< Liber Numeri 28 >
1 dixit quoque Dominus ad Mosen
१परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,
2 praecipe filiis Israhel et dices ad eos oblationem meam et panes et incensum odoris suavissimi offerte per tempora sua
२इस्राएल लोकांस आज्ञा दे आणि त्यांना सांग की, माझे अर्पण, म्हणजे मला मधुर सुवासाची अग्नीतून केलेली माझी अर्पणे यासाठी माझे अन्न, तुम्ही त्यांच्या नेमलेल्या वेळी अर्पणे करण्यास जपा.
3 haec sunt sacrificia quae offerre debetis agnos anniculos inmaculatos duos cotidie in holocaustum sempiternum
३आणखी तू त्यांना सांग, अग्नीतून केलेले अर्पण त्यांनी परमेश्वरास अर्पावे ते हे आहेः त्यांनी नेहमी होमार्पणासाठी रोज एक एक वर्षाची दोन निर्दोष नर कोकरे.
4 unum offeretis mane et alterum ad vesperam
४एक कोकरू सकाळी आणि दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.
5 decimam partem oephi similae quae conspersa sit oleo purissimo et habeat quartam partem hin
५हातकुटीच्या पाव हिन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.
6 holocaustum iuge est quod obtulistis in monte Sinai in odorem suavissimum incensi Domini
६हे नित्याचे होमार्पण, सीनाय पर्वतावर नेमलेले, परमेश्वरास सुवासासाठी अग्नीतून केलेले असे अर्पण आहे.
7 et libabitis vini quartam partem hin per agnos singulos in sanctuario Domini
७त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे.
8 alterumque agnum similiter offeretis ad vesperam iuxta omnem ritum sacrificii matutini et libamentorum eius oblationem suavissimi odoris Domino
८दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. जसे सकाळचे अन्नार्पणाप्रमाणे व त्याबरोबरची पेयार्पणे तसे ते परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेले अर्पण असे अर्पण कर.
9 die autem sabbati offeretis duos agnos anniculos inmaculatos et duas decimas similae oleo conspersae in sacrificio et liba
९“प्रत्येक शब्बाथ दिवशी एक एक वर्षाचे दोन निर्दोष नर कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरची पेयार्पण ही अर्पावी.
10 quae rite funduntur per singula sabbata in holocausto sempiterno
१०नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण याखेरीज आणखी हा होमार्पण प्रत्येक शब्बाथ दिवशी अर्पावा.”
11 in kalendis autem id est in mensuum exordiis offeretis holocaustum Domino vitulos de armento duos arietem unum agnos anniculos septem inmaculatos
११प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वरास होमार्पणे करावे. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात.
12 et tres decimas similae oleo conspersae in sacrificio per singulos vitulos et duas decimas similae oleo conspersae per singulos arietes
१२प्रत्येक बैलामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ.
13 et decimam decimae similae ex oleo in sacrificio per agnos singulos holocaustum suavissimi odoris atque incensi est Domino
१३आणि प्रत्येक कोकराबरोबर अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. हे होमार्पण, मधुर सुवासाचे परमेश्वरास अग्नीतून केलेले अर्पण असे आहे.
14 libamenta autem vini quae per singulas fundenda sunt victimas ista erunt media pars hin per vitulos singulos tertia per arietem quarta per agnum hoc erit holocaustum per omnes menses qui sibi anno vertente succedunt
१४लोकांची पेयार्पणे ही प्रत्येक बैलाकरता अर्धा हीन, व प्रत्येक मेंढ्याकरता एकतृतीयांश हीन व प्रत्येक कोकऱ्याकरता एक चतुर्थाश हीन इतका द्राक्षरस असावा, वर्षातील प्रत्येक महिन्यात हे होमार्पण करावे.
15 hircus quoque offeretur Domino pro peccatis in holocaustum sempiternum cum libamentis suis
१५आणि निरंतरचे होमार्पण व त्याचे पेयार्पण याखेरीज परमेश्वरास पापार्पणासाठी शेरडातला एक बकरा अर्पावा.
16 mense autem primo quartadecima die mensis phase Domini erit
१६परमेश्वराचा वल्हांडण सण महिन्याच्या चौदाव्या दिवशी आहे.
17 et quintadecima die sollemnitas septem diebus vescentur azymis
१७बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.
18 quarum dies prima venerabilis et sancta erit omne opus servile non facietis in ea
१८या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करायचे नाही.
19 offeretisque incensum holocaustum Domino vitulos de armento duos arietem unum agnos anniculos inmaculatos septem
१९तुम्ही परमेश्वरास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत.
20 et sacrificia singulorum ex simila quae conspersa sit oleo tres decimas per singulos vitulos et duas decimas per arietem
२०त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांस एफा आणि त्या मेंढ्याच्यामागे दोन दशमांस एफा,
21 et decimam decimae per agnos singulos id est per septem agnos
२१आणि सात कोकरापैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे.
22 et hircum pro peccato unum ut expietur pro vobis
२२तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हास शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल.
23 praeter holocaustum matutinum quod semper offertis
२३सकाळचे होमार्पण जे निरंतरचे होमार्पण आहे त्याव्यतिरिक्त हे अर्पण करावे.
24 ita facietis per singulos dies septem dierum in fomitem ignis et in odorem suavissimum Domino qui surget de holocausto et de libationibus singulorum
२४याप्रमाणे वल्हाडणाचे सात दिवस दररोज परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेल्या अर्पणाचे अन्न अर्पण करा, निरंतरचे होमार्पणे आणि त्याचे पेयार्पण याव्यतिरिक्त हे अर्पण असावे.
25 dies quoque septimus celeberrimus et sanctus erit vobis omne opus servile non facietis in eo
२५नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि तुम्ही त्यादिवशी काहीही अंगमेहनीतीचे काम करू नये.
26 dies etiam primitivorum quando offertis novas fruges Domino expletis ebdomadibus venerabilis et sancta erit omne opus servile non facietis in ea
२६सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वरास नव्या अन्नाचे अर्पण कराल त्यावेळी तुम्ही एक पवित्र मेळा बोलवा त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनीतीचे काम करू नये.
27 offeretisque holocaustum in odorem suavissimum Domino vitulos de armento duos arietem unum et agnos anniculos inmaculatos septem
२७तुम्ही परमेश्वरास सुवासासाठी होमार्पणे म्हणून तुम्ही दोन गोऱ्हे, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करा.
28 atque in sacrificiis eorum similae oleo conspersae tres decimas per singulos vitulos per arietes duas
२८आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा व मेंढ्यामागे दोन दशमांश एफा द्यावे.
29 per agnos decimam decimae qui simul sunt agni septem hircum quoque
२९व त्या सात कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
30 qui mactatur pro expiatione praeter holocaustum sempiternum et liba eius
३०आणि तुम्हासाठी प्रायश्चित करायला एक बकरा अर्पावा.
31 inmaculata offeretis omnia cum libationibus suis
३१आणि निरंतरचे होमार्पण व अन्नार्पणाशिवाय ते अर्पण करावे. जेव्हा ते प्राणी तुम्हासाठी अर्पण करायचे ते निर्दोष असावे; त्याबरोबरची पेयार्पणे सुद्धा अर्पावी.