< 레위기 26 >

1 너희는 자기를 위하여 우상을 만들지 말지니 목상이나 주상을 세우지 말며 너희 땅에 조각한 석상을 세우고 그에게 경배하지 말라 나는 너희 하나님 여호와임이니라!
तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात, उभारू नका कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
2 너희는 나의 안식일을 지키며 나의 성소를 공경하라! 나는 여호와니라!
तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्बाथांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे.
3 너희가 나의 규례와 계명을 준행하면
तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या,
4 내가 너희 비를 그 시후에 주리니 땅은 그 산물을 내고 밭의 수목은 열매를 맺을지라
तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.
5 너희의 타작은 포도 딸 때까지 미치며 너희의 포도 따는 것은 파종할 때까지 미치리니 너희가 음식을 배불리 먹고 너희 땅에 안전히 거하리라
तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत रहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत रहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल.
6 내가 그 땅에 평화를 줄 것인즉 너희가 누우나 너희를 두렵게 할자가 없을 것이며 내가 사나운 짐승을 그 땅에서 제할 것이요 칼이 너희 땅에 두루 행하지 아니할 것이며
मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही.
7 너희가 대적을 쫓으리니 그들이 너희 앞에서 칼에 엎드러질 것이라
तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल.
8 너희 다섯이 백을 쫓고, 너희 백이 만을 쫓으리니 너희 대적들이 너희 앞에서 칼에 엎드러질 것이며
तुमच्यातील पाच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.
9 내가 너희를 권고하여 나의 너희와 세운 언약을 이행하여 너희로 번성케 하고 너희로 창대케 할 것이며
मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन;
10 너희는 오래 두었던 묵은 곡식을 먹다가 새 곡식을 인하여 묵은 곡식을 치우게 될 것이며
१०तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
11 내가 내 장막을 너희 중에 세우리니 내 마음이 너희를 싫어하지 아니할 것이며
११मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन; आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही.
12 나는 너희 중에 행하여 너희 하나님이 되고 너희는 나의 백성이 될 것이니라
१२मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल.
13 나는 너희를 애굽 땅에서 인도하여 내어 그 종된 것을 면케 한 너희 하나님 여호와라! 내가 너희 멍에 빗장목을 깨뜨리고 너희로 바로 서서 걷게 하였느니라
१३मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे!
14 그러나 너희가 내게 청종치 아니하여 이 모든 명령을 준행치 아니하며
१४परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत;
15 나의 규례를 멸시하며 마음에 나의 법도를 싫어하여 나의 모든 계명을 준행치 아니하며 나의 언약을 배반할진대
१५तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला.
16 내가 이같이 너희에게 행하리니 곧 내가 너희에게 놀라운 재앙을 내려 폐병과 열병으로 눈이 어둡고 생명이 쇠약하게 할것이요 너희의 파종은 헛되리니 너희의 대적이 그것을 먹을 것임이며
१६जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हास पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.
17 내가 너희를 치리니 너희가 너희 대적에게 패할 것이요 너희를 미워하는 자가 너희를 다스릴 것이며 너희는 쫓는 자가 없어도 도망하리라
१७मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
18 너희가 그렇게 되어도 내게 청종치 아니하면 너희 죄를 인하여 내가 너희를 칠배나 더 징치할지라
१८या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास सातपट शिक्षा करीन.
19 내가 너희의 세력을 인한 교만을 꺾고 너희 하늘로 철과 같게 하며 너희 땅으로 놋과 같게 하리니
१९मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन.
20 너희 수고가 헛될지라 땅은 그 산물을 내지 아니하고 땅의 나무는 그 열매를 맺지 아니하리라
२०तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.
21 너희가 나를 거스려 내게 청종치 않을진대 내가 너희 죄대로 너희에게 칠배나 더 재앙을 내릴 것이라
२१तरीसुध्दा तुम्ही माझ्याविरूद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हावर तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक संकटे आणीन.
22 내가 들짐승을 너희 중에 보내리니 그것들이 너희 자녀를 움키고 너희 육축을 멸하며 너희 수효를 감소케 할지라 너희 도로가 황폐하리라
२२मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना उचलून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; आणि तुमची संख्या कमी करतील. त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.
23 이런 일을 당하여도 너희가 내게로 돌아오지 아니하고 나를 대항할진대
२३एवढे करुनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही परंतु माझ्या विरुध्द चालत राहिलात,
24 나 곧 나도 너희에게 대항하여 너희 죄를 인하여 너희를 칠배나 더 칠지라
२४तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट ताडण करीन.
25 내가 칼을 너희에게로 가져다가 너희의 배약한 원수를 갚을 것이며 너희가 성읍에 모일지라도 너희 중에 염병을 보내고 너희를 대적의 손에 붙일 것이며
२५मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल.
26 내가 너희 의뢰하는 양식을 끊을 때에 열 여인이 한 화덕에서 너희 떡을 구워 저울에 달아 주리니 너희가 먹어도 배부르지 아니하리라
२६मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.
