< Ecechiela 21 >
1 Un Tā Kunga vārds uz mani notika sacīdams:
१मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
2 Cilvēka bērns, griez savu vaigu pret Jeruzālemi, un lai (tava valoda) pil pret tām svētām vietām un sludini pret Israēla zemi.
२मानवाच्या मुला आपले तोंड यरूशलेमेकडे कर आणि पवित्र ठिकाणा विषयी इस्राएलाच्या भूमी विरुध्द भविष्यवाणी कर.
3 Un saki uz Israēla zemi: tā saka Tas Kungs: redzi, Es pret tevi celšos un izvilkšu Savu zobenu no makstīm un izsakņošu no tevis taisnus un bezdievīgus.
३इस्राएलाच्या भूमिला सांग, परमेश्वर देव म्हणतो; पाहा! मी तुझ्या विरुध्द आहे, मी शेथापासून आपली तलवार म्यानातून उपसून घेऊन तुझ्यापासून धर्मिकाला आणि दुर्जनाला वेगळे करीन.
4 Lai Es nu no tevis izdeldu gan taisnus gan bezdievīgus, tad Mans zobens no savām makstīm izlēks pret visu miesu no dienvidiem līdz ziemeļiem.
४माझ्या क्रमाने नीतिमान आणि दुर्जन तुझ्यापासून वेगळे करेन, माझी तलवार म्यानातून निघून शेथापासून सर्व जीवा विरूद्ध उत्तर दक्षिण भागात बाहेर पडेल
5 Un visa miesa atzīs, ka Es, Tas Kungs, esmu izvilcis Savu zobenu no makstīm; tas atkal vairs netaps iebāzts.
५मग सर्व जीवांना कळेल मी परमेश्वर देव आहे. मी शेथा जवळ तलवार ठेवली आहे. ती परत म्यानात जाणार नाही.
6 Bet tu, ak cilvēka bērns, nopūties! Ar satriektiem gurniem un rūgtās skumjās nopūties priekš viņu acīm.
६आणि तू, मानवाच्या मुला, कंबर मोडल्याप्रमाणे उसासा टाक, त्यांच्या नजरे देखत कष्टाने कण्हत राहा.
7 Un kad tie uz tevi sacīs: ko tu vaidi? Tad tev būs sacīt: tās baumas dēļ ka tā nāk, un visas sirdis izkusīs, un visas rokas nogurs, un visa drošība zudīs, un visi ceļi sašļuks; redzi, tā nāks un notiks, saka Tas Kungs Dievs.
७मग ते तुला विचारतील काय झाले? तू का विव्हळतोस? मग तू त्यांना सांग कारण अशी बातमी येत आहे, प्रत्येक हृदय क्षीण होईल, प्रत्येक हात अडखळेल आणि प्रत्येक गुडघा पाणी पाणी होईल, पाहा! असे घडून येत आहे आणि ते तसेच होईल “असे परमेश्वर देव जाहीर करीत आहे.”
8 Un Tā Kunga vārds notika uz mani sacīdams:
८मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
9 Cilvēka bērns, sludini un saki: tā saka Tas Kungs: saki: zobens, zobens ir trīts un asināts.
९मानवाच्या मुला, भाकीत कर आणि म्हण असे परमेश्वर देव सांगत आहे, तलवारीला धार लावा आणि त्यास चकाकीत करा.
10 Tas ir trīts, lai kautin kauj, tas ir asināts, lai spīd kā zibens. Vai tad mums būs priecāties, Mana dēla(Jūda) scepteris nicina visus kokus?
१०मारुन टाकण्यासाठी हत्याराला धारधार करा; तिला चकाकीत करा; आमच्या पुत्राच्या राजदंडाचा आम्ही उत्सव करु? जी तलवार येईल ती सर्व दंडाला कमी लेखते.
11 Un Viņš to (zobenu) devis, lai gludina(spodrina) ka to ņem rokā; tas zobens ir trīts un asināts, lai kāvējam to dod rokā.
११मग तलवारीला चकाकीत होण्यासाठी सोपवून दिली, आणि मग आपल्या हातांनी जप्ती केली. तलवारीला धार लावली आणि चकाकीत केली ठार मारणाऱ्या पुरुषाच्या हाती दिली.
12 Kliedz un kauc, cilvēka bērns! Jo tas celsies pret Maniem ļaudīm, tas celsies pret visiem Israēla valdniekiem; zobenam tie nodoti līdz ar Maniem ļaudīm; tādēļ sit uz saviem gurniem.
