< Iosue 17 >
1 Cecidit autem sors tribui Manasse: (ipse enim est primogenitus Ioseph) Machir primogenito Manasse patri Galaad, qui fuit vir pugnator, habuitque possessionem Galaad et Basan:
१मनश्शेच्या वंशजाला हे वतन नेमून दिलेले होते. कारण मनश्शे योसेफाचा प्रथम पुत्र, याच्या वंशाचा भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, म्हणजे मनश्शेचा प्रथम पुत्र माखीर, गिलादाचा बाप हा तर मोठा शूर होता, आणि त्यास गिलाद व बाशान हा भाग मिळाला होता.
2 et reliquis filiorum Manasse iuxta familias suas, filiis Abiezer, et filiis Helec, et filiis Esriel, et filiis Sechem, et filiis Hepher, et filiis Semida. isti sunt filii Manasse filii Ioseph, mares, per cognationes suas.
२मनश्शेच्या राहिलेल्या वंशजांनाही त्यांच्या कुळांप्रमाणे विभाग मिळाले ते असे, अबीयेजेर व हेलेक व अस्रियेल व शेखेम व हेफेर व शमीदा हे आपआपल्या कुळांप्रमाणे योसेफ पुत्र जो मनश्शे त्याच्या वंशातले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे विभाग ठरले;
3 Salphaad vero filio Hepher filii Galaad filii Machir filii Manasse non erant filii, sed solæ filiæ: quarum ista sunt nomina, Maala et Noa et Hegla et Melcha et Thersa.
३मनश्शेचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलाद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद, याला मुलगा नव्हता, परंतु मुली होत्या; आणि त्याच्या मुलींची नावे ही आहेत: महला व नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
4 Veneruntque in conspectu Eleazari sacerdotis, et Iosue filii Nun, et principum dicentes: Dominus præcepit per manum Moysi, ut daretur nobis possessio in medio fratrum nostrorum. Deditque eis iuxta imperium Domini possessionem in medio fratrum patris earum.
४आणि एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व अधिकारी यांच्यापुढे त्या येऊन त्या म्हणाल्या, “परमेश्वराने मोशेला अशी आज्ञा दिली की आम्हांला आमच्या भाऊबंदांमध्ये वतन द्यावे.” यास्तव त्याने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यांना त्यांच्या वडिलाच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले.
5 Et ceciderunt funiculi Manasse, decem, absque Terra Galaad et Basan trans Iordanem.
५आणि यार्देनेच्या पश्चिमेकडे गिलाद व बाशान या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा भाग मिळाले.
6 Filiæ enim Manasse possederunt hereditatem in medio filiorum eius. Terra autem Galaad cecidit in sortem filiorum Manasse qui reliqui erant.
६कारण की मनश्शेच्या मुलींना त्याच्या मुलांमध्ये वतन मिळाले, आणि मनश्शेच्या इतर वंशजांना गिलाद प्रांत मिळाला.
7 Fuitque terminus Manasse ab Aser, Machmethath quæ respicit Sichem: et egreditur ad dexteram iuxta habitatores Fontis Taphuæ.
७आणि मनश्शेची सीमा आशेरापासून शखेमाच्या समोरल्या मिखमथाथा नगरापर्यंत झाली, आणि ती सीमा एन-तप्पूहाच्या लोकवस्तीच्या उजव्या भागापर्यंत पोहचते.
8 Etenim in sorte Manasse ceciderat Terra Taphuæ, quæ est iuxta terminos Manasse filiorum Ephraim.
८तप्पूहा प्रांत मनश्शेचा होता, परंतु मनश्शेच्या सीमेजवळचे तप्पूहा नगर एफ्राइमाच्या वंशाचे होते.
9 Descenditque terminus Vallis arundineti in meridiem torrentis civitatum Ephraim, quæ in medio sunt urbium Manasse: terminus Manasse ab Aquilone torrentis, et exitus eius pergit ad mare:
९आणि सीमा काना ओढ्यावरून, ओढ्याच्या दक्षिणेस गेली; ही नगरे एफ्राइमाची होती, ती मनश्शेच्या नगरांमध्ये होती; आणि मनश्शेची सीमा ओढ्याच्या उत्तरेस होती, आणि तिचा शेवट भूमध्य समुद्राजवळ होता.
10 ita ut possessio Ephraim sit ab Austro, et ab Aquilone Manasse, et utramque claudat mare, et coniungantur sibi in tribu Aser ab Aquilone, et in tribu Issachar ab Oriente.
