< Ecechiela 3 >

1 Un Viņš sacīja uz mani: Cilvēka bērns, ēd, kas tavā priekšā, ēd šo satīto grāmatu, un ej un runā uz Israēla namu.
तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, जो ग्रंथ तुला प्राप्त झाला आहे तो ग्रंथ तू खाऊन टाक! आणि जा इस्राएलाच्या घराण्याशी बोल.”
2 Tad es atdarīju savu muti, un Viņš man deva ēst to satīto grāmatu.
म्हणून तेव्हा मी आपले तोंड उघडले व त्याने मला तो ग्रंथ खाऊ घातला.
3 Un Viņš sacīja uz mani: Cilvēka bērns, dod savam vēderam ēst un pildi savas iekšas ar šo satīto grāmatu, ko Es tev dodu. Tad es ēdu, un tas bija manā mutē tik salds kā medus.
तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, मी तुला दिलेल्या ग्रंथपटाने आपले पोट भरुन टाक!” मग मी ते खाल्ले, आणि ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड वाटले.
4 Un Viņš sacīja uz mani: Cilvēka bērns, ej pie Israēla nama un runā uz tiem Manus vārdus.
तेव्हा तो मला म्हणाला “मानवाच्या मुला इस्राएलाच्या घराण्याकडे जा आणि माझे शब्द त्यांना सांग.
5 Jo tu netopi sūtīts pie ļaudīm, kam tumša valoda un grūta mēle, bet uz Israēla namu,
अपरिचित वाणी आणि कठोर भाषेच्या लोकांजवळ मी तुला पाठवणार नाही, परंतू इस्राएलाच्या घरण्याकडे मी तुला पाठवतो;
6 Ne pie lielām tautām, kam tumšas valodas un grūtas mēles, kuru vārdus tu nevari saprast; bet pie tiem Es tevi esmu sūtījis, tie tevi var saprast.
मोठी राष्ट्रे अपरिचित, कठिण भाषेचे, ज्यांची भाषा समजत नाही त्यांच्याकडे पाठवत नाही! जर मी तुला त्यांच्याकडे पाठवले तर ते तुझे ऐकतील!
7 Bet Israēla nams negribēs tevi klausīt, tāpēc ka tie Mani negrib klausīt. Jo visam Israēla namam ir bieza piere un cieta sirds.
परंतु इस्राएलाचे घराणे तुझे ऐकण्याची इच्छा दाखवणार नाही, ते माझे ही ऐकण्याची इच्छा दाखवत नाहीत. म्हणून इस्राएलाचे सर्व घराणे हट्टी कपाळाचे आणि कठिण मनाचे आहेत.
8 Redzi, tavu vaigu Es daru cietu kā viņu vaigu, un tavu pieri biezu kā viņu pieri
पहा! मी तुझा चेहरा त्यांच्या हट्टी चेहऱ्या सारखा त्यांच्या कठोर कपाळासारखे तुझे कपाळ केले आहे.
9 Tavu pieri Es esmu darījis kā dimantu, cietāku pār klinti. Nebīsties no tiem un neiztrūksties no viņu vaiga; jo tie ir atkāpēju suga.
तुझे कपाळ मी हिऱ्यासारखे कठोर केले आहे! त्यांना भयभीत होऊ नको; किंवा निराश होऊ नको; कारण ते पहिल्यापासून फितुर आहेत.”
10 Un Viņš sacīja uz mani: Cilvēka bērns, ņem pie sirds visus Manus vārdus, ko Es uz tevi runāšu, un klausies tos ar savām ausīm.
१०तेव्हा तो मला म्हणाला; “मानवाच्या मुला, जे काही मी तुला बजावले आहे ते आपल्या मानात साठवून घे आणि आपल्या कानांनी त्यांचे ऐक!
11 Un ej pie tiem aizvestiem, pie savu ļaužu bērniem, un runā uz tiem un saki uz tiem: tā saka Tas Kungs Dievs; - vai tie nu klausa, vai neklausa.
११मग गुलामांकडे तुझ्या लोकांजवळ जा आणि त्यांच्याशी बोल; ते ऐको किंवा न ऐको, परमेश्वर देव असे सांगतो”
12 Tad Tas Gars mani pacēla, un es dzirdēju aiz sevis liela trokšņa balsi, kad Tā Kunga godība pacēlās no savas vietas,
१२देवाच्या आत्म्याने मला वर उचलले, आणि माझ्या मागे मी भुकंपासारखा मोठा आवाज ऐकला, तो म्हणाला; त्याच्या स्थानातून परमेश्वर देवाचे गौरव धन्य आहे!
13 Un (es dzirdēju) to dzīvo spārnus, kas viens pie otra sniedzās, un to skrituļu rībēšanu viņiem līdzās un liela trokšņa skaņu.
१३ऐकमेकांना स्पर्श करणाऱ्या जिवंत प्राण्यांचा आवाज त्या नंतर मी ऐकला व त्यांच्या बरोबर चाकांचा आवाज व मोठ्या भुकंपाचाही आवाज होत होता!
14 Tad Tas Gars mani pacēla un mani aizņēma, un es gāju rūgts sava gara karstumā, bet Tā Kunga roka bija pār mani stipra.
१४देवाच्या आत्म्याने मला उंच केले व वर नेले आणि माझ्या आत्म्यात कडवट पण घेऊन आलो, परमेश्वर देवाचा हात सामर्थ्याने माझ्यावर आला!
