< Hozejas 11 >
1 Kad Israēls bija bērns, tad Es viņu mīlēju, un Savu dēlu atsaucu no Ēģiptes.
१जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले, आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले.
2 Bet jo (tie pravieši) tos sauca, jo vairāk tie no viņiem nogāja; tie upurēja Baāliem un kvēpināja elku tēliem.
२त्यांना जेवढे बोलविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात ते बआलास बली आणि मुर्तीस धूप जाळत.
3 Es tomēr Efraīmu mācīju staigāt, Es tos ņēmu uz Savām rokām, bet tie neatzina, ka Es tos dziedināju.
३तरी तो मीच ज्याने एफ्राईमास चालणे शिकविले तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो.
4 Es tos vilku ar cilvēka valgiem, ar mīlestības saitēm, un tiem biju kā kas apaušus no viņu žokļiem atvieglina, un Es tiem pasniedzu barību.
४मी त्यांना मानवता आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतो आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले.
5 Viņš neatgriezīsies atpakaļ uz Ēģiptes zemi, bet Asurs, tas būs viņa ķēniņš, tāpēc ka tie liedzās atgriezties.
५ते मिसरात परत येणार काय? अश्शूर त्यावर राज्य करणार काय? कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात?
6 Un zobens zibēs viņu pilsētās un nobeigs un aprīs viņu aizšaujamos viņu padomu dēļ.
६त्यांच्या नगरावर तलवार चालेल आणि ती त्याच्या दाराचे अडसर नष्ट करील, त्यांचा नाश त्यांच्या स्वत: च्या योजनांमुळे होईल.
7 Jo Maniem ļaudīm prāts nesās, no Manis nogriezties; tie gan top aicināti uz augšu, bet neviena nav, kas ceļas.
७माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही.
8 Kā Es tev darīšu, Efraīm? Vai Man tevi būs nodot, Israēl? Vai Es tev darīšu kā Admai? Vai tevi postīšu kā Ceboīmu? Mana sirds ir griezusies, un Mana apžēlošanās visai iedegusies.
८हे एफ्राईमे, मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला, मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करु? मी तुला सबोयिमासारखे कसे करु? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.
9 Es nedarīšu pēc Savas bardzības karstuma, nedz Efraīmu atkal postīšu, jo Es esmu Dievs un ne cilvēks, tas Svētais tavā vidū. Un dusmās Es nenākšu.
९मी माझा भयानक राग अमलात आणणार नाही मी एफ्राईमाचा पुन्हा नाश करणार नाही कारण मी देव आहे आणि मनुष्य नाही तुमच्यामध्ये असणारा मी पवित्र आहे मी क्रोधाने येणार नाही.
10 Tad tie dzīsies Tam Kungam pakaļ, Viņš kauks kā lauva, un kad Viņš kauks, tad tie bērni no vakara puses drebēs.
१०ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वर सिंहासारखी गर्जना करेन मी खरोखर गर्जेन आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील.
11 Tie drebēdami nāks no Ēģiptes, kā putns un kā balodis no Asura zemes, un Es tiem likšu dzīvot viņu namos, tā saka Tas Kungs.
११ते मिसरातून पक्षासारखे आणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतील मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो.
12 Efraīms Mani apstāj ar meliem un Israēla nams ar viltu, un Jūda vēl šaubās ap Dievu, to uzticīgo un svēto.
१२एफ्राईम मला लबाडीने आणि इस्राएलचे घराणे कपटाने वेढले, पण यहूदा आतापर्यंत देवाबरोबर, जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे.