< Apustuļu Darbi 28 >

1 Un kad tie bija izglābti, tad tie dabūja zināt, ka tā sala tapa saukta Melite.
जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले, तेव्हा आम्हास कळले की, त्या बेटाचे नाव मिलिता असे आहे.
2 Un tie salas ļaudis mums parādīja lielu laipnību; jo tie uguni uzkūruši mūs visus uzņēma, tā lietus dēļ kas bija sācis līt, un tā aukstuma dēļ.
तेथील रहिवाश्यांनी आम्हास अतिशय ममतेने वागविले, त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागाला होता व थंडीही होती.
3 Un kad Pāvils kādu žagaru nastiņu bija salasījis un pie uguns pielicis, tad viena odze no tā karstuma izlīda un ap viņa roku aptinās.
पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला, उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला.
4 Un kad tie salas ļaudis to tārpu redzēja pie viņa rokas karājamies, tad tie sacīja savā starpā: šis cilvēks tiešām ir slepkava, kam no jūras izglābtam atriebšana neļauj dzīvot.
ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे, समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही.”
5 Bet viņš to tārpu nokratīja ugunī un neko ļauna necieta.
परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पौलाला काही अपाय झाला नाही.
6 Un tie gaidīja, ka tas uztūktu, vai piepeši nomiris pakristu; bet kad tie ilgi bija gaidījuši un redzēja, ka nekāds ļaunums viņam nenotika, tad tiem citas domas nāca, un tie sacīja, viņu esam dievu.
त्या बेटावरील लोकांस पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते, बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले.
7 Un ap to pašu vietu tam salas virsniekam, ar vārdu Publijus, bija muiža; tas mūs uzņēma un trīs dienas laipni kopa.
तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती, पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता, त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला.
8 Un notikās, ka Publijus tēvs ar drudzi un ar asins sērgu sirga; pie tā Pāvils iegāja un Dievu pielūdzis rokas tam uzlika un to darīja veselu.
पुब्ल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते, पौल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले.
9 Kad nu tas bija noticis, tad arī tie citi atnāca, kam tanī salā bija sērgas, un tapa dziedināti.
हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.
10 Tie arīdzan mūs ar lielu godu pagodināja, un kad mēs aizcēlāmies, tie deva, ko mums vajadzēja.
१०त्यांनी आम्हास सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या आणि जेव्हा आम्ही परत प्रवासास निघालो तेव्हा आम्हास लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या.
11 Un pēc trim mēnešiem aizcēlāmies ar laivu, kas bija no Aleksandrijas un tanī salā pa ziemu bija mitusi, un kam par zīmi bija dvīņi.
११आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो, ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते, त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते.
12 Un uz Sirakuzu nākuši, mēs tur palikām trīs dienas.
१२मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहचलो आणि तेथे तीन दिवस राहिलो.
13 No turienes atkal aizcēlušies, mēs nācām uz Reģiu; un kad pēc vienas dienas dienasvidus vējš cēlās, tad nācām otrā dienā uz Puteoliem.
१३तेथून शिडे उभारून आम्ही निघालो आणि रेगियोन नगराला गेलो, तेथे एक दिवस मुक्काम केला, नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो.
14 Tur mēs atradām brāļus un no tiem tapām lūgti, septiņas dienas pie tiem palikt, un tā mēs nācām uz Romu.
१४त्या शहरात आम्हास काही बंधुजन भेटले, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तेथे सात दिवस राहिलो, मग आम्ही रोम येथे जाऊन पोहचलो.
15 Un no turienes tie brāļi, par mums dzirdējuši, izgāja mums pretī līdz Appijus tirgum un TriTabernām; tos redzēdams, Pāvils Dievam pateicās un ņēmās drošu prātu.
१५तेथील बंधूनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती, ते आमच्या भेटीसाठी अप्पियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले, पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले व त्यास धीर आला.
16 Un kad mēs nācām uz Romu, tad tas kapteinis tos saistītos nodeva tam karavaldniekam, bet Pāvilam vaļa tapa dota, savrup palikt ar kādu karavīru, kas viņu sargāja.
१६आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला.
