< 이사야 61 >

1 주 여호와의 신이 내게 임하였으니 이는 여호와께서 내게 기름을 부으사 가난한 자에게 아름다운 소식을 전하게 하려 하심이라 나를 보내사 마음이 상한 자를 고치며 포로 된 자에게 자유를, 갇힌 자에게 놓임을 전파하며
प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे. ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे. पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी.
2 여호와의 은혜의 해와 우리 하나님의 신원의 날을 전파하여 모든 슬픈 자를 위로하되
परमेश्वराच्या कृपासमयाचे वर्ष व त्याच्या प्रतिकाराचा दिवस घोषणा करून सांगायला, आणि शोक करणाऱ्या सर्वांना सांत्वन करायला त्याने मला पाठवले आहे.
3 무릇 시온에서 슬퍼하는 자에게 화관을 주어 그 재를 대신하며 희락의 기름으로 그 슬픔을 대신하며 찬송의 옷으로 그 근심을 대신하시고 그들로 의의 나무 곧 여호와의 심으신 바 그 영광을 나타낼 자라 일컬음을 얻게 하려 하심이니라
सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील.
4 그들은 오래 황폐하였던 곳을 다시 쌓을 것이며 예로부터 무너진 곳을 다시 일으킬 것이며 황폐한 성읍 곧 대대로 무너져 있던 것들을 중수할 것이며
“ते प्राचीन ओसाड स्थले पुन्हा बांधतील, ते पूर्वी नाश झालेले पुनर्संचयित करतील, ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील.”
5 외인은 서서 너희 양떼를 칠 것이요 이방 사람은 너희 농부와 포도원지기가 될 것이나
परदेशी उभे राहून तुमचे कळप चारतील आणि परदेशीयांची मुले तुमच्या शेतांत आणि द्राक्षमळ्यांत काम करतील.
6 오직, 너희는 여호와의 제사장이라 일컬음을 얻을 것이라 사람들이 너희를 우리 하나님의 봉사자라 할 것이며 너희가 열방의 재물을 먹으며 그들의 영광을 얻어 자랑할 것이며
तुला “परमेश्वराचा याजक” आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हास अभिमान वाटेल.
7 너희가 수치 대신에 배나 얻으며 능욕 대신에 분깃을 인하여 즐거워할 것이라 그리하여 고토에서 배나 얻고 영영한 기쁨이 있으리라
“तुझ्या अपमाना ऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील, सर्वकाळचा आनंद त्याना प्राप्त होईल.”
8 대저 나 여호와는 공의를 사랑하며 불의의 강탈을 미워하여 성실히 그들에게 갚아 주고 그들과 영영한 언약을 세울 것이라
कारण मी परमेश्वर न्यायावर प्रीती करतो, आणि मी दरोडेखोर आणि हिंसक अन्यायाचा तिरस्कार वाटतो. मी विश्वासाने त्यांचे प्रतिफळ त्यांना देईन, आणि मी माझ्या लोकांबरोबर सर्वकाळचा करार करीन.
9 그 자손을 열방 중에, 그 후손을 만민 중에 알리리니 무릇 이를 보는 자가 그들은 여호와께 복 받은 자손이라 인정하리라
त्यांचे वंशज सर्व राष्ट्रांत आणि लोकांमध्ये त्यांचे संतान ओळखले जातील. त्यांना पाहणारे सर्व ते कबूल करतील की, “परमेश्वराने ज्या लोकांस आशीर्वादीत केले आहे, ते हेच आहेत.”
10 내가 여호와로 인하여 크게 기뻐하며 내 영혼이 나의 하나님으로 인하여 즐거워하리니 이는 그가 구원의 옷으로 내게 입히시며 의의 겉옷으로 내게 더하심이 신랑이 사모를 쓰며 신부가 자기 보물로 단장함 같게 하셨음이라
१०मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव अतीशय आनंदीत होतो. कारण जसा पती फेटा घालून आपणाला सुशोभित करतो, आणि नवरी जशी अलंकाराणे स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाचे वस्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.
11 땅이 쌀을 내며 동산이 거기 뿌린 것을 움돋게 함 같이 주 여호와께서 의와 찬송을 열방 앞에 발생하게 하시리라
११कारण पृथ्वी जशी आपले अंकूरलेले रोप उगवते, आणि जशी बाग त्याच्यामधील लागवड उगवते. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व राष्ट्रांसमोर चांगुलपणा व प्रशंसा अंकुरीत करीन.

< 이사야 61 >