< Vēstule Ebrējiem 1 >

1 Dievs dažu reizi un dažādi vecos laikos uz tiem tēviem runājis caur tiem praviešiem,
देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला,
2 šinīs pēdīgās dienās uz mums ir runājis caur To Dēlu; To Viņš ir iecēlis par mantinieku pār visu; caur To Viņš arī pasauli radījis; (aiōn g165)
परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. (aiōn g165)
3 Tas ir tas godības atspīdums un Viņa būšanas ģīmis un nes visas lietas caur Savu spēcīgo vārdu, un, šķīstīšanu no grēkiem darījis caur Sevi pašu, un sēdies pie labās rokas tai godībai augstībā;
पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
4 Un Viņš ir tapis tik daudz augstāks pār eņģeļiem, cik Viņš augstāku vārdu pār tiem ir mantojis.
तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे वारशाने त्यास मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
5 Jo kuram eņģelim Viņš jebkad ir sacījis: Tu esi Mans Dēls, šodien Es Tevi esmu dzemdinājis? Un atkal: Es Viņam būšu par Tēvu, un Viņš Man būs par Dēlu?
देवाने कोणत्याही देवदूताला म्हणले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे?” आणि पुन्हा, ‘मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल?’
6 Un kad Viņš atkal to pirmdzimušo ieved pasaulē, Viņš saka: un visiem Dieva eņģeļiem būs Viņu pielūgt.
आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्यास नमन करोत.”
7 Un par tiem eņģeļiem Viņš gan saka: kas Savus eņģeļus dara par vējiem, un Savus sulaiņus par uguns liesmām;
देवदूताविषयी देव असे म्हणतो, “तो त्याच्या देवदूतांना वायु बनवतो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवतो.”
8 Bet par To Dēlu: Tavs goda krēsls, ak Dievs, paliek mūžīgi mūžam; Tavas valdīšanas scepteris ir taisns scepteris. (aiōn g165)
पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे. (aiōn g165)
9 Tu esi mīlējis taisnību un ienīdējis netaisnību; tāpēc Dievs, Tavs Dievs, Tevi svaidījis ar prieka eļļu, pāri par Taviem biedriem.
नीतिमत्त्व तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस. म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंददायी तेलाचा अभिषेक केला आहे.”
10 Un: Tu, Kungs, iesākumā zemi esi dibinājis, un debesis ir Tavu roku darbs;
१०आणि हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.
11 Tās zudīs, bet Tu palieci vienmēr, tās sadils visas kā drēbes.
११ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील.
12 Un tā kā uzvalku Tu tās satīsi, un tās taps pārvērstas: bet Tu esi tas pats, un Tavi gadi nebeigsies.
१२तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.
13 Un uz kuru eņģeli Viņš jebkad ir sacījis: sēdies pie Manas labās rokas, tiekams Es Tavus ienaidniekus lieku par pameslu Tavām kājām?
१३तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही, तुझ्या वैऱ्याला तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.
14 Vai visi tie nav gari, kas kalpo un top izsūtīti uz kalpošanu to dēļ, kas to debesprieku iemantos?
१४सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?

< Vēstule Ebrējiem 1 >