१२मानवाच्या मुला, मदतीसाठी हाक मार आक्रोश कर कारण ती तलवार माझ्या लोकांवर आली आहे, ती इस्राएलाच्या वडीलांवर आली आहे ज्याकडे तलवार भिरकावली, ते माझे लोक आहे त्यामुळे अतितीव्र दुःखाने आपली छातीपीट कर.
13 Tiešām, tas zobens ir pārbaudīts; un kas būs, kad tas scepteris, kas nicina, iznīks? saka Tas Kungs Dievs.
१३तेथे खटला भरला पण ज्याकडे राजदंड आहे त्याने शेवट केला नाही? हे परमेश्वर देव सांगत आहे.
14 Tad nu tu, cilvēka bērns, sludini un sasit rokas, jo tas zobens nāks ar divkārtīgu spēku trešo reiz, kaujams zobens, tas lielais kaujamais zobens, tiem visapkārt.
१४आता तू मानवाच्या मुला, भाकीत कर आणि आपल्या दोन्ही हातांनी टाळी दे यास्तव तलवार तिसऱ्यांदा चालून येईन. ती तलवार अनेकांना ठार मारण्यास, सगळीकडे भेदून पार करण्यासाठी आहे.
15 Lai sirds izkūst un kritušo ir daudz, visos viņu vārtos Es sūtu draudošu zobenu. Ak, tas ir taisīts, lai zib, un ir trīts, lai kauj!
१५त्याच्या हृदयाचे पाणी पाणी होण्यास आणि अनेकांना अडखळण होण्यासाठी त्यांच्या वेशीवर ठार मारण्यासाठी तलवारी सिध्द केल्या आहे. आहाहा! तिला विजेसारखी चमकवली आहे, ती कसाई सारखी उपसली आहे.
16 Cērt spēcīgi, sit pa labo roku, griezies, sit pa kreiso roku, kurp tavs asmens griežas.
१६हे तलवारी, जशी तू आपले मुख फिरवशील तशी उजवीकडे डावीकडे तुझ्या मर्जी प्रमाणे वळवली जा.
17 Arī Es pats sasitīšu Savas rokas un izdarīšu Savu bardzību; Es, Tas Kungs, to esmu runājis.
१७मी सुध्दा टाळी वाजवून आपल्या त्वेषाला शांत करेन, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
18 Un Tā Kunga vārds notika uz mani sacīdams:
१८परमेश्वर देवाचा शब्द पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला.
19 Tu tad, ak cilvēka bērns, taisi sev divus ceļus, pa kuriem Bābeles ķēniņa zobenam jānāk; no vienas zemes tiem abiem būs iziet. Taisi roku(virziena rādītājs) ceļa iesākumā, kas rāda uz pilsētu.
१९आता तू मानवाच्या मुला बाबेलाच्या राजाची तलवार येण्यासाठी दोन मार्ग सिध्द कर, दोन्ही मार्गाची सुरुवात एकाच ठिकाणी होईल, दिशादर्शक दगड शहराकडे निर्देश करेल.
20 Taisi ceļu, pa ko tas zobens lai nāk pret Amona bērnu Rabu un (otru) pret Jūdu uz stipro Jeruzālemes pilsētu.
२०एका मार्गाला बाबेलाच्या सेन्यासाठी खुण करून ठेवा अम्मोनीच्या मुलाकडे राब्बा जवळ येण्यासाठी मार्ग सिध्द करा, दुसरी खुण यरूशलेमेच्या शहरा जवळ यहूदाच्या सेन्याकडे तट बंदीकडे निर्देश करा.
21 Jo Bābeles ķēniņš stāvēs uz ceļa jūtīm, kur tie divi ceļi šķirās, ar zīlēšanu zīlēdams, viņš metīs bultas, viņš vaicās elkadievus, viņš apraudzīs (upuru)aknas.
२१वाडीत बाबेलचा राजा रस्ता ओलांडण्यासाठी थांबेल, भविष्यकथन मिळवून घेण्यासाठी तो काही बाण हलवून मूर्ती पासून मार्गदर्शन मागेल, काळजावरुन तो तपासणी करेल.
22 Tā zīlēšana zīmēs pa viņa labo roku uz Jeruzālemi, tur pievest āžus, atvērt muti uz kliegšanu, pacelt balsi uz kara troksni, likt āžus pret vārtiem, uzmest vaļņus un uztaisīt bulverķus.
२२यरूशलेमेबद्दल पुढे घडून येणारी गोष्ट त्याच्या उजव्या हातात असेल, किल्ल्याचे दरवाजे फोडण्याचे हत्यार त्याविरूद्ध असेल, त्यांच्या तोंडातून मारण्याचा, युध्दाची ओरड! त्यासाठी हत्यार वेशीसाठी तयार केले, त्यासाठी मातीचे टेकाड बुरुज बांधावे.
