< Philippenses 2 >

1 Si qua ergo consolatio in Christo, si quod solatium caritatis, si qua societas spiritus, si qua viscera miserationis:
ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करूणा ही जर आहेत,
2 implete gaudium meum ut idem sapiatis, eamdem caritatem habentes, unanimes, idipsum sentientes,
तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा.
3 nihil per contentionem, neque per inanem gloriam: sed in humilitate superiores sibi invicem arbitrantes,
आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे.
4 non quæ sua sunt singuli considerantes, sed ea quæ aliorum.
तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेहि पाहा.
5 Hoc enim sentite in vobis, quod et in Christo Jesu:
अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो.
6 qui cum in forma Dei esset, non rapinam arbitratus est esse se æqualem Deo:
तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
7 sed semetipsum exinanivit, formam servi accipiens, in similitudinem hominum factus, et habitu inventus ut homo.
तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले,
8 Humiliavit semetipsum factus obediens usque ad mortem, mortem autem crucis.
आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
9 Propter quod et Deus exaltavit illum, et donavit illi nomen, quod est super omne nomen:
ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे.
10 ut in nomine Jesu omne genu flectatur cælestium, terrestrium et infernorum,
१०ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा,
11 et omnis lingua confiteatur, quia Dominus Jesus Christus in gloria est Dei Patris.
११आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
12 Itaque carissimi mei (sicut semper obedistis), non ut in præsentia mei tantum, sed multo magis nunc in absentia mea, cum metu et tremore vestram salutem operamini.
१२म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या.
13 Deus est enim, qui operatur in vobis et velle, et perficere pro bona voluntate.
१३कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे.
14 Omnia autem facite sine murmurationibus et hæsitationibus:
१४जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा;
15 ut sitis sine querela, et simplices filii Dei, sine reprehensione in medio nationis pravæ et perversæ: inter quos lucetis sicut luminaria in mundo,
१५ह्यासाठी की, या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे; त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता.
16 verbum vitæ continentes ad gloriam meam in die Christi, quia non in vacuum cucurri, neque in vacuum laboravi.
१६जीवनाच्या वचनास दृढ धरुन राहा, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.
17 Sed et si immolor supra sacrificium, et obsequium fidei vestræ, gaudeo, et congratulor omnibus vobis.
१७तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
18 Idipsum autem et vos gaudete, et congratulamini mihi.
१८आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.
19 Spero autem in Domino Jesu, Timotheum me cito mittere ad vos: ut et ego bono animo sim, cognitis quæ circa vos sunt.
१९प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की, लवकरच मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन म्हणजे, तुम्हा विषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल.
20 Neminem enim habeo tam unanimem, qui sincera affectione pro vobis sollicitus sit.
२०कारण तुमच्या विषयीच्या गोष्टीची खरी काळजी करील असा, दुसरा कोणी समान वृतीचा माझ्याजवळ नाही;
21 Omnes enim quæ sua sunt quærunt, non quæ sunt Jesu Christi.
२१कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत.
22 Experimentum autem ejus cognoscite, quia sicut patri filius, mecum servivit in Evangelio.
२२पण तुम्ही त्याचे शील हे जाणता की, जसा मुलगा पित्याबरोबर सेवा करतो, तशी त्याने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर सेवा केली.
23 Hunc igitur spero me mittere ad vos, mox ut videro quæ circa me sunt.
२३म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच, त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो.
24 Confido autem in Domino quoniam et ipse veniam ad vos cito.
२४पण मीही स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे.
25 Necessarium autem existimavi Epaphroditum fratrem, et cooperatorem, et commilitonem meum, vestrum autem apostolum, et ministrum necessitatis meæ, mittere ad vos:
२५तरी मला माझा बंधू आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमचा प्रेषित आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे आवश्यक वाटले.
26 quoniam quidem omnes vos desiderabat: et mœstus erat, propterea quod audieratis illum infirmatum.
२६कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता;
27 Nam et infirmatus est usque ad mortem: sed Deus misertus est ejus: non solum autem ejus, verum etiam et mei, ne tristitiam super tristitiam haberem.
२७तो खरोखर, मरणाजवळ आला होता पण देवाने त्याच्यावर दया केली आणि केवळ त्याच्यावर नाही तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली.
28 Festinantius ergo misi illum, ut viso eo iterum gaudeatis, et ego sine tristitia sim.
२८म्हणून, मी त्यास पाठविण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.
29 Excipite itaque illum cum omni gaudio in Domino, et ejusmodi cum honore habetote;
२९ह्यावरून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा. अशांचा मान राखा.
30 quoniam propter opus Christi usque ad mortem accessit, tradens animam suam ut impleret id quod ex vobis deerat erga meum obsequium.
३०कारण माझी सेवा करण्यांत तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.

< Philippenses 2 >