< 시편 149 >
1 할렐루야! 새 노래로 여호와께 노래하며 성도의 회중에서 찬양할지어다!
१परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
2 이스라엘은 자기를 지으신 자로 인하여 즐거워하며 시온의 자민 저희의 왕으로 인하여 즐거워 할지어다
२इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
3 춤 추며 그의 이름을 찬양하며 소고와 수금으로 그를 찬양할지어다!
३ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
4 여호와께서는 자기 백성을 기뻐하시며 겸손한 자를 구원으로 아름답게 하심이로다
४कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.
5 성도들은 영광 중에 즐거워하며 저희 침상에서 기쁨으로 노래할지어다
५भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
6 그 입에는 하나님의 존영이요 그 수중에는 두 날 가진 칼이로다
६देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
७यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी.
8 저희 왕들은 사슬로, 저희 귀인은 철고랑으로 결박하고
८ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
9 기록한 판단대로 저희에게 시행할지로다 이런 영광은 그 모든 성도에게 있도다 할렐루야!
९ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा.