< Psalmorum 75 >
1 In finem, Ne corrumpas, Psalmus Cantici Asaph. Confitebimur tibi Deus: confitebimur, et invocabimus nomen tuum. Narrabimus mirabilia tua:
१आसाफाचे स्तोत्र हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात.
2 cum accepero tempus, ego iustitias iudicabo.
२नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन.
3 Liquefacta est terra, et omnes qui habitant in ea: ego confirmavi columnas eius.
३जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन.
4 Dixi iniquis: Nolite inique agere: et delinquentibus: Nolite exaltare cornu:
४मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका.
5 Nolite extollere in altum cornu vestrum: nolite loqui adversus Deum iniquitatem.
५विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका.
6 Quia neque ab Oriente, neque ab Occidente, neque a desertis montibus:
६विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून किंवा रानातूनही येत नाही.
7 quoniam Deus iudex est. Hunc humiliat, et hunc exaltat:
७पण देव न्यायाधीश आहे; तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो.
8 quia calix in manu Domini vini meri plenus misto. Et inclinavit ex hoc in hoc: verumtamen fæx eius non est exinanita: bibent omnes peccatores terræ.
८कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील.
9 Ego autem annunciabo in sæculum: cantabo Deo Iacob.
९पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन; मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन.
10 Et omnia cornua peccatorum confringam: et exaltabuntur cornua iusti.
१०तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे तोडून टाकीन, पण नितीमानाची शिंगे उंच करीन.