< Psalmorum 35 >
1 Psalmus David. Iudica Domine nocentes me, expugna impugnantes me.
१दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ.
2 Apprehende arma et scutum: et exurge in adiutorium mihi.
२तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, उठून मला मदत कर.
3 Effunde frameam, et conclude adversus eos, qui persequuntur me: dic animae meae: Salus tua ego sum.
३जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे.
4 Confundantur et revereantur, quaerentes animam meam. Avertantur retrorsum, et confundantur cogitantes mihi mala.
४जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत.
5 Fiant tamquam pulvis ante faciem venti: et angelus Domini coarctans eos.
५ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो.
6 Fiat via illorum tenebrae et lubricum: et angelus Domini persequens eos.
६त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो.
7 Quoniam gratis absconderunt mihi interitum laquei sui: supervacue exprobraverunt animam meam.
७विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे.
8 Veniat illi laqueus, quem ignorat: et captio, quam abscondit, apprehendat eum: et in laqueum cadat in ipsum.
८त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. त्यांच्याच नाशात ते पडोत.
9 Anima autem mea exultabit in Domino: et delectabitur super salutari suo.
९परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन.
10 Omnia ossa mea dicent: Domine, quis similis tibi? Eripiens inopem de manu fortiorum eius: egenum et pauperem a diripientibus eum.
१०माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो.
11 Surgentes testes iniqui, quae ignorabam interrogabant me.
११अनितीमान साक्षी उठल्या आहेत; ते माझ्यावर खोटा आरोप लावतात.
12 Retribuebant mihi mala pro bonis: sterilitatem animae meae.
१२माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. मी दु: खी आहे.
13 Ego autem cum mihi molesti essent, induebar cilicio. Humiliabam in ieiunio animam meam: et oratio mea in sinu meo convertetur.
१३परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही.
14 Quasi proximum, et quasi fratrem nostrum, sic complacebam: quasi lugens et contristatus sic humiliabar.
१४मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे.
15 Et adversum me laetati sunt, et convenerunt: congregata sunt super me flagella, et ignoravi.
१५परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले.
16 Dissipati sunt, nec compuncti, tentaverunt me, subsannaverunt me subsannatione: frenduerunt super me dentibus suis.
१६आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले.
17 Domine quando respicies? restitue animam meam a malignitate eorum, a leonibus unicam meam.
१७परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव.
18 Confitebor tibi in ecclesia magna, in populo gravi laudabo te.
१८मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन.
19 Non supergaudeant mihi qui adversantur mihi inique: qui oderunt me gratis et annuunt oculis.
१९माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको.
20 Quoniam mihi quidem pacifice loquebantur: et in iracundia terrae loquentes, dolos cogitabant.
२०कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात.
21 Et dilataverunt super me os suum: dixerunt: Euge, euge, viderunt oculi nostri.
२१ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे.
22 Vidisti Domine, ne sileas: Domine ne discedas a me.
२२हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको. देवा, माझ्यापासून दूर राहू नको.
23 Exurge et intende iudicio meo: Deus meus, et Dominus meus in causam meam.
२३हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ.
24 Iudica me secundum iustitiam tuam Domine Deus meus, et non supergaudeant mihi.
२४परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर, तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ.
25 Non dicant in cordibus suis: Euge, euge, animae nostrae: nec dicant: Devorabimus eum.
२५“आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.
26 Erubescant et revereantur simul, qui gratulantur malis meis. Induantur confusione et reverentia qui maligna loquuntur super me.
२६जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो.
27 Exultent et laetentur qui volunt iustitiam meam: et dicant semper: Magnificetur Dominus, qui volunt pacem servi eius.
२७जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत. जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत.
28 Et lingua mea meditabitur iustitiam tuam, tota die laudem tuam.
२८तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन, आणि तुझी स्तुती दिवसभर करीन.