< 잠언 8 >
1 지혜가 부르지 아니하느냐 명철이 소리를 높이지 아니하느냐
१ज्ञान हाक मारित नाही काय? सुज्ञपणा तिचा आवाज उंचावत नाही का?
२रस्त्याच्याबाजूला टेकडीच्या माथ्यावर, ज्ञान तिला चौकाकडे उभे करते.
3 성문 곁과 문 어귀와 여러 출입하는 문에서 불러 가로되
३ते शहराच्या प्रवेशव्दाराजवळ, शहराच्या वेशीजवळ, ती मोठ्याने हाक मारते.
4 사람들아 내가 너희를 부르며 내가 인자들에게 소리를 높이노라
४“लोकांनो, मी तुम्हास बोलावत आहे. आणि मानवजातीच्या मुलांसाठी आवाज उंचावते.
5 어리석은 자들아 너희는 명철할지니라 미련한 자들아 너희는 마음이 밝을지니라 너희는 들을지어다
५अहो भोळ्यांनो, तुम्ही समंजसपणा समजून घ्या आणि तुम्ही कोणी ज्ञानाचा द्वेष करता, त्या तुम्ही सुबुद्ध हृदयाचे व्हा.
6 내가 가장 선한 것을 말하리라 내 입술을 열어 정직을 내리라
६ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन,
7 내 입은 진리를 말하며 내 입술은 악을 미워하느니라
७कारण माझे मुख खरे आहे तेच बोलते, आणि माझ्या ओठांना वाईटाचा वीट आहे.
8 내 입의 말은 다 의로운즉 그 가운데 굽은 것과 패역한 것이 없나니
८माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही.
9 이는 다 총명 있는 자의 밝히 아는 바요 지식 얻은 자의 정직히 여기는 바니라
९ज्या कोणाला समज आहे त्यास माझी सर्व वचने सरळ आहेत; ज्या कोणाला ज्ञान प्राप्त झाले आहे त्यास माझी वचने योग्य आहेत.
10 너희가 은을 받지 말고 나의 훈계를 받으며 정금보다 지식을 얻으라
१०रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा, आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या.
11 대저 지혜는 진주보다 나으므로 무릇 원하는 것을 이에 비교할 수 없음이니라
११कारण मी, ज्ञान, मौल्यवान खड्यांपेक्षा उत्तम आहे; त्याची आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही वस्तूशी माझी तुलना होऊ शकत नाही.
12 나 지혜는 명철로 주소를 삼으며 지식과 근신을 찾아 얻나니
१२मी, ज्ञान, चातुर्याबरोबर राहते, आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहे.
13 여호와를 경외하는 것은 악을 미워하는 것이라 나는 교만과 거만과 악한 행실과 패역한 입을 미워하느니라
१३परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे; मी गर्व, अभिमान, वाईट मार्ग व कुटिल वाणी यांचा मी द्वेष करते.
14 내게는 도략과 참 지식이 있으며 나는 명철이라 내게 능력이 있으므로
१४चांगला सल्ला आणि सुज्ञान ही माझी आहेत; मला ज्ञान आहे आणि सामर्थ्य ही माझी आहेत.
15 나로 말미암아 왕들이 치리하며 방백들이 공의를 세우며
१५माझ्याद्वारे राजे सरदारसुद्धा राज्य करतात आणि सर्व अधिकारी न्यायाने कारभार चालवतात.
16 나로 말미암아 재상과 존귀한 자 곧 세상의 모든 재판관들이 다스리느니라
१६माझ्याद्वारे राजपुत्र आणि सरदार व सर्व कोणी न्यायाधीश अधिकार चालवतात.
17 나를 사랑하는 자들이 나의 사랑을 입으며 나를 간절히 찾는 자가 나를 만날 것이니라
१७माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; आणि जे मला परिश्रमाने शोधतात, त्यांना मी सापडते.
18 부귀가 내게 있고 장구한 재물과 의도 그러하니라
१८धन व सन्मान, टिकणारी संपत्ती व सदाचरण ही माझ्याजवळ आहे.
19 내 열매는 금이나 정금보다 나으며 내 소득은 천은보다 나으니라
१९माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षाही उत्तम आहे; मी जे काही उत्पन्न करतो ते शुद्ध रुप्यापेक्षा उत्तम आहे.
