< Iudicum 10 >
1 Post Abimelech surrexit dux in Israel Thola filius Phua patrui Abimelech, vir de Issachar, qui habitavit in Samir montis Ephraim:
१अबीमलेखाच्या मृत्यूनंतर इस्राएलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारातला मनुष्य तो उभा झाला, आणि तो एफ्राइम डोंगराळ प्रदेशात शामीर शहरात राहत होता.
2 et iudicavit Israelem viginti et tribus annis, mortuusque est, ac sepultus in Samir.
२त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला, मग तो मेला आणि शामीर नगरात पुरला गेला.
3 Huic successit Iair Galaadites, qui iudicavit Israel per viginti et duos annos,
३नंतर त्याच्या मृत्यूनंतर गिलादी याईर उभा राहिला, आणि त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
4 habens triginta filios sedentes super triginta pullos asinarum, et principes triginta civitatum, quae ex nomine eius sunt appellatae Avoth Iair, id est, oppida Iair, usque in praesentem diem in Terra Galaad.
४त्यास तीस पुत्र होते; प्रत्येकाचे आपापले गाढव होते ज्यावर ते सवार होत होते; आणि त्यास तीस नगरेही होती; आजपर्यंत त्यास हावोथ याईर म्हणतात; ती गिलादाच्या प्रांतात आहेत.
5 Mortuusque est Iair; ac sepultus in loco, cui est vocabulum Camon.
५मग याईर मरण पावल्यावर त्यास कामोन शहरात पुरले.
6 Filii autem Israel peccatis veteribus iungentes nova, fecerunt malum in conspectu Domini, et servierunt idolis, Baalim et Astaroth, et diis Syriae ac Sidonis et Moab et filiorum Ammon et Philisthiim: dimiseruntque Dominum, et non coluerunt eum.
६यानंतर इस्राएलाच्या लोकांनी फिरून देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले; कारण की त्यांनी बआल, अष्टारोथ, अरामाचे देव, सीदोनातले देव, मवाबातले देव व अम्मोनी लोकांचे देव व पलिष्ट्यांचे देव, यांची उपासना केली; त्यांनी परमेश्वरास सोडले, आणि त्यानंतर त्याची उपासना केलीच नाही.
7 Contra quos Dominus iratus, tradidit eos in manus Philisthiim et filiorum Ammon.
७यास्तव परमेश्वराचा राग इस्राएलावर भडकला, आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले.
8 Afflictique sunt, et vehementer oppressi per annos decem et octo, omnes qui habitabant trans Iordanem in Terra Amorrhaei, quae est in Galaad:
८त्या वर्षी, त्यानंतर अठरा वर्षे त्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस छळले आणि यार्देनेच्या पलीकडे अमोऱ्यांच्या देशातल्या गिलादात जे इस्राएली होते त्या सर्वांना जाचले.
9 in tantum, ut filii Ammon, Iordane transmisso, vastarent Iudam et Beniamin et Ephraim: afflictusque est Israel nimis.
९यहूदा व बन्यामीन व एफ्राइमाची घराणे यांच्याशीही लढावयास अम्मोनी लोक यार्देन पार करून अलीकडे आले, त्यामुळे इस्राएलावर फार मोठे दु: ख आले.
10 Et clamantes ad Dominum, dixerunt: Peccavimus tibi, quia dereliquimus Dominum Deum nostrum, et servivimus Baalim.
१०तेव्हा इस्राएली लोकांनी परमेश्वरास मोठ्याने आरोळी मारीत म्हटले की, “आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे; ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बआलाच्या मूर्तींची उपासना केली.”
11 Quibus locutus est Dominus: Numquid non Aegyptii et Amorrhaei, filiique Ammon et Philisthiim,
११तेव्हा परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस म्हटले. “मिसऱ्यांपासून व अमोऱ्यांपासून व अम्मोन्यांच्या लोकांपासून व पलिष्ट्यांपासून मी तुम्हाला सोडवले नाही काय?
12 Sidonii quoque et Amalec et Chanaan oppresserunt vos, et clamastis ad me, et erui vos de manu eorum?
१२आणि सीदोनी व अमालेकी व मावोनी यानी तुम्हाला जाचले, तेव्हा तुम्ही मला मोठ्याने हाक मारली, आणि मी तुम्हाला त्यांच्या हातातून सोडवले.
13 Et tamen reliquistis me, et coluistis deos alienos: idcirco non addam ut ultra vos liberem:
१३तरी तुम्ही मला सोडून दुसऱ्या देवांची उपासना केली; यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही.
14 ite, et invocate deos quos elegistis: ipsi vos liberent in tempore angustiae.
१४जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यास हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हाला सोडवावे.”
15 Dixeruntque filii Israel ad Dominum: Peccavimus, redde tu nobis quidquid tibi placet: tantum nunc libera nos.
१५तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वरास म्हटले, “आम्ही पाप केले आहे; जे सर्व तुला चांगले वाटेल, त्याप्रमाणे तू आम्हांला कर; आम्ही तुला विनंती करतो केवळ त्या दिवशी तू आम्हांला सोडव.”
16 Quae dicentes, omnia de finibus suis alienorum deorum idola proiecerunt, et servierunt Domino Deo: qui doluit super miseriis eorum.
१६तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली, आणि इस्राएलाच्या दुःखामुळे त्याच्या मनाला खेद झाला.
17 Itaque filii Ammon conclamantes in Galaad fixere tentoria: contra quos congregati filii Israel, in Maspha castrametati sunt.
१७अम्मोनी लोक तर एकत्र मिळून त्यांनी गिलादात तळ दिला, आणि इस्राएलाच्या लोकांनी एकत्र जमून मिस्पात तळ दिला.
18 Dixeruntque principes Galaad singuli ad proximos suos: Qui primus ex nobis contra filios Ammon coeperit dimicare, erit dux populi Galaad.
१८तेव्हा गिलादातले लोक व अधिकारी एकमेकांना म्हणाले, “जो मनुष्य अम्मोनी लोकांशी लढू लागेल असा मनुष्य कोण आहे? तो गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांचा अधिकारी असा होईल.”