15 Un es nonācu uz Telabību pie tiem aizvestiem, kas dzīvoja pie Ķebaras upes, un paliku tur, kur tie dzīvoja, un paliku tur viņu vidū septiņas dienas ļoti noskumis.
१५तेल-अबीब या ठिकाणी मी गुलामांकडे गेलो, जे खबार ओढ्याच्या शेजारी राहत होते, आणि मी तेथे सात दिवस राहिलो आणि चकीत होऊन व्यापून गेलो.
16 Un pēc septiņām dienām Tā Kunga vārds uz mani notika sacīdams:
१६मग सातव्या दिवसानंतर परमेश्वर देवाचे वचन मला मिळाले, आणि म्हणाले,
17 Cilvēka bērns, Es tevi esmu licis par sargu Israēla namam, ka tev no Manas mutes būs klausīties to vārdu un viņiem no Manas puses piekodināt.
१७“मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घरण्यावर पहारा देण्यासाठी नेमलेले आहे, म्हणून माझ्या तोंडचा शब्द ऐकून घे व त्यांना सावध कर!
18 Kad Es saku uz bezdievīgo: tu mirdams mirsi, - un tu viņu nepamāci un nerunā, ka tu bezdievīgo atgriezi no viņa bezdievīgā ceļa un viņu paturi dzīvu, tad bezdievīgais nomirs savā noziegumā, bet viņa asinis Es prasīšu no tavas rokas.
१८‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यांना बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून, तू त्यास बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.
19 Bet kad tu bezdievīgo pamāci un viņš neatgriežas no savas bezdievības un no sava bezdievīgā ceļa, tad viņš nomirs savā noziegumā, bet tu savu dvēseli esi izglābis.
१९परंतू जर दुष्टाला त्याच्या मार्गापासून सावध केले, आणि तो आपल्या दुष्ट मार्गापासून किंवा कामापासून मागे वळला नाही तर तो त्याच्या पापात मरेल; मग त्याचा जाब तुझ्याकडे विचारला जाणार नाही.
20 Un kad taisnais nogriežas no savas taisnības un dara ļaunu, tad Es viņam likšu piedauzīties, un tas mirs; kad tu viņu neesi pamācījis, tad viņš nomirs savos grēkos, un viņa taisnība, ko viņš darījis, netaps pieminēta, bet viņa asinis Es prasīšu no tavas rokas.
२०जर देवभीरु व्यक्ती आपल्या देवाच्या भयापासून व कार्यापासून अधम वागेल, तर मी त्याच्या पुढे अडखळण ठेवेल, आणि तो मरेल जर तू त्यास सावध केले नाही, तो त्याच्या पापात मरेल, आणि त्याने केलेले धार्मिक काम आठवले जाणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाब मी तुला विचारेन.”
21 Bet kad tu taisno pamāci, ka tam taisnam nebūs grēkot, un viņš negrēko, tad viņš tiešām dzīvos, tāpēc ka tas ir tapis pamācīts, un tu savu dvēseli esi izglābis.
२१परंतू जर तू देवभीरु मनुष्यास पाप करण्यापासून सावध करशील, तो निश्चित वाचेल; आणि त्याचा जाब तुला विचारला जाणार नाही.
22 Un Tā Kunga roka bija tur uz manis, un Viņš uz mani sacīja: celies, ej ārā ielejā, un tur Es ar tevi runāšu.
२२मग परमेश्वर देवाचा हात माझ्यावर आला, आणि तो मला म्हणाला, “उठ आणि दरीत जा, तेथे मी तुझ्याशी बोलेन!”
23 Tad es cēlos un izgāju ielejā, un redzi, tur stāvēja Tā Kunga godība, tā kā tā godība, ko es biju redzējis pie Ķebaras upes. Un es nokritu uz savu vaigu.
२३मी उठलो आणि दरीत खबार नदीजवळ गेलो, परमेश्वर देवाचे गौरव तेथे प्रकाशत होते; तेथे मी उपडा पडलो.
24 Tad gars nāca iekš manis un mani cēla kājās, un Viņš runāja uz mani un sacīja uz mani: ej, ieslēdzies savā namā.
२४देवाच्या आत्म्याने येऊन मला तेव्हा माझ्या पाया वर उभे केले; आणि माझ्याशी बोलला, व म्हणाला, जा आणि स्वतःला आपल्या घरात बंद करून ठेव,
25 Un redzi, tu cilvēka bērns, tev apliks virves, un tevi ar tām saistīs, un tu no tām nevarēsi noiet viņu vidū.
२५आता, मानवाच्या मुला, ते तुला दोरीने बांधतील म्हणून त्याच्यामध्ये तू बाहेर जाऊ शकणार नाही.
26 Un Es tavai mēlei likšu pielipt pie zoda, un tu paliksi mēms un tiem nebūsi par pārmācītāju; jo tie ir atkāpēju suga.
२६तुझी जीभ टाळूला चिकटेल असे मी करेन आणि तू मुका होशील त्यांना धमकावु शकणार नाहीस, कारण ते फितुर घराणे आहे.
27 Bet kad Es ar tevi runāšu, tad Es atdarīšu tavu muti, un tev būs sacīt uz tiem: tā saka Tas Kungs Dievs! Kas klausa, lai klausa, un kas neklausa, lai neklausa; jo tie ir atkāpēju suga.
२७पण जेव्हा मी तुझ्याशी बोलेन तेव्हा तुझे तोंड मी उघडीन व परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, ज्याला ऐकायचे असेल त्याने ऐकावे ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये कारण ते फितुर घराणे आहे.

< Ecechiela 3 >