20 나는 의로운 길로 행하며 공평한 길 가운데로 다니나니
२०जो योग्य मार्ग आहे त्याने मी चालते, ती वाट न्यायाकडे नेते,
21 이는 나를 사랑하는 자로 재물을 얻어서 그 곳간에 채우게 하려함이니라
२१म्हणून जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी वडिलोपार्जित मिळकत देते. आणि त्यांची भांडारे भरते.
22 여호와께서 그 조화의 시작 곧 태초에 일하시기 전에 나를 가지셨으며
२२परमेश्वराने सुरवातीपासून आपल्या पुरातन कृत्यातले पहिले कृत्य असे मला निर्माण केले.
23 만세 전부터 상고부터, 땅이 생기기 전부터, 내가 세움을 입었나니
२३अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली.
24 아직 바다가 생기지 아니하였고 큰 샘들이 있기 전에 내가 이미났으며
२४जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते. तेव्हा माझा जन्म झाला;
25 산이 세우심을 입기 전에 언덕이 생기기 전에 내가 이미 났으니
२५पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, आणि टेकड्यापूर्वी, माझा जन्म झाला.
26 하나님이 아직 땅도 들도 세상 진토의 근원도 짓지 아니하셨을 때에라
२६परमेश्वराने पृथ्वी व शेत किंवा पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच मी जन्मले.
27 그가 하늘을 지으시며 궁창으로 해면에 두르실 때에 내가 거기 있었고
२७जेव्हा त्याने आकाशाची स्थापना केली तेव्हा मी तिथे होते, जेव्हा त्याने जलाशयाची वर्तुळाकार सीमा आखली.
28 그가 위로 구름 하늘을 견고하게 하시며 바다의 샘들을 힘 있게하시며
२८जेव्हा त्याने आकाश वर स्थापित केले तेव्हा मी होते आणि, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले.
29 바다의 한계를 정하여 물로 명령을 거스리지 못하게 하시며 또 땅의 기초를 정하실 때에
२९जेव्हा त्याने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाण्याने त्याच्या आज्ञेच उल्लंघन करून पसरू नये, आणि जेव्हा त्याने आज्ञा केली पृथ्वीचा पाया जेथे असायला पाहिजे तेथे मी होते.
30 내가 그 곁에 있어서 창조자가 되어 날마다 그 기뻐하신 바가 되었으며 항상 그 앞에서 즐거워하였으며
३०तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागिर होते, दिवसेंदिवस मी आनंदाने भरत होतो, मी त्याच्यासमोर सर्वदा हर्ष करीत असे.
31 사람이 거처할 땅에서 즐거워하며 인자들을 기뻐하였었느니라
३१मी त्याच्या संपूर्ण पृथ्वीवर हर्ष करी, आणि मनुष्यजातीच्या ठायी माझा आनंद होता.
32 아들들아 이제 내게 들으라 내 도를 지키는 자가 복이 있느니라
३२तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, जे माझे मार्ग अनुसरतात ते धन्य आहेत.
33 훈계를 들어서 지혜를 얻으라 그것을 버리지 말라
३३माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा; दुर्लक्ष करू नका.
34 누구든지 내게 들으며 날마다 내 문 곁에서 기다리며 문설주 옆에서 기다리는 자는 복이 있나니
३४जो माझे ऐकतो तो सुखी होईल तो माझ्या दारांशी प्रत्येक दिवशी जागत राहतो; तो माझ्या घराच्या दाराजवळ माझ्यासाठी थांबतो.
35 대저 나를 얻는 자는 생명을 얻고 여호와께 은총을 얻을 것임이니라
३५कारण ज्याला मी सापडते, त्यास जीवन सापडते, आणि त्यास परमेश्वराकडून अनुग्रह मिळतो.
36 그러나 나를 잃는 자는 자기의 영혼을 해하는 자라 무릇 나를 미워하는 자는 사망을 사랑하느니라
३६पण जो कोणी मला शोधण्यास अयशस्वी होतो, जिवाची हानी करून घेतो; जे सर्व कोणी माझा द्वेष करतात, त्यांना मरण प्रिय आहे.”