< Luo Chronicle 10 >
1 Rehoboam el som nu Shechem, yen mwet nukewa epang in Israel elos fahsreni nu we in oru tuh elan tokosrala.
१रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.
2 Ke Jeroboam, wen natul Nebat, su tuh som nu Egypt in kaing lukel Tokosra Solomon, el lohng pweng se inge, na el folokla nu yen sel.
२यावेळी यराबाम मिसरमध्ये होता कारण त्याने राजा शलमोनापुढून पळ काढला होता. यराबाम हा नबाटाचा पुत्र. रहबाम राजा होणार हे त्याने ऐकले म्हणून तो मिसरहून आला.
3 Mwet in sruf epang elos sapla solal, ac elos nukewa tukeni som nu yorol Rehoboam ac fahk nu sel,
३तेव्हा इस्राएल लोकांनी यराबामालाही आपल्याबरोबर येण्यास सांगितले. अशा तऱ्हेने यराबाम आणि सर्व इस्राएल लोक रहबामाकडे आले. त्यास ते म्हणाले, “रहबामा,
4 “Papa tomom ah tuh use mwe utuk na toasr nu facsr. Tusruktu kom fin akfusrasryela mwe utuk inge, na kut ac fah mwet kulansap pwaye nu sum.”
४तुमच्या पित्याने आमचे जू फार भारी केले होते तर आता आपल्या पित्याने लादलेली कठीण सेवा व आम्हावरील भारी जू आता हलके करा म्हणजे आम्ही तुमच्या आज्ञेत राहू.”
5 Na Rehoboam el fahk, “Se nu sik len tolu nga in nunku kac, na kowos fah sifil foloko.” Ouinge mwet uh som.
५यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसानी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.
6 Tokosra Rehoboam el siyuk sin mwet matu su tuh mwet kasru lal Solomon, papa tumal, ac fahk, “Top fuka kowos nunku mu fal nga in sang topuk siyuk lun mwet inge?”
६राजा रहबामाने मग आपला पिता शलमोनाच्या पदरी असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळीशी चर्चा केली. रहबाम त्यांना म्हणाला, “मी या लोकांस काय उत्तर द्यावे? याबाबतीत मला तुमचा सल्ला हवा आहे.”
7 Elos topuk ac fahk, “Kom fin kulang nu sin mwet ingan ac akinsewowoyalos ac sulela sie top wowo an nu selos, na elos ac fah oaru in kulansupwekom pacl nukewa.”
७तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामाला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.”
8 Tusruktu el pilesru kas in kasru lun mwet matu, ac som nu yurin mwet fusr su nuna welul ke elos tulik ah me, ac inge el oru mu elos pa mwet kasru lal.
८पण रहबामाने त्यांचा हा सल्ला मानला नाही तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळीशी बोलला.
9 El siyuk selos, “Mea kowos nunku mu wo nga in oru? Ke mwet uh siyuk ngan akmulalaye enu lalos uh, mea nga ac fahk nu selos?”
९रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही मला काय सल्ला द्याल? आपण लोकांस काय सांगावे? त्यांना आपले ओझे हलके करून हवे आहे. माझ्या पित्यानी त्यांच्या मानेवर ठेवलेले जू आता त्यांना मी हलके करायला हवे आहे.”
10 Elos topuk, “Pa inge ma kom ac fahk nu selos an: ‘Kuf srisrik soko ke pouk uh yohk liki infulwen papa tumuk ah.’
१०तेव्हा त्याच्या पिढीची ती युवा मंडळी रहबामाला म्हणाली, “तुमच्याकडे आलेल्या लोकांस तुम्ही असे सांगावे. लोक तुम्हास म्हणाले की, मानेवर जू ठेवल्याप्रमाणे तुमच्या वडिलांनी आम्हास कठोर जिणे जगायला लावले. तुम्ही आता ते हलके करावे असे आम्हास वाटते पण रहबाम, तुम्ही त्यांना असे सांगावे, माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षा जाड असेल.
11 Fahk nu selos mu, ‘Papa tumuk el sot enu toasr nu fowos, a nga ac sot in toasr liki. El puok kowos ke mwe sringsring, a nga fah sringil kowos ke scorpion!’”
११माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे; माझ्या पित्याने तुम्हास चाबकांचे फटकारे मारले, मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.”
12 Tukun len tolu, Jeroboam ac mwet nukewa folokla nu yorol Rehoboam, oana ke el tuh fahk nu selos ah.
१२“यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले.” राजा रहबामाने त्यांना तसेच सांगितले होते.
13 Tokosra el pilesru kas in kasru lun mwet matu, a el kaskas upa nu sin mwet uh.
१३रहबाम त्यांच्याशी यावेळी उद्धटपणे बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही.
14 El fahk oana ke mwet fusr wial elos fahk, “Papa tumuk el sot enu toasr nu fowos, a nga ac sot in toasr liki! El puok kowos ke mwe sringsring, a nga ac sringil kowos ke sucl lulap!”
१४तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला तो लोकांस म्हणाला, “माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हास चाबकाने शासन केले असेल पण मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.”
15 Pa ingan ma lungse lun LEUM GOD in akpwayeye ma El tuh fahk nu sel Jeroboam, wen natul Nebat, in kas lun mwet palu Ahijah mwet Shiloh. Pa inge sripa se sis tokosra el tiana lohang nu sin mwet uh.
१५राजा रहबामाने लोकांचे ऐकून घेतले नाही. तो असे बोलला कारण हा बदल परमेश्वरानेच घडवून आणला होता. अहीया मार्फत परमेश्वर यराबामाशी जे बोलला होता ते प्रत्यक्षात यावे म्हणूनच त्याने अशी वेळ येऊ दिली. अहीया हा शिलोनी लोकांपैकी होता आणि यराबाम नबाटाचा पुत्र होता.
16 Ke mwet uh liye tuh tokosra el tiana lohngolos, na elos wowoyak ac fahk, “Tolulla David ac sou lal! Mea elos nu orala nu sesr? Mwet Israel, kut som nu yen sesr! Lela Rehoboam elan sifacna liyalang!” Ouinge mwet Israel elos orek alein,
१६राजा रहबामाने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले हे इस्राएल लोकांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणाले, “आम्ही काय दावीदाच्या घराण्यातले आहोत का? मुळीच नाही! इशायचा पुत्र आमचा वतन भाग आहे का? नाही! तेव्हा इस्राएल लोकांनो, आपण आपले आपापल्या घरी जाऊ या दावीदाच्या पुत्राला आपल्या घरच्यांवरच राज्य करु द्या.” सर्व इस्राएल लोक मग घरोघर गेले.
17 pwanang Rehoboam el tokosra lun mwet ma muta Judah mukena.
१७पण यहूदाच्या नगरांमध्ये राहणारे काही इस्राएल लोक होते. रहबाम त्यांच्यावर राज्य करत राहिला.
18 Na Tokosra Rehoboam el supwalla Adoniram, su kol orekma lun mwet kohs, elan som nu yurin mwet Israel, a elos tanglal nwe ke el misa. Ke ma inge, Rehoboam el sulaklak sroang nu fin chariot natul, ac kaingla nu Jerusalem.
१८हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामाने त्यास इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून त्यास मरेपर्यंत मारले. इकडे रहबामाने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरूशलेमेला पळून गेला.
19 In pacl sac me, mwet epang in Israel elos alein na nu sin mwet nukewa su leum sin fwilin tulik natul David.
१९तेव्हापासून आजतागायत इस्राएलाचे दावीदाच्या घराण्याशी बंड केले आहे.