< I Paralipomenon 3 >
1 David vero hos habuit filios, qui ei nati sunt in Hebron; primogenitum Amnon ex Achinoam Iezrahelitide, secundum Daniel de Abigail Carmelitide,
१आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते. अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ; अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा,
2 tertium Absalom filium Maacha filiae Tholmai regis Gessur, quartum Adoniam filium Aggith,
२गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र, हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चौथा.
3 quintum Saphathiam ex Abital, sextum Iethraham de Egla uxore sua.
३अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा. दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.
4 Sex ergo nati sunt ei in Hebron, ubi regnavit septem annis et sex mensibus. Triginta autem et tribus annis regnavit in Ierusalem.
४दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरूशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.
5 Porro in Ierusalem nati sunt ei filii Simmaa, et Sobab, et Nathan, et Salomon, quattuor de Bethsabee filia Ammiel,
५अम्मीएलची कन्या बथशूवा हिच्यापासून दाविदाला यरूशलेम शहरात चार पुत्र झाले. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र.
6 Iebaar quoque et Elisama,
६इतर नऊ पुत्र; इभार, अलीशामा, एलीफलेट,
7 et Eliphaleth, et Noge, et Nepheg, et Iaphia,
७नोगा, नेफेग, याफीय,
8 necnon Elisama, et Eliada, et Elipheleth, novem:
८अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.
9 omnes hi, filii David absque filiis concubinarum: habueruntque sororem Thamar.
९ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.
10 Filius autem Salomonis, Roboam: cuius Abia filius genuit Asa. De hoc quoque natus est Iosaphat,
१०शलमोनाचा पुत्र रहाबाम होता. रहबामाचा पुत्र अबीया होता. अबीयाचा पुत्र आसा. आसाचा पुत्र यहोशाफाट.
11 pater Ioram: qui Ioram genuit Ochoziam, ex quo ortus est Ioas:
११यहोशाफाटाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र अहज्या होता. अहज्याचा पुत्र योवाश होता.
12 et huius Amasias filius genuit Azariam. Porro Azariae filius Ioatham
१२योवाशाचा पुत्र अमस्या होता. अमस्याचा पुत्र अजऱ्या होता. अजऱ्याचा पुत्र योथाम होता.
13 procreavit Achaz patrem Ezechiae, de quo natus est Manasses.
१३योथामाचा पुत्र आहाज होता. आहाजाचा पुत्र हिज्कीया, हिज्कीयाचा पुत्र मनश्शे.
14 Sed et Manasses genuit Amon patrem Iosiae.
१४मनश्शेचा पुत्र आमोन होता, आमोनचा पुत्र योशीया होता.
15 Filii autem Iosiae fuerunt, primogenitus Iohanan, secundus Ioakim, tertius Sedechias, quartus Sellum.
१५योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चौथा शल्लूम.
16 De Ioakim natus est Iechonias, et Sedechias.
१६यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.
17 Filii Iechoniae fuerunt, Asir, Salathiel,
१७यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्यास झालेल्या मुलांची नावे शल्तीएल,
18 Melchiram, Phadaia, Senneser et Iecemia, Sama, et Nadabia.
१८मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.
19 De Phadaia orti sunt Zorobabel et Semei. Zorobabel genuit Mosollam, Hananiam, et Salomith sororem eorum:
१९पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती.
20 Hasaban quoque, et Ohol, et Barachian, et Hasadian, Iosabhesed, quinque.
२०जरुब्बाबेलाला आणखीही पाच पुत्र होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.
21 Filius autem Hananiae, Phaltias pater Ieseiae, cuius filius Raphaia. huius quoque filius, Arnan, de quo natus est Obdia, cuius filius fuit Sechenias.
२१पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या.
22 Filius Secheniae, Semeia: cuius filii Hattus, et Iegaal, et Baria, et Naaria, et Saphat, et Sesa, sex numero.
२२शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा पुत्र शमाया, हट्टूश, इगाल, बारीहा, निरह्या आणि शाफाट.
23 Filius Naariae, Elioenai, et Ezechias, et Ezricam, tres.
२३निरह्या याला तीन पुत्र एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.
24 Filii Elioenai, Oduia, et Eliasub, et Pheleia, et Accub, et Iohanan, et Dalaia, et Anani, septem.
२४एल्योवेनयला सात पुत्र होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.