< Ii Regum 16 >
1 Anno decimo septimo Phacee filii Romeliæ regnavit Achaz filius Ioatham regis Iuda.
१इस्राएलचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह याच्या सतराव्या वर्षी, योथामाचा मुलगा आहाज यहूदावर राज्य करू लागला.
2 Viginti annorum erat Achaz cum regnare cœpisset, et sedecim annis regnavit in Ierusalem: non fecit quod erat placitum in conspectu Domini Dei sui, sicut David pater eius.
२आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये वाईट म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करत नसे.
3 sed ambulavit in via regum Israel: insuper et filium suum consecravit, transferens per ignem secundum idola Gentium, quæ dissipavit Dominus coram filiis Israel.
३त्याऐवजी तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गात चालला. आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांपुढून घालवली होती, त्यांच्या तिरस्करणीय कर्मांस अनुसरून त्याने आपल्या मुलाचे अग्नीतून अर्पण केले
4 Immolabat quoque victimas, et adolebat incensum in excelsis, et in collibus, et sub omni ligno frondoso.
४तो उंचस्थळी, टेकड्यांवर तसेच प्रत्येक हिरव्यागर्द वृक्षाखाली यज्ञ करीत असे व धूप जाळत असे.
5 Tunc ascendit Rasin rex Syriæ, et Phacee filius Romeliæ rex Israel in Ierusalem ad præliandum: cumque obsiderent Achaz, non valuerunt superare eum.
५अरामाचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह यरूशलेमेवर स्वारी करून आले. आणि त्यांनी आहाजला घेरले, पण ते त्याचा पराभव करु शकले नाहीत.
6 In tempore illo restituit Rasin rex Syriæ, Ailam Syriæ, et eiecit Iudæos de Aila: et Idumæi venerunt in Ailam, et habitaverunt ibi usque in diem hanc.
६अरामाचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला आणि तेथून त्याने सर्व यहूद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक एलाथात स्थायिक झाले आणि अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.
7 Misit autem Achaz nuncios ad Theglathphalasar regem Assyriorum, dicens: Servus tuus, et filius tuus ego sum: ascende, et salvum me fac de manu regis Syriæ, et de manu regis Israel, qui consurrexerunt adversum me.
७अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास व तुझा मुलगा आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करून आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला वर ये आणि मला वाचव.”
8 Et cum collegisset argentum et aurum, quod inveniri potuit in domo Domini, et in thesauris regis, misit regi Assyriorum munera.
८आहाजने याखेरीज परमेश्वराच्या मंदिरातले आणि राजवाड्याच्या खजिन्यातले सोनेरुपे बाहेर काढले. ते त्याने अश्शूरच्या राजाला नजराणा म्हणून पाठवले.
9 Qui et acquievit voluntati eius: ascendit enim rex Assyriorum in Damascum, et vastavit eam: et transtulit habitatores eius Cyrenen, Rasin autem interfecit.
९तेव्हा अश्शूरच्या राजाने आहाजाचे ऐकले आणि दिमिष्कावर स्वारी करून ते काबीज केले आणि तेथील लोकांस त्याने कीर येथे पकडून नेले. रसीन यालाही त्याने ठार केले.
10 Perrexitque rex Achaz in occursum Theglathphalasar regis Assyriorum in Damascum. cumque vidisset altare Damasci, misit rex Achaz ad Uriam sacerdotem exemplar eius, et similitudinem iuxta omne opus eius.
१०अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याला भेटायला आहाज दिमिष्काला गेला. तेव्हा तेथील वेदी त्याने पाहिली आणि तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरीया या याजकाला पाठवला.
11 Extruxitque Urias sacerdos altare iuxta omnia, quæ præceperat rex Achaz, de Damasco, ita fecit sacerdos Urias, donec veniret rex Achaz de Damasco.
११दिमिष्काहून आहाजने पाठवलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरीया याजकाने वेदी उभारली. राजा आहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले.
12 Cumque venisset rex de Damasco, vidit altare, et veneratus est illud: ascenditque et immolavit holocausta, et sacrificium suum,
१२मग राजा दिमिष्काहून आला तेव्हा त्याने ती वेदी पाहिली. तिच्याजवळ जाऊन तिच्यावर यज्ञ अर्पण केला.
13 et libavit libamina, et fudit sanguinem pacificorum, quæ obtulerat super altare.
१३त्या वेदीवर त्याने होमार्पण आणि अन्नार्पण केले. त्याचे पेयार्पण ओतले तसेच शांत्यर्पणाचे रक्त वेदीवर शिंपडले.
14 Porro altare æreum, quod erat coram Domino, transtulit de facie templi, et de loco altaris, et de loco templi Domini: posuitque illud ex latere altaris ad Aquilonem.
१४जी पितळी वेदी परमेश्वराच्या समोर होती, ती त्याने आपली वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थनामंदिर यांच्यामधून, काढली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली.
15 Præcepit quoque rex Achaz Uriæ sacerdoti, dicens: Super altare maius offer holocaustum matutinum, et sacrificium vespertinum, et holocaustum regis, et sacrificium eius, et holocaustum universi populi terræ, et sacrificia eorum, et libamina eorum: et omnem sanguinem holocausti, et universum sanguinem victimæ super illud effundes: altare vero æreum erit paratum ad voluntatem meam.
१५मग राजा आहाजाने उरीया याजकाला आज्ञा केली, “मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, देशातील सर्व लोकांचे होमार्पण व त्यांचे अन्नार्पण व त्यांची पेयार्पणे, राजाचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरिता माझ्यासाठी असावी.”
16 Fecit igitur Urias sacerdos iuxta omnia, quæ præceperat rex Achaz.
१६उरीया याजकाने आहाज राजाची आज्ञा मानून त्याप्रमाणे सर्वकाही केले.
17 Tulit autem rex Achaz cælatas bases, et luterem, qui erat desuper: et mare deposuit de bobus æreis, qui sustentabant illud, et posuit super pavimentum stratum lapide.
१७मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकले आणि गंगाळ काढले आणि गंगाळसागर पितळी बैलांवरून काढून खाली फरसबंदीवर ठेवला.
18 Musach quoque sabbati, quod ædificaverat in templo: et ingressum regis exterius convertit in templum Domini propter regem Assyriorum.
१८शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशही त्याने अश्शूरच्या राजासाठी परमेश्वराच्या मंदिरापासून फिरवला.
19 Reliqua autem verborum Achaz, quæ fecit, nonne hæc scripta sunt in Libro sermonum dierum regum Iuda?
१९यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत.
20 Dormivitque Achaz cum patribus suis, et sepultus est cum eis in Civitate David, et regnavit Ezechias filius eius pro eo.
२०आहाजच्या निधनानंतर त्याचे दाविदाच्या नगरात पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. आहाजनंतर त्याचा मुलगा हिज्कीया नवा राजा झाला.