< 레위기 21 >

1 여호와께서 모세에게 이르시되 아론의 자손 제사장들에게 고하여 이르라 백성 중의 죽은 자로 인하여 스스로 더럽히지 말려니와
परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे पुत्र, जे याजक त्यांना असे सांग की, आपल्या लोकांमधील मरण पावलेल्या मनुष्यास स्पर्श करून याजकाने स्वत: ला अशुद्ध करून घेऊ नये.
2 골육지친인 부모나 자녀나 형제나
परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप मुलगा, मुलगी, भाऊ,
3 출가하지 아니한 처녀인 친 자매로 인하여는 몸을 더럽힐 수 있느니라
आणि आपल्याजवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे.
4 제사장은 백성의 어른인즉 스스로 더럽혀 욕되게 하지 말지니라
याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्याप्रमाणे लग्न करून स्वत: ला अपवित्र करून घेऊ नये.
5 제사장은 머리털을 깎아 대머리 같게 하지 말며 그 수염 양편을 깎지 말며 살을 베지 말고
याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;
6 그 하나님께 대하여 거룩하고 그 하나님의 이름을 욕되게 하지 말 것이며 그들은 여호와의 화제 곧 그 하나님의 식물을 드리는 자인즉 거룩할 것이라
त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र रहावे आणि आपल्या देवाच्या नावाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वरास अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र रहावे.
7 그들은 기생이나 부정한 여인을 취하지 말 것이며 이혼 당한 여인을 취하지 말지니 이는 그가 여호와께 거룩함이니라
याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली पत्नी करून घेऊ नये.
8 너는 그를 거룩하게 하라! 그는 네 하나님의 식물을 드림이니라 너는 그를 거룩히 여기라! 나 여호와 너희를 거룩하게 하는 자는 거룩함이니라
याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्यास पवित्र मानावे, त्यास तू पवित्र लेखावे; कारण तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.
9 아무 제사장의 딸이든지 행음하여 스스로 더럽히면 그 아비를 욕되게 함이니 그를 불사를지니라
एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करून घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाला कलंक लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
10 자기 형제 중 관유로 부음을 받고 위임되어 예복을 입은 대제사장은 그 머리를 풀지 말며 그 옷을 찢지 말며
१०आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांमध्ये शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;
11 어떤 시체에든지 가까이 말지니 부모로 인하여도 더러워지게 말며
११त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये.
12 성소에서 나오지 말며 그 하나님의 성소를 더럽히지 말라! 이는 하나님의 위임한 관유가 그 위에 있음이니라 나는 여호와니라!
१२त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
13 그는 처녀를 취하여 아내를 삼을지니
१३मुख्य याजकाने कुमारीशीच लग्न करावे,
14 과부나 이혼된 여인이나 더러운 여인이나 기생을 취하지 말고 자기 백성 중 처녀를 취하여 아내를 삼아
१४भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने पत्नी करून घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारीशीच लग्न करावे.
15 그 자손으로 백성 중에서 더럽히지 말지니 나는 그를 거룩하게 하는 여호와임이니라
१५अशा प्रकारे त्याने आपल्या लोकात आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; कारण मी जो परमेश्वर त्या मी त्यास पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.”
16 여호와께서 모세에게 일러 가라사대
१६परमेश्वर मोशेला म्हणाला,
17 아론에게 고하여 이르라 무릇 너의 대대 자손 중 육체에 흠이 있는 자는 그 하나님의 식물을 드리려고 가까이 오지 못할 것이라
१७“अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यानमध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग शारीरिक दोष निघाले तर त्याने आपल्या देवाकरता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये.
18 무릇 흠이 있는 자는 가까이 못할지니 곧 소경이나, 절뚝발이나, 코가 불완전한 자나, 지체가 더한 자나,
१८शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही मनुष्याने मला अर्पण आणू नये; याजक या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी: आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला,
19 발 부러진 자나, 손 부러진 자나,
१९मोडक्या पायाचा, थोटा,
20 곱사등이나, 난장이나, 눈에 백막이 있는 자나, 괴혈병이나, 버짐이 있는 자나, 불알 상한 자나,
२०कुबडा, ठेंगू, डोळयात दोष असलेला, पुरळ किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला;
21 제사장 아론의 자손 중에 흠이 있는 자는 나아와 여호와의 화제를 드리지 못할지니 그는 흠이 있은즉 나아와 하나님의 식물을 드리지 못하느니라
२१अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वरास अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊ नये; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ जाऊ नये.
22 그는 하나님의 식물의 지성물이든지 성물이든지 먹을 것이나
२२तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने त्याच्या देवाचे पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे;
23 장 안에 들어가지 못할 것이요 단에 가까이 못할지니 이는 그가 흠이 있음이라 이와 같이 그가 나의 성소를 더럽히지 못할 것은 나는 그들을 거룩하게 하는 여호와임이니라!
२३परंतु त्यास व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परमपवित्र स्थाने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!”
24 모세가 이대로 아론과 그 아들들과 온 이스라엘 자손에게 고하였더라
२४तेव्हा मोशेने अहरोन, त्याचे पुत्र व सगळे इस्राएल लोक ह्याना हे सर्व सांगितले.

< 레위기 21 >