< Psalmorum 129 >
1 Canticum graduum. Saepe expugnaverunt me a iuventute mea, dicat nunc Israel.
१इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.
2 Saepe expugnaverunt me a iuventute mea: etenim non potuerunt mihi.
२त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.
3 Supra dorsum meum fabricaverunt peccatores: prolongaverunt iniquitatem suam.
३नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.
4 Dominus iustus concidet cervices peccatorum:
४परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
5 confundantur et convertantur retrorsum omnes, qui oderunt Sion.
५जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
6 Fiant sicut foenum tectorum: quod priusquam evellatur, exaruit:
६ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.
7 De quo non implebit manum suam qui metit, et sinum suum qui manipulos colligit.
७त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
8 Et non dixerunt qui praeteribant: Benedictio Domini super vos: benediximus vobis in nomine Domini.
८त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”