23 Šī būs kā aplama zīlēšana viņu acīs, tās zvērēšanas dēļ kas viņiem zvērēta; bet Viņš pieminēs to noziegumu un tos gūstīs.
२३पुढे घडून येणारी ती उपयोग हीन बाब दिसून येईल, यरूशलेमपैकी एक, ज्याच्याकडे तलवार व तोंडात बाबेलांची शपथ आहे. पण त्याच्या वेढ्याच्या पुढे राजा उल्लंघन करणारा तहाचा आरोप केला जाईल.
24 Tādēļ tā saka Tas Kungs Dievs: Tāpēc ka jūs savus noziegumus esat atgādinājuši, savus pārkāpumus atklādami, tā ka jūsu grēki top redzēti visos jūsu darbos; tāpēc ka jūs topat pieminēti, tad jūs ar rokām tapsiet gūstīti.
२४यास्तव परमेश्वर देव हे सांगत आहे, कारण तुझे अपराध माझ्यापुढे स्मरण केले जाईल, तुझे अपराध प्रकट केले जातील; तुझी पापे तुझ्या सर्व कृतीतून दर्शीवीली जातील, यास्तव तू सर्वांच्या स्मरणात राहून आपल्या शत्रुच्या तावडीत सापडशील.
25 Un tu, nesvētais, bezdievīgais Israēla valdnieks, kam pienākusi sava diena, kurā noziegumi beidzās,
२५तू पवित्रते बद्दल अनादर दाखवला आणि दुष्ट इस्राएलचे शास्ते त्यांच्यावर शासन करण्याचा दिवस येत आहे, त्याने केलेल्या अपराधांचा समय संपला आहे.
26 Tā saka Tas Kungs Dievs: liec nost galvas glītumu un ņem zemē kroni, jo tas nepaliks, kā tas bija: zemais tiks paaugstināts un augstais pazemots.
२६प्रभू परमेश्वर देव हे सांगत आहे. आपल्या डोक्यावरील पगडी मुकुट बाजुला सारा, सर्व काही एक समान राहाणार नाही, जे उंचावलेले नमवले जातील आणि नम्र उंच केले जातील.
27 Es to likšu postā, postā, postā, un šī nebūs, līdz kamēr nāk, kam tā tiesa pieder, - tam Es to došu.
२७मी सगळ्यांची नासाडी, नासाडी, नासाडी करेन, जमाव उरणार नाही, ज्याला हक्क आहे त्यास तो मिळेल.
28 Un tu, cilvēka bērns, sludini un saki: tā saka Tas Kungs Dievs par Amona bērniem un par viņu nievāšanu un saki: zobens, zobens izvilkts, lai kauj, trīts, lai spīd un zib.
२८तर मग तू मानवाच्या मुला भाकीत कर आणि बोल; परमेश्वर देव हे सांगत आहे, अम्मोनच्या मुलांविषयी जो कलंक आहे तो त्यावर येत आहे. तलवार उचलली आहे ती अधाशीपणे ठार मारण्यासाठी तेजधार केली आहे ती विजेप्रमाणे चकाकत आहे.
29 Kamēr tev aplamas parādīšanas rāda, kamēr tev melus sludina, tas tevi liks pie nokauto nesvēto kakliem, kuru diena nāk gala nozieguma laikā.
२९ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.
30 Bāz zobenu makstīs! Es tevi sodīšu tai vietā, kur tu radīts, tai zemē, kur tu dzimis.
३०तलवार म्यानात जाईल, तू ज्या ठिकाणी जन्मला तुझी जेथे सुरुवात झाली त्या भूमिवर मी तुझा न्याय करेन.
31 Un Es izgāzīšu pār tevi Savu dusmību, Es uzpūtīšu pret tevi Savas bardzības uguni, un tevi nodošu nežēlīgu cilvēku, niknu postītāju rokā.
३१मी तुझ्यावर माझा कोपाग्नीचा संताप ओतेन आणि तुला क्रुर कोशल्याने हानी करण्यास लोकांच्या ताब्यात देईन.
32 Tu būsi ugunij par barību, tavas asinis tecēs pašā tavā zemē, un tevi vairs nepieminēs; jo Es Tas Kungs to esmu runājis.
३२तू अग्नीसाठी इंधन होशील; तुझे रक्त भूमिच्या मध्यभागी सांडले जाईल. तुझे स्मरण पुन्हा केले जाणार नाही. “मी परमेश्वर देव हे जाहीर करत आहे.”