< Psalmorum 138 >

1 David. Confitebor tibi Domine in toto corde meo: quoniam audisti verba oris mei. In conspectu angelorum psallam tibi:
दाविदाचे स्तोत्र मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
2 adorabo ad templum sanctum tuum, et confitebor nomini tuo. Super misericordia tua, et veritate tua: quoniam magnificasti super omne, nomen sanctum tuum.
मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहेस.
3 In quacumque die invocavero te, exaudi me: multiplicabis in anima mea virtutem.
मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
4 Confiteantur tibi Domine omnes reges terrae: quia audierunt omnia verba oris tui:
हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत.
5 Et cantent in viis Domini: quoniam magna est gloria Domini.
खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.
6 Quoniam excelsus Dominus, et humilia respicit: et alta a longe cognoscit.
कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
7 Si ambulavero in medio tribulationis, vivificabis me: et super iram inimicorum meorum extendisti manum tuam, et salvum me fecit dextera tua.
जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
8 Dominus retribuet pro me: Domine misericordia tua in saeculum: opera manuum tuarum ne despicias.
परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे; हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.

< Psalmorum 138 >