17 Un notikās pēc trim dienām, ka Pāvils Jūdu priekšniekus saaicināja. Un kad tie bija kopā sanākuši, viņš uz tiem sacīja: ‘Vīri, brāļi, es neko neesmu darījis ne pret šiem ļaudīm, ne pret tēvu ieradumiem un tomēr saistīts no Jeruzālemes esmu nodots Romiešu rokās.
१७तीन दिवसानंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले, जेव्हा सर्वजण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुद्ध मी काहीही केलेले नाही, तरी मला यरूशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले.
18 Tie izjautājuši gribēja mani atlaist, tādēļ ka nekādas nāves vainas pie manis nebija.
१८आणि जेव्हा त्यांनी माझी चौकशी केली, तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती, कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता.
19 Bet kad tie Jūdi pretī runāja, tad tapu spiests, ķeizaru piesaukt, tomēr ne tā, ka man būtu ko sūdzēt pret savu tautu.
१९परंतु यहूदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली, तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले, याचा अर्थ असा नाही की, यहूदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे.
20 Tad nu šās lietas dēļ es jūs esmu lūdzis, ka dabūtu jūs redzēt un ar jums runāt. Jo Israēla cerības dēļ es ar šīm ķēdēm esmu saistīts.”
२०या कारणासाठी तुम्हास भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली, कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळ्यांनी जखडलो गेलो आहे.”
21 Bet tie uz viņu sacīja: “Mēs neesam nedz grāmatas par tevi no Jūdu zemes dabūjuši, nedz arī kāds no tiem atnākušiem brāļiem par tevi ko ļauna ir sludinājis jeb runājis.
२१यहूदी पुढारी पौलाला म्हणाले, “आम्हास तुमच्याबाबत यहूदीयाहून कसलेही पत्र आलेले नाही, अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही.”
22 Tomēr mēs gribam no tevis dzirdēt, ko tu domā; jo no šās draudzes mums ir zināms, ka tai visās malās top pretī runāts.”
२२परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे, कारण या गटाविरुद्ध सगळीकडे लोक बोलतात हे आम्हास माहीत आहे.
23 Un kad tie viņam vienu dienu bija nolikuši, tad daudzi nāca pie viņa mājas vietā; tiem viņš Dieva valstību apliecināja un izstāstīja, tos pārliecinādams par Jēzu no rīta agri līdz vakaram.
२३तेव्हा यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले, तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली, मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला, हे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.
24 Un citi gan tapa pārliecināti caur to, ko viņš sacīja, bet citi neticēja.
२४त्याने फोड करून सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.
25 Un nebūdami savā starpā vienprātīgi, tie aizgāja, kad Pāvils to vienu vārdu bija sacījis: “Tas Svētais Gars gan labi caur pravieti Jesaju ir runājis uz mūsu tēviem,
२५पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काहीजण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता.”
26 Sacīdams: “Noej pie šiem ļaudīm un saki: ar ausīm jūs dzirdēsiet un nesapratīsiet, un redzēdami jūs redzēsiet un nenomanīsiet.
२६या लोकांकडे तुम्ही जा आणि त्यांना सांगाः तुम्ही ऐकाल तर खरेपण तुम्हास समजणार नाही, तुम्ही पहाल तुम्हास दिसेल पण तुम्ही काय पाहत ते तुम्हास कळणार नाही.
27 Jo šo ļaužu sirds ir tapusi cieta, un ar ausīm tie grūti dzird un snauž ar savām acīm, ka tie ar acīm neredz un ar sirdi nesaprot un neatgriežas, ka Es tos dziedinātu.”
२७कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते.
28 Tad nu jums būs zināt, ka pagāniem Dieva pestīšana ir sūtīta, un tie to dzirdēs.”
२८म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्रीयांकडे लोकांकडे पाठविण्यात आले आहे, हे तुम्हा यहूदी लोकांस कळावे, ते ऐकतील.
29 Un kad viņš to bija sacījis, tad tie Jūdi aizgāja, savā starpā daudz apjautādamies.
२९तो असे बोलल्यावर यहूदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले.
30 Un Pāvils palika divus gadus savā īpaši īrētā mājas vietā, un visus pieņēma, kas pie viņa nāca,
३०पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला, जे त्यास भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी.
31 Dieva valstību sludinādams un par To Kungu Jēzu Kristu mācīdams ar visu drošību bez aizliegšanas.
३१त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यात अडवू शकले नाही.

< Apustuļu Darbi 28 >