१०दक्षिणभाग एफ्राइमाचा, आणि उत्तरभाग मनश्शेचा, आणि समुद्र त्याची सीमा होता, आणि उत्तरेस आशेरात व पूर्वेस इस्साखारात ते एकत्र झाले.
11 Fuitque hereditas Manasse in Issachar et in Aser, Bethsan et viculi eius, et Ieblaam cum viculis suis, et habitatores Dor cum oppidis suis, habitatores quoque Endor cum viculis suis: similiterque habitatores Thenac cum viculis suis, et habitatores Mageddo cum viculis suis, et tertia pars urbis Nopheth.
११आणि इस्साखारात व आशेरात बेथ-शान व त्याची खेडी, आणि इब्लाम व त्याची खेडी, आणि दोर व त्याची खेडी यामध्ये राहणारे, आणि एन-दोर व त्यांची खेडी यामध्ये राहणारे, आणि तानख व त्यांची खेडी यांत राहणारे, आणि मगिद्दो व त्यांची खेडी यांत राहणारे, हे तीन परगणे मनश्शेचे झाले.
12 Nec potuerunt filii Manasse has civitates subvertere, sed cœpit Chananæus habitare in terra sua.
१२पण या नगरातील रहिवाश्यांना मनश्शेचे वंशज बाहेर घालवायला समर्थ नव्हते; या देशातच राहण्याचा कनान्यांनी तर हट्ट धरला.
13 Postquam autem convaluerunt filii Israel, subiecerunt Chananæos, et fecerunt sibi tributarios, nec interfecerunt eos.
१३तरी असे झाले की जेव्हा इस्राएल लोक बळकट झाले, तेव्हा त्यांनी कनान्यांना नेमलेले काम करायला लावले आणि त्यांना अगदीच घालवून दिले नाही.
14 Locutique sunt filii Ioseph ad Iosue, et dixerunt: Quare dedisti mihi possessionem sortis et funiculi unius, cum sim tantæ multitudinis, et benedixerit mihi Dominus?
१४तेव्हा योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले की, “परमेश्वराने मला येथपर्यंत आशीर्वाद दिला आहे आम्ही संख्येने बहुत झालो आहो तर तू चिठ्ठी टाकून आम्हांला वतनाचा एकच विभाग का दिला आहेस?”
15 Ad quos Iosue ait: Si populus multus es, ascende in silvam, et succide tibi spatia in Terra Pherezæi et Raphaim: quia angusta est tibi possessio montis Ephraim.
१५तेव्हा यहोशवाने त्यांना म्हटले, “जर तुम्ही संख्येने बहुत आहात व लोक आणखी एफ्राइम डोंगराळ प्रदेश तुम्हाला पुरत नाहीतर परिज्जी व रेफाई यांच्या देशांतले रान तोडून तेथे वस्ती करा.”
16 Cui responderunt filii Ioseph: Non poterimus ad montana conscendere, cum ferreis curribus utantur Chananæi, qui habitant in terra campestri, in qua sitæ sunt Bethsan cum viculis suis, et Iezrael mediam possidens vallem.
१६नंतर योसेफाच्या वंशजांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; आणि जे कनानी तळप्रांतात राहतात, त्या सर्वांना लोखंडी रथ आहेत; म्हणजे बेथ-शान व तिजकडली खेडी यांतले, आणि इज्रेल खोरे जे, त्यामध्ये आहेत.”
17 Dixitque Iosue ad domum Ioseph, Ephraim et Manasse: Populus multus es, et magnæ fortitudinis, non habebis sortem unam,
१७तेव्हा यहोशवाने योसेफाच्या घराण्यास, म्हणजे एफ्राइम व मनश्शे यांना असे म्हटले की, “तुम्ही संख्येने फार आहात, व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे; तुम्हाला एकच वाटा नसावा;
18 sed transibis ad montem, et succides tibi, atque purgabis ad habitandum spatia: et poteris ultra procedere cum subverteris Chananæum, quem dicis ferreos habere currus, et esse fortissimum.
१८तेव्हा डोंगराळ प्रदेशही तुझा होईल; तो अरण्य आहे तरी तू ते तोडशील; बाहेरील भागही तुझे होतील, कारण कनान्यांना जरी लोखंडी रथ आहेत आणि ते बळकट आहेत तरी तू त्यांना घालवशील.”