< Psalm 13 >

1 [Psalm lal David] LEUM GOD, kom ac mulkinyula putaka? Ya kom ac mulkinyula ma pahtpat? Kom ac wikinkomla likiyu nwe ngac?
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?
2 Putaka nga ac muteng mwe keok nu sik? Ac putaka insiuk ac toasrkin ma inge ke len ac fong? Putaka mwet lokoalok luk ac kutangyula?
पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु: ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
3 Ngetma nu sik, O LEUM GOD luk, ac topukyu. Folokonak ku luk, ac tia lela nga in misa.
हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर.
4 Nikmet lela tuh mwet lokoalok luk in fahk, “Kut kutangulla.” Nikmet lela elos in isrunyu ke munasla luk.
मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील.
5 Nga lulalfongi na lungse pwaye lom; Nga ac fah insewowo mweyen kom ac fah moliyula.
परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.
6 Nga ac fah on nu sum, O LEUM GOD, Mweyen kom nuna wo nu sik.
मी परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे.

< Psalm 13 >