< 잠언 27 >
1 너는 내일 일을 자랑하지 말라 하루 동안에 무슨 일이 날는지 네가 알 수 없음이니라
१उद्याविषयी बढाई मारू नकोस, कारण एक दिवस काय घेऊन येईल हे तुला माहित नाही.
2 타인으로 너를 칭찬하게 하고 네 입으로는 말며 외인으로 너를 칭찬하게 하고 네 입술로는 말지니라
२तुझ्या स्वतःच्या मुखाने नव्हे तर दुसऱ्याने तुझी स्तुती करावी, तुझ्याच ओठांनी नव्हे तर परक्याने तुझी स्तुती करावी,
3 돌은 무겁고 모래도 가볍지 아니하거니와 미련한 자의 분노는 이 둘보다 무거우니라
३दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वजनाने भारी असते, पण मुर्खाला डिवचणे या दोन्हीपेक्षा भारी असते.
4 분은 잔인하고 노는 창수 같거니와 투기 앞에야 누가 서리요
४क्रोधाचा क्रूरपणा आणि कोपाचा पूर पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?
५गुप्त प्रेमापेक्षा उघड निषेध चांगला आहे.
6 친구의 통책은 충성에서 말미암은 것이나 원수의 자주 입맞춤은 거짓에서 난 것이니라
६मित्राने केलेले घाव विश्वासू आहेत, पण शत्रू तुमची विपुलतेने चुंबणे घेतो.
7 배부른 자는 꿀이라도 싫어하고 주린 자에게는 쓴 것이라도 다니라
७जो कोणी पूर्ण तृप्त आहे त्यास मधाच्या पोळाचा कंटाळा येतो, भुकेल्याला प्रत्येक कडू गोष्ट गोड आहे.
8 본향을 떠나 유리하는 사람은 보금자리를 떠나 떠도는 새와 같으니라
८जसा पक्षी आपल्या घरट्यापासून भटकतो, तसा मनुष्य जेथे कोठे राहतो तेथून चुकून भलतीकडे जातो.
9 기름과 향이 사람의 마음을 즐겁게 하나니 친구의 충성된 권고가 이와 같이 아름다우니라
९सुगंधी द्रव्य आणि सुवास हृदय आनंदीत करतात. पण मित्राचा गोडपण त्याच्या सल्ल्यापेक्षा उत्तम आहे.
10 네 친구와 네 아비의 친구를 버리지 말며 네 환난날에 형제의 집에 들어가지 말지어다 가까운 이웃이 먼 형제보다 나으니라
१०स्वतःच्या आणि आपल्या वडिलांच्या मित्रांना सोडू नकोस; आणि आपल्या संकटाच्या दिवशी भावाच्या घरी जाऊ नको. दूरवरच्या आपल्या भावाकडे जाण्यापेक्षा जवळचा शेजारी चांगला आहे.
11 내 아들아 지혜를 얻고 내 마음을 기쁘게 하라 그리하면 나를 비방하는 자에게 내가 대답할 수 있겠노라
११माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे मन आनंदीत कर, नंतर जो कोणी माझ्यावर टीका करेल त्यास मी उत्तर देईन.
12 슬기로운 자는 재앙을 보면 숨어 피하여도 어리석은 자들은 나아가다가 해를 받느니라
१२शहाणा मनुष्य संकटाला पाहतो आणि स्वतःला लपवतो, पण भोळेपुढे जातात आणि त्यांना त्याची किंमत द्यावी लागते.
13 타인을 위하여 보증이 된 자의 옷을 취하라 외인들의 보증이 된자는 그 몸을 볼모로 잡힐지니라
१३जो परक्याच्या कर्जासाठी पैसे ठेवून जामीन झाला आहे त्याचे वस्त्र ठेवून घे; पण जेव्हा तो व्यभिचारी स्त्रीसाठी जामीन होतो त्यास तारणादाखल ठेव.
14 이른 아침에 큰 소리로 그 이웃을 축복하면 도리어 저주 같이 여기게 되리라
१४जो कोणी पहाटेस उठून आपल्या शेजाऱ्याला मोठ्या आवाजात आशीर्वाद देतो, तो त्यास शाप असा गणला जाईल.
15 다투는 부녀는 비오는 날에 이어 떨어지는 물방울이라
१५पावसाच्या दिवसात सतत गळणारे ठिपके, भांडखोर पत्नी सारखीच आहेत.
16 그를 제어하기가 바람을 제어하는 것 같고 오른손으로 기름을 움키는 것 같으니라
१६तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखे आहे, किंवा आपल्या हातात तेल पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे.
17 철이 철을 날카롭게 하는 것 같이 사람이 그 친구의 얼굴을 빛나게 하느니라
१७लोखंड लोखंडाला धारदार करते; तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा धारदार करतो.
18 무화과나무를 지키는 자는 그 과실을 먹고 자기 주인을 시종하는 자는 영화를 얻느니라
१८जो कोणी अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याचे फळ खाईल. आणि तसेच जो कोणी आपल्या धन्याचे रक्षण करतो त्याचा मान होईल.
19 물에 비취이면 얼굴이 서로 같은 것 같이 사람의 마음도 서로 비취느니라
१९जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जशाचे तसे दिसते, तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते.
20 음부와 유명은 만족함이 없고 사람의 눈도 만족함이 없느니라 (Sheol )
२०मृतलोक आणि विनाशस्थान ही कधीही तृप्त होत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याचे डोळे कधी तृप्त होत नाही. (Sheol )
21 도가니로 은을, 풀무로 금을, 칭찬으로 사람을 시련하느니라
२१रुप्यासाठी मूस आणि सोन्यासाठी भट्टी आहे; आणि तसे मनुष्याची स्तुतीने पारख केली जाते.
22 미련한 자를 곡물과 함께 절구에 넣고 공이로 찧을지라도 그의 미련은 벗어지지 아니하느니라
२२जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही.
23 네 양떼의 형편을 부지런히 살피며 네 소떼에 마음을 두라
२३तू आपल्या शेरडामेंढरांना एकत्र जमून त्यांची स्थिती जाणून खात्री कर. आणि आपल्या कळपाकडे नीट लक्ष दे.
24 대저 재물은 영영히 있지 못하나니 면류관이 어찌 대대에 있으랴
२४संपत्ती कायम टिकत नाही. मुकुट तरी सर्व पिढ्यानपिढ्या टिकेल काय?
25 풀을 벤 후에는 새로 움이 돋나니 산에서 꼴을 거둘 것이니라
२५गवत जाते आणि पुन्हा नवीन उगवते. आणि डोंगरावरील हिरवळ कापून गुरांढोरासाठी गोळा करण्यात येते.
26 어린 양의 털은 네 옷이 되며 염소는 밭을 사는 값이 되며
२६वस्त्रासाठी कोकरे आहेत, आणि बकरे शेताचे मोल आहेत.
27 염소의 젖은 넉넉하여 너와 네 집 사람의 식물이 되며 네 여종의 먹을 것이 되느니라
२७बकरीचे दूध तुझ्या खाण्यासाठी व तुझ्या घरच्यांच्या खाण्यासाठी, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते तुझ्याजवळ आहे.