< 욥기 28 >

1 은은 나는 광이 있고 연단하는 금은 나는 곳이 있으며
“खरोखर चांदी मिळते अशा खाणी आहेत, सोने शुद्ध करण्याची जागा असते.
2 철은 흙에서 취하고 동은 돌에서 녹여 얻느니라
जमिनीतून लोखंड काढतात, पाषाणामधून तांबे वितळवले जाते.
3 사람이 흑암을 파하고 끝까지 궁구하여 음예와 유암 중의 광석을 구하되
मनुष्य अंधाराचे निवारण करतो, अगदी खोलवर जाऊन, गडद अंधारातील व मृत्यूछायेतील पाषाणाचा तो शोध करीतो.
4 사람 사는 곳에서 멀리 떠나 구멍을 깊이 뚫고 발이 땅에 닿지 않게 달려 내리니 멀리 사람과 격절되고 흔들흔들 하느니라
लोकांच्या राहण्याच्या जागेपासून तो दूर खाण खणतो, जिथे आजपर्यंत कोणाचेही पाऊल गेले नसेल तिथे तो जातो, तो दोरीला लोंबकळतो इतरांपेक्षा खूप खोल जातो.
5 지면은 식물을 내나 지하는 불로 뒤집는 것같고
जसे जमिनीकडे पाहा, तिच्यातून आपणास अन्न मिळते, जसे अग्नीने तिला उलटवले जाते.
6 그 돌 가운데에는 남보석이 있고 사금도 있으며
जमिनीच्या खालचे पाषाण म्हणजे जेथे नीलमणी मिळतात, आणि त्या मातीमध्ये सोने असते.
7 그 길은 솔개도 알지 못하고 매의 눈도 보지 못하며
पक्ष्यांना त्या वाटांविषयी काही माहिती नसते, कोणत्याही बहिरी ससाण्याच्या डोळ्यांनी त्या वाटा पाहिलेल्या नसतात.
8 위엄스러운 짐승도 밟지 못하였고 사나운 사자도 그리로 지나가지 못하였느니라
रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात, सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो.
9 사람이 굳은 바위에 손을 대고 산을 뿌리까지 무너뜨리며
मनुष्य कठीण खडकावर हात टाकतो, तो ते डोंगर पूर्ण मुळापासून उलटवून टाकतो.
10 돌 가운데로 도랑을 파서 각종 보물을 눈으로 발견하고
१०ते खडकातून बोगदा खणतात, आणि त्यांचे डोळे खडकातला खजिना बघतात.
11 시냇물을 막아 스미지 않게 하고 감취었던 것을 밝은 데로 내느니라
११ते पाण्याचे प्रवाह बंद करतात म्हणजे त्यातून पाणि बाहेर पडत नाही, ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात.
12 그러나 지혜는 어디서 얻으며 명철의 곳은 어디인고
१२पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?
13 그 값을 사람이 알지 못하나니 사람 사는 땅에서 찾을 수 없구나
१३शहाणपण किती मोलाचे आहे हे मनुष्याला कळत नाही, पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत.
14 깊은 물이 이르기를 내 속에 있지 아니하다 하며 바다가 이르기를 나와 함께 있지 아니하다 하느니라
१४पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’ सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’
15 정금으로도 바꿀 수 없고 은을 달아도 그 값을 당치 못하리니
१५तुम्ही सोने देऊन ते विकत घेऊ शकत नाही, ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही.
16 오빌의 금이나 귀한 수마노나 남보석으로도 그 값을 당치 못하겠고
१६तुम्ही ओफीरच्या सोन्याने किंवा मौल्यवान गोमेद किंवा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
17 황금이나 유리라도 비교할 수 없고 정금 장식으로도 바꿀 수 없으며
१७शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते, सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
18 산호나 수정으로도 말할 수 없나니 지혜의 값은 홍보석보다 귀하구나
१८शहाणपण पोवळ्यापेक्षा व स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे, माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे.
19 구스의 황옥으로도 비교할 수 없고 순금으로도 그 값을 측량하지못하리니
१९इथिओपियातील (कूश) पीतमणी त्याच्या बरोबरीचा नाही, शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही.
20 그런즉 지혜는 어디서 오며 명철의 곳은 어디인고
२०मग शहाणपणा कुठून येते? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?
21 모든 생물의 눈에 숨겨졌고 공중의 새에게 가리워졌으며
२१पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे, आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
22 멸망과 사망도 이르기를 우리가 귀로 그 소문은 들었다 하느니라
२२मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही, आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’
23 하나님이 그 길을 깨달으시며 있는 곳을 아시나니
२३फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे, फक्त देवालाच तो कुठे आहे हे माहीत आहे.
24 이는 그가 땅 끝까지 감찰하시며 온 천하를 두루 보시며
२४देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते, त्यास आकाशाखालचे सर्वकाही दिसते.
25 바람의 경중을 정하시며 물을 되어 그 분량을 정하시며
२५देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली, सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.
26 비를 위하여 명령하시고 우뢰의 번개를 위하여 길을 정하셨음이라
२६पावसास कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.
27 그 때에 지혜를 보시고 선포하시며 굳게 세우시며 궁구하셨고
२७तेव्हा देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला, शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने पारखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली.
28 또 사람에게 이르시기를 주를 경외함이 곧 지혜요 악을 떠남이 명철이라 하셨느니라
२८आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”

< 욥기 28 >