडेल की, भिंतीत पक्का केलेला खिळा असतो तो शिळ्या जवळ ढिला होउन पडेल व जो भार तिच्यावर होता तो छेदला जाईल, कारण परमेश्वर हे बोलला आहे.