< I Paralipomenon 27 >
1 filii autem Israhel secundum numerum suum principes familiarum tribuni et centuriones et praefecti qui ministrabant regi iuxta turmas suas ingredientes et egredientes per singulos menses in anno viginti quattuor milibus singuli praeerant
१ही इस्राएल वंशजांच्या घराण्यातील प्रमुखांची यादी म्हणजे हजारांचे व शंभरांचे सरदार, त्याचप्रमाणे सैन्याचे अधिकारी, हे राजाची सेवा अनेक मार्गाने करत. प्रत्येक सैन्याचा गट हे वर्षाच्या सर्व महिन्यात सेवा करत असे. प्रत्येक गटात चोवीस हजार माणसे होती.
2 primae turmae in primo mense Isboam praeerat filius Zabdihel et sub eo viginti quattuor milia
२पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा पुत्र. याशबामच्या गटात चोवीस हजार जण होते.
3 de filiis Phares princeps cunctorum principum in exercitu mense primo
३तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्यांचा याशबाम प्रमुख होता.
4 secundi mensis habebat turmam Dudi Ahohites et post se alterum nomine Macelloth qui regebat partem exercitus viginti quattuor milium
४अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा प्रमुख असून मिक्लोथ हा त्यांचा नायक होता. त्याच्या गटात चोवीस हजार माणसे होती.
5 dux quoque turmae tertiae in mense tertio erat Banaias filius Ioiadae sacerdos et in divisione sua viginti quattuor milia
५तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती बनाया. हा यहोयादाचा पुत्र. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली चोवीस हजार माणसे होती.
6 ipse est Banaias fortissimus inter triginta et super triginta praeerat autem turmae ipsius Amizabad filius eius
६हाच तो बनाया जो तीसांतला शूर व तीसांवर प्रमुख होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात होता.
7 quartus mense quarto Asahel frater Ioab et Zabadias filius eius post eum et in turma eius viginti quattuor milia
७चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती यवाबाचा भाऊ असाएल. त्यानंतर त्याचा पुत्र जबद्या हा पुढे आपल्या सेनापती झाला. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
8 quintus mense quinto princeps Samaoth Iezarites et in turma eius viginti quattuor milia
८शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
9 sextus mense sexto Hira filius Acces Thecuites et in turma eius viginti quattuor milia
९इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशाचा पुत्र असून तकोई नगरातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
10 septimus mense septimo Helles Phallonites de filiis Ephraim et in turma eius viginti quattuor milia
१०सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलस पलोनी हा होता. हा एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
11 octavus mense octavo Sobochai Asothites de stirpe Zarai et in turma eius viginti quattuor milia
११आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हूशाथी हा होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार जण होते.
12 nonus mense nono Abiezer Anathothites de filiis Iemini et in turma eius viginti quattuor milia
१२नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबीयेजर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात चोवीस हजार सैनिक होते.
13 decimus mense decimo Marai et ipse Netophathites de stirpe Zarai et in turma eius viginti quattuor milia
१३दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
14 undecimus mense undecimo Banaias Pharathonites de filiis Ephraim et in turma eius viginti quattuor milia
१४अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या गटात चोवीस हजार पुरुष होते.
15 duodecimus mense duodecimo Holdai Netophathites de stirpe Gothonihel et in turma eius viginti quattuor milia
१५बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
16 porro tribubus praeerant Israhel Rubenitis dux Eliezer filius Zechri Symeonitis dux Saphatias filius Macha
१६इस्राएलाच्या वंशाचे हे प्रमुख असे होते: रऊबेन जिख्रीचा पुत्र अलियेजर. शिमोन: माकाचा पुत्र शफट्या.
17 Levitis Asabias filius Camuhel Aaronitis Sadoc
१७लेवी कमुवेलचा पुत्र हशब्या. अहरोन: सादोक.
18 Iuda Heliu frater David Isachar Amri filius Michahel
१८यहूदा अलीहू. हा दावीदाचा एक भाऊ, इस्साखार: मीखाएलचा पुत्र अम्री.
19 Zabulonitis Iesmaias filius Abdiae Nepthalitibus Ierimoth filius Ozihel
१९जबुलून ओबद्याचा पुत्र इश्माया. नफताली: अज्रीएलाचा पुत्र यरीमोथ.
20 filiis Ephraim Osee filius Ozaziu dimidio tribus Manasse Iohel filius Phadiae
२०एफ्राईम वंशाचा अजऱ्याचा पुत्र होशेथ. पश्चिम मनश्शेः पदायाचा पुत्र योएल.
21 et dimidio tribus Manasse in Galaad Iaddo filius Zacchariae Beniamin autem Iasihel filius Abner
२१गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखऱ्याचा पुत्र इद्दो. बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेरचा पुत्र यासीएल.
22 Dan vero Ezrihel filius Hieroam hii principes filiorum Israhel
२२दान वंशाचा यरोहामाचा पुत्र अजरेल. हे झाले इस्राएलांच्या वंशाचे प्रमुख.
23 noluit autem David numerare eos a viginti annis inferius quia dixerat Dominus ut multiplicaret Israhel quasi stellas caeli
२३दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलाची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे परमेश्वराने सांगितले होते म्हणून इस्राएलांची लोकसंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे पुरुष यांची मोजणी केली नाही.
24 Ioab filius Sarviae coeperat numerare nec conplevit quia super hoc ira inruerat in Israhel et idcirco numerus eorum qui fuerant recensiti non est relatus in fastos regis David
२४सरुवेचा पुत्र यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलाच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही मोजणी दावीद राजाच्या बखरीत नोंदवलेली नाही.
25 super thesauros autem regis fuit Azmoth filius Adihel his autem thesauris qui erant in urbibus et in vicis et in turribus praesidebat Ionathan filius Oziae
२५राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे: अदीएलाचा पुत्र अजमावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. उज्जीयाचा पुत्र योनाथान शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या आणि किल्ल्यातल्या भांडारांचा प्रमुख होता.
26 operi autem rustico et agricolis qui exercebant terram praeerat Ezri filius Chelub
२६कलूबचा पुत्र एज्री हा शेतात काम करणाऱ्यांवरचा प्रमुख होता.
27 vinearumque cultoribus Semeias Ramathites cellis autem vinariis Zabdias Aphonites
२७रामा येथील शिमी रामाथी हा द्राक्षीच्या मळ्यांवर होता. द्राक्षीच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षरसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता.
28 nam super oliveta et ficeta quae erant in campestribus Balanan Gaderites super apothecas autem olei Ioas
२८गदेरी हा बाल-हानान जैतूनाची झाडे आणि पश्चिमेकडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनाच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.
29 porro armentis quae pascebantur in Sarona praepositus fuit Setrai Saronites et super boves in vallibus Saphat filius Adli
२९आणि शित्रय शारोनी हा शारोनात चरणाऱ्या गुरांचा मुख्य होता. अदलयचा पुत्र शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.
30 super camelos vero Ubil Ismahelites et super asinos Iadias Meronathites
३०ओबील इश्माएली हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथ गाढवांवर मुख्य होता.
31 super oves quoque Iaziz Agarenus omnes hii principes substantiae regis David
३१याजीज हगारी मेंढरांवर मुख्य होता. दावीद राजाच्या मालमत्तेचे हे सर्व अधिकारी होते.
32 Ionathan autem patruus David consiliarius vir prudens et litteratus ipse et Iaihel filius Achamoni erant cum filiis regis
३२दावीदाचा काका योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखक होता. हखमोनी याचा पुत्र यहीएल याच्यावर राज पुत्राच्या लालनपालनाची जबाबदारी होती.
33 Ahitophel etiam consiliarius regis et Husi Arachites amicus regis
३३अहिथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अर्की लोकांपैकी होता.
34 post Ahitophel fuit Ioiada filius Banaiae et Abiathar princeps autem exercitus regis erat Ioab
३४अहिथोफेलाची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा पुत्र. यवाब हा राजाचा सेनापती होता.