< Marcum 13 >
1 et cum egrederetur de templo ait illi unus ex discipulis suis magister aspice quales lapides et quales structurae
१मग येशू परमेश्वराच्या भवनातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एकजण त्यास म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे अद्भूत धोंडे व बांधलेली इमारत आहे.”
2 et respondens Iesus ait illi vides has omnes magnas aedificationes non relinquetur lapis super lapidem qui non destruatur
२येशू त्यास म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पाडला जाईल.”
3 et cum sederet in montem Olivarum contra templum interrogabant eum separatim Petrus et Iacobus et Iohannes et Andreas
३येशू परमेश्वराच्या भवनासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्यास एकांतात विचारले,
4 dic nobis quando ista fient et quod signum erit quando haec omnia incipient consummari
४“या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हास सांगा आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?”
5 et respondens Iesus coepit dicere illis videte ne quis vos seducat
५नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.
6 multi enim venient in nomine meo dicentes quia ego sum et multos seducent
६पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील.
7 cum audieritis autem bella et opiniones bellorum ne timueritis oportet enim fieri sed nondum finis
७जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या अफवाविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही.
8 exsurget autem gens super gentem et regnum super regnum et erunt terraemotus per loca et fames initium dolorum haec
८एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील आणि दुष्काळ पडतील. पण या गोष्टी म्हणजे केवळ नाशाची सुरूवात आहे.
9 videte autem vosmet ipsos tradent enim vos conciliis et in synagogis vapulabitis et ante praesides et reges stabitis propter me in testimonium illis
९तुम्ही सावध असा. ते तुम्हास न्यायसभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हास मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हास राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे रहावे लागेल.
10 et in omnes gentes primum oportet praedicari evangelium
१०या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे.
11 et cum duxerint vos tradentes nolite praecogitare quid loquamini sed quod datum vobis fuerit in illa hora id loquimini non enim estis vos loquentes sed Spiritus Sanctus
११ते तुम्हास अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल.
12 tradet autem frater fratrem in mortem et pater filium et consurgent filii in parentes et morte adficient eos
१२भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील.
13 et eritis odio omnibus propter nomen meum qui autem sustinuerit in finem hic salvus erit
१३आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल.
14 cum autem videritis abominationem desolationis stantem ubi non debet qui legit intellegat tunc qui in Iudaea sunt fugiant in montes
१४जेव्हा तुम्ही नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट, दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जो जिथे नको तेथे पाहाल. (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा) तेव्हा जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.
15 et qui super tectum ne descendat in domum nec introeat ut tollat quid de domo sua
१५जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये.
16 et qui in agro erit non revertatur retro tollere vestimentum suum
१६आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये.
17 vae autem praegnatibus et nutrientibus in illis diebus
१७त्या दिवसात ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पाजत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल.
18 orate vero ut hieme non fiant
१८हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा.
19 erunt enim dies illi tribulationes tales quales non fuerunt ab initio creaturae quam condidit Deus usque nunc neque fient
१९कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल.
20 et nisi breviasset Dominus dies non fuisset salva omnis caro sed propter electos quos elegit breviavit dies
२०परमेश्वराने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या मनुष्यांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.
21 et tunc si quis vobis dixerit ecce hic est Christus ecce illic ne credideritis
२१आणि जर कोणी तुम्हास म्हणेल की ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे,’ तर त्यावर विश्वास ठेवू नका.
22 exsurgent enim pseudochristi et pseudoprophetae et dabunt signa et portenta ad seducendos si potest fieri etiam electos
२२कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांस फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील.
23 vos ergo videte ecce praedixi vobis omnia
२३पहा, तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हास सर्वकाही सांगून ठेवले आहे.
24 sed in illis diebus post tribulationem illam sol contenebrabitur et luna non dabit splendorem suum
२४परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर, ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही.’
25 et erunt stellae caeli decidentes et virtutes quae sunt in caelis movebuntur
२५‘आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’
26 et tunc videbunt Filium hominis venientem in nubibus cum virtute multa et gloria
२६आणि लोक मनुष्याचा पुत्राला मेघांरूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील.
27 et tunc mittet angelos suos et congregabit electos suos a quattuor ventis a summo terrae usque ad summum caeli
२७नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशातून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील.
28 a ficu autem discite parabolam cum iam ramus eius tener fuerit et nata fuerint folia cognoscitis quia in proximo sit aestas
२८अंजिराच्या झाडापासून शिका. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हास उन्हाळा जवळ आला हे समजते.
29 sic et vos cum videritis haec fieri scitote quod in proximo sit in ostiis
२९त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हास समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे.
30 amen dico vobis quoniam non transiet generatio haec donec omnia ista fiant
३०मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.
31 caelum et terra transibunt verba autem mea non transibunt
३१स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
32 de die autem illo vel hora nemo scit neque angeli in caelo neque Filius nisi Pater
३२त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला ठाऊक आहे.
33 videte vigilate et orate nescitis enim quando tempus sit
३३सावध असा, प्रार्थनेत जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही.
34 sicut homo qui peregre profectus reliquit domum suam et dedit servis suis potestatem cuiusque operis et ianitori praecipiat ut vigilet
३४ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासास निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. तसे हे आहे.
35 vigilate ergo nescitis enim quando dominus domus veniat sero an media nocte an galli cantu an mane
३५म्हणून तुम्ही जागे असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हास माहीत नाही.
36 ne cum venerit repente inveniat vos dormientes
३६जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहील.
37 quod autem vobis dico omnibus dico vigilate
३७मी तुम्हास सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत राहा.”