27 너희가 이같이 될지라도 내게 청종치 아니하고 내게 대항할진대
२७एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरूद्ध वागला,
28 내가 진노로 너희에게 대항하되 너희 죄를 인하여 칠배나 더 징책하리니
२८तर मग संतापून मी तुमच्याविरुध्द चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट शिक्षा करीन!
29 너희가 아들의 고기를 먹을 것이요 딸의 고기를 먹을 것이며
२९तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुम्हावर येईल.
30 내가 너희의 산당을 헐며 너희의 태양 주상을 찍어 넘기며 너희 시체를 파상한 우상 위에 던지고 내 마음이 너희를 싫어할 것이며
३०तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
31 내가 너희 성읍으로 황폐케 하고 너희 성소들로 황량케 할 것이요 너희의 향기로운 향을 흠향치 아니하고
३१मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही.
32 그 땅을 황무케 하리니 거기 거하는 너희 대적들이 그것을 인하여 놀랄 것이며
३२मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील.
33 내가 너희를 열방 중에 흩을 것이요 내가 칼을 빼어 너희를 따르게 하리니 너희의 땅이 황무하며 너희의 성읍이 황폐하리라
३३परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.
34 너희가 대적의 땅에 거할 동안에 너희 본토가 황무할 것이므로 땅이 안식을 누릴 것이라 그 때에 땅이 쉬어 안식을 누리리니
३४जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात रहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगीत राहील.
35 너희가 그 땅에 거한 동안 너희 안식시에 쉼을 얻지 못하던 땅이 그 황무할 동안에는 쉬리라
३५देश ओसाड असेपर्यंत तुम्ही राहत असताना तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्यास मिळेल.
36 너희 남은 자에게는 그 대적의 땅에서 내가 그들의 마음으로 약하게 하리니 그들은 바람에 불린 잎사귀 소리에도 놀라 도망하기를 칼을 피하여 도망하듯 할 것이요 쫓는 자가 없어도 엎드러질 것이라
३६तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रुंच्या देशात असता मी अशी भिती घालीन की, उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील, तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीमागे लागले नसतांनाही ते पडतील.
37 그들은 쫓는 자가 없어도 칼 앞에 있음같이 서로 천답하여 넘어지리니 너희가 대적을 당할 힘이 없을 것이요
३७कोणी पाठीस लागले नसतांनाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेंकावर पडतील. तुमच्या शत्रूविरूद्ध उभे राहण्याइतके बळ तुमच्यात नसणार.
38 너희가 열방 중에서 망하리니 너희 대적의 땅이 너희를 삼킬 것이라
३८राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल.
39 너희 남은 자가 너희 대적의 땅에서 자기의 죄로 인하여 쇠잔하며 그 열조의 죄로 인하여 그 열조 같이 쇠잔하리라
३९तेव्हा उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील जसे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.
40 그들이 자기 죄와 그 열조의 죄와 및 그들이 나를 거스린 허물을 자복하고 또 자기들이 나를 대항하였으므로
४०परंतु कदाचित ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे व त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला व माझ्या विरुध्द चालले हे कबूल करतील.
41 나도 그들을 대항하여 그 대적의 땅으로 끌어 갔음을 깨닫고 그 할례받지 아니한 마음이 낮아져서 그 죄악의 형벌을 순히 받으면
४१या कारणामुळे, मीही त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या पापांबद्दलची शिक्षा मान्य करतील.
42 내가 야곱과 맺은 내 언약과 이삭과 맺은 내 언약을 생각하며 아브라함과 맺은 내 언약을 생각하고 그 땅을 권고하리라
४२तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी आठवेन तसेच इसहाकाशी केलेला करार व अब्राहाम ह्याच्याशी केलेला करार यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन.
43 그들이 나의 법도를 싫어하며 나의 규례를 멸시하였으므로 그 땅을 떠나서 사람이 없을 때에 땅이 황폐하여 안식을 누릴 것이요 그들은 자기 죄악으로 형벌을 순히 받으리라
४३त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि ओस असेपर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; त्यांनी माझे विधी मानण्यास नकार दिला व माझे नियम तुच्छ लेखले म्हणूनच त्यांना त्यांच्या पापाचा दंड भरावा लागेल.
44 그런즉 그들이 대적의 땅에 거할 때에 내가 싫어 버리지 아니하며, 미워하지 아니하며, 아주 멸하지 아니하여 나의 그들과 세운 언약을 폐하지 아니하리니 나는 여호와 그들의 하나님이 됨이라
४४इतके असताही ते त्यांच्या शत्रुंच्या देशात असताना, त्यांचा सपूंर्ण नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नकार करणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे.
45 내가 그들의 하나님이 되기 위하여 열방의 목전에 애굽에서 인도하여 낸 그들의 열조와 맺은 언약을 그들을 위하여 기억하리라 나는 여호와니라!
४५त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!
46 이상은 여호와께서 시내산에서 자기와 이스라엘 자손 사이에 모세로 세우신 규례와 법도와 율법이니라
४६हे विधी, नियम व निर्बंध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांस सांगितले.

< 레위기 26 >