< 아모스 4 >
1 사마리아 산에 거하는 바산 암소들아 이 말을 들으라 너희는 가난한 자를 학대하며 궁핍한 자를 압제하며 가장에게 이르기를 술을 가져다가 우리로 마시게 하라 하는도다
१शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, “आण आणि आम्ही पीऊ.” ते तुम्ही हे वचन ऐका.
2 주 여호와께서 자기의 거룩함을 가리켜 맹세하시되 때가 너희에게 임할지라 사람이 갈고리로 너희를 끌어가며 낚시로 너희의 남은 자들을 그리하리라
२परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की, पाहा, ते तुम्हास आकड्यांनी, आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील, असे दिवस तुम्हावर येतील.
3 너희가 성 무너진 데로 말미암아 각기 앞으로 바로 나가서 하르몬에 던지우리라 이는 여호와의 말씀이니라
३तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल, तुम्ही आपणास हर्मोन पर्वतावर टाकाल, असे परमेश्वर म्हणतो.
4 너희는 벧엘에 가서 범죄하며 길갈에 가서 죄를 더하며 아침마다 너희 희생을, 삼 일 마다 너희 십일조를 드리며
४“बेथेलला जा आणि पाप करा, गिलगालला जाऊन बहूतपट पापे करा, तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ आणि तीन वर्षांनी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा.
5 누룩 넣은 것을 불살라 수은제로 드리며 낙헌제를 소리내어 광포하려무나 이스라엘 자손들아 이것이 너희의 기뻐하는 바니라 이는 주 여호와의 말씀이니라
५खमिराच्या भाकरीने उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पण करा; खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजवून घोषीत करा; कारण हे इस्राएलाच्या लोकांनो, हे करायला तुम्हास आवडते.” असे परमेश्वर म्हणतो.
6 또 내가 너희 모든 성읍에서 너희 이를 한가하게 하며 너희 각처에서 양식이 떨어지게 하였으나 너희가 내게로 돌아오지 아니하였느니라 이는 여호와의 말씀이니라
६“मी तुम्हास तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली आणि तुमच्या सर्व स्थानांत भाकरीचा तोटा दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” असे परमेश्वर म्हणतो.
7 또 추수하기 석 달 전에 내가 너희에게 비를 멈추어 어떤 성읍에는 내리고 어떤 성읍에는 내리지 않게 하였더니 땅 한 부분은 비를 얻고 한 부분은 비를 얻지 못하여 말랐으매
७“कापणीला तीन महिने राहीले असता, त्यावेळेस मी तुम्हापासून पाऊस आवरून धरला. आणि मी एका शहरावर पाऊस पाडला आणि दुसऱ्या शहरावर पाऊस पाडला नाही. एका भागावर पाऊस पडला आणि ज्या भागावर पाऊस पडला नाही तो सुकून गेला.
8 두세 성읍 사람이 어떤 성읍으로 비틀거리며 물을 마시러 가서 만족히 마시지 못하였으나 너희가 내게로 돌아오지 아니하였느니라 이는 여호와의 말씀이니라
८म्हणून दोन्ही तिन्ही शहरातील लोक दुसऱ्या शहराकडे पाणी प्यायला धडपडत गेले. परंतु तृप्त झाले नाहीत, तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत.” असे परमेश्वर म्हणतो.
9 내가 풍재와 깜부기 재앙으로 너희를 쳤으며 팟종이로 너희의 많은 동산과 포도원과 무화과나무와 감람나무를 다 먹게 하였으나 너희가 내게로 돌아오지 아니하였느니라 이는 여호와의 말씀이니라
९“मी तुम्हास तांबेऱ्याने व भेरडाने पीडले आहे. टोळांनी तुमच्या बागांचा, व द्राक्षमळ्यांचा, व अंजिराच्या व जैतूनाच्या झाडांना फार खाऊन टाकले. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
10 내가 너희 중에 염병이 임하게 하기를 애굽에서 한 것처럼 하였으며 칼로 너희 청년들을 죽엿으며 너희 말들을 노략하게 하며 너희 진의 악취로 코를 찌르게 하였으나 너희가 내게로 돌아오지 아니하였느니라 이는 여호와의 말씀이니라
१०“मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे. तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत, आणि तुमचे घोडे पाडाव करून नेले आहेत, तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नाकपुडयात येईल असे केले आहे. तरीसुध्दा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
11 내가 너희 중의 성읍 무너뜨리기를 하나님 내가 소돔과 고모라를 무너뜨림 같이 하였으므로 너희가 불 붙는 가운데서 빼낸 나무 조각 같이 되었으나 너희가 내게로 돌아오지 아니하였느니라 이는 여호와의 말씀이니라
११“सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला. तसाच मी तुमच्यातील कित्येक शहरांचा नाश केला; आगीत पटकन ओढून काढलेल्या जळक्या काटकीप्रमाणे तुमची स्थिती होती. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
12 그러므로 이스라엘아 내가 이와 같이 네게 행하리라 내가 이것을 네게 행하리니 이스라엘아 네 하나님 만나기를 예비하라
१२“म्हणून हे इस्राएला, मी तुझ्याबाबत असेच करीन, आणि हे इस्राएला मी असे तुझ्याशी करेन तेव्हा, इस्राएलाच्या परमेश्वरास भेटण्यास सज्ज हो.
13 대저 산들을 지으며 바람을 창조하며 자기 뜻을 사람에게 보이며 아침을 어둡게 하며 땅의 높은 데를 밟는 자는 그 이름이 만군의 하나님 여호와니라
१३कारण पाहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वांत आणतो, आणि मनुष्यास त्याची कल्पना काय ती प्रगट करतो, जो पाहाटे अंधार करतो, आणि पृथ्वीच्या उंच स्थानांवर चालतो. त्याचे नाव परमेश्वर, सेनाधीश देव आहे.”