< Colossenes 4 >
1 domini quod iustum est et aequum servis praestate scientes quoniam et vos Dominum habetis in caelo
१धन्यांनो, तुम्हांसही स्वर्गात धनी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा.
2 orationi instate vigilantes in ea in gratiarum actione
२प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यांत उपकारस्तुती करीत जागृत रहा.
3 orantes simul et pro nobis ut Deus aperiat nobis ostium sermonis ad loquendum mysterium Christi propter quod etiam vinctus sum
३आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे.
4 ut manifestem illud ita ut oportet me loqui
४म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे.
5 in sapientia ambulate ad eos qui foris sunt tempus redimentes
५बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या.
6 sermo vester semper in gratia sale sit conditus ut sciatis quomodo oporteat vos unicuique respondere
६तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.
7 quae circa me sunt omnia vobis nota faciet Tychicus carissimus frater et fidelis minister et conservus in Domino
७माझा प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्यासोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळवील.
8 quem misi ad vos ad hoc ipsum ut cognoscat quae circa vos sunt et consoletur corda vestra
८मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे.
9 cum Onesimo carissimo et fideli fratre qui est ex vobis omnia quae hic aguntur nota facient vobis
९मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यांतलाच आहे त्यालाही पाठवले आहे; ते तुम्हास येथील सर्व गोष्टी कळवतील.
10 salutat vos Aristarchus concaptivus meus et Marcus consobrinus Barnabae de quo accepistis mandata si venerit ad vos excipite illum
१०माझा सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हास सलाम सांगतो, तसाच बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हास सलाम सांगतो. (त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा.)
11 et Iesus qui dicitur Iustus qui sunt ex circumcisione hii soli sunt adiutores in regno Dei qui mihi fuerunt solacio
११युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे.
12 salutat vos Epaphras qui ex vobis est servus Christi Iesu semper sollicitus pro vobis in orationibus ut stetis perfecti et pleni in omni voluntate Dei
१२ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे रहावे.
13 testimonium enim illi perhibeo quod habet multum laborem pro vobis et pro his qui sunt Laodiciae et qui Hierapoli
१३तुम्हासाठी व जे लावदीकियात व हेरापलीत आहेत त्याच्यांसाठी तो फार श्रम करीत आहे, अशी त्याच्याविषयी मी साक्ष देतो.
14 salutat vos Lucas medicus carissimus et Demas
१४प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात.
15 salutate fratres qui sunt Laodiciae et Nympham et quae in domo eius est ecclesiam
१५लावदीकियातील बंधू आणि नुंफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम द्या.
16 et cum lecta fuerit apud vos epistula facite ut et in Laodicensium ecclesia legatur et eam quae Laodicensium est vos legatis
१६हे पत्र तुमच्यांत वाचून झाल्यावर की, लावदीकियातील मंडळीतही वाचले जावे आणि लावदीकियाकडील पत्र तुम्हीही वाचावे.
17 et dicite Archippo vide ministerium quod accepisti in Domino ut illud impleas
१७अर्खिपाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे.
18 salutatio mea manu Pauli memores estote vinculorum meorum gratia vobiscum amen
१८मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो.