< 갈라디아서 1 >
1 사람들에게서 난 것도 아니요 사람으로 말미암은 것도 아니요 오직 예수 그리스도와 및 죽은 자 가운데서 그리스도를 살리신 하나님 아버지로 말미암아 사도 된 바울은
१गलती प्रांतातील मंडळ्यांस; मनुष्यांकडून किंवा मनुष्यांच्याद्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे आणि ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले तो देवपिता, ह्याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल,
2 함께 있는 모든 형제로 더불어 갈라디아 여러 교회들에게
२याच्याकडून आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधूकडून,
3 우리 하나님 아버지와 주 예수 그리스도로 좇아 은혜와 평강이 있기를 원하노라
३देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
4 그리스도께서 하나님 곧 우리 아버지의 뜻을 따라 이 악한 세대에서 우리를 건지시려고 우리 죄를 위하여 자기 몸을 드리셨으니 (aiōn )
४आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे, या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल, स्वतःला दिले. (aiōn )
5 영광이 저에게 세세토록 있을지어다! 아멘 (aiōn )
५देवपित्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. (aiōn )
6 그리스도의 은혜로 너희를 부르신 이를 이같이 속히 떠나 다른 복음 좇는 것을 내가 이상히 여기노라
६मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्या शुभवर्तमानाकडे वळला आहात.
7 다른 복음은 없나니 다만 어떤 사람들이 너희를 요란케 하여 그리스도의 복음을 변하려 함이라
७दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही; पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करण्याची इच्छा असणारे असे कित्येक आहेत.
8 그러나 우리나 혹 하늘로부터 온 천사라도 우리가 너희에게 전한 복음 외에 다른 복음을 전하면 저주를 받을지어다!
८तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो शापित असो.
9 우리가 전에 말하였거니와 내가 지금 다시 말하노니 만일 누구든지 너희의 받은 것 외에 다른 복음을 전하면 저주를 받을지어다!
९आम्ही अगोदर सांगितले आहे तसेच आता मी पुन्हा सांगतो की, कोणी तुम्हास, जे तुम्ही स्वीकारले त्याच्यापेक्षा, निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापित असो.
10 이제 내가 사람들에게 좋게 하랴 하나님께 좋게 하랴 사람들에게 기쁨을 구하랴 내가 지금까지 사람의 기쁨을 구하는 것이었더면 그리스도의 종이 아니니라
१०मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
11 형제들아 내가 너희에게 알게 하노니 내가 전한 복음이 사람의 뜻을 따라 된 것이 아니라
११कारण, बंधूंनो, मी तुम्हास सांगतो की, मी ज्या शुभवर्तमानाची घोषणा केली ती मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही.
12 이는 내가 사람에게서 받은 것도 아니요 배운 것도 아니요 오직 예수 그리스도의 계시로 말미암은 것이라
१२कारण ती मला मनुष्याकडून मिळाली नाही तसेच ती मला कोणी शिकवलीही नाही; पण येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली.
13 내가 이전에 유대교에 있을 때에 행한 일을 너희가 들었거니와 하나님의 교회를 심히 핍박하여 잔해하고
१३तुम्ही माझ्या, यहूदी धर्मातील, पूर्वीच्या आचरणाविषयी ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा अत्यंत छळ करून तिचा नाश करीत असे.
14 내가 내 동족 중 여러 연갑자(年甲者)보다 유대교를 지나치게 믿어 내 조상의 유전에 대하여 더욱 열심이 있었으나
१४आणि मी माझ्या पूर्वजांच्या प्रथांविषयी पुष्कळ अधिक आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ लोंकापेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो.
15 그러나 내 어머니의 태로부터 나를 택정(擇定)하시고 은혜로 나를 부르신 이가
१५पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्यास जेव्हा बरे वाटले की,
16 그 아들을 이방에 전하기 위하여 그를 내 속에 나타내시기를 기뻐하실 때에 내가 곧 혈육과 의논하지 아니하고
१६आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे, म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये मी त्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता,
17 또 나보다 먼저 사도 된 자들을 만나려고 예루살렘으로 가지 아니하고 오직 아라비아로 갔다가 다시 다메섹으로 돌아갔노라
१७आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरूशलेमेस वर न जाता, पण मी लगेच अरबस्तान देशास निघून गेलो व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो.
18 그 후 삼년만에 내가 게바를 심방하려고 예루살렘에 올라가서 저와 함께 십 오일을 유할쌔
१८पुढे, तीन वर्षांनंतर, मी केफाला भेटण्यास वर यरूशलेमास गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याजवळ राहिलो;
19 주의 형제 야고보 외에 다른 사도들을 보지 못하였노라
१९पण प्रभूचा भाऊ याकोब ह्याच्याशिवाय मी इतर प्रेषितांपैकी दुसरा कोणीही माझ्या दृष्टीस पडला नाही.
20 보라 내가 너희에게 쓰는 것은 하나님 앞에서 거짓말이 아니로라
२०मी जे तुम्हास लिहित आहे, ते पाहा, देवासमोर, मी खोटे बोलत नाही.
21 그 후에 내가 수리아와 길리기아 지방에 이르렀으나
२१त्यानंतर मी सिरीया व किलिकिया प्रांतांत आलो
22 유대에 그리스도 안에 있는 교회들이 나를 얼굴로 알지 못하고
२२आणि ख्रिस्तात असलेल्या, यहूदीया प्रांतातील मंडळ्यांना मी अपरिचित होतो.
23 다만 우리를 핍박하던 자가 전에 잔해하던 그 믿음을 지금 전한다 함을 듣고
२३त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, ‘पूर्वी आमचा छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करीत होता त्याची तो आता सुवार्ता सांगत आहे.’
२४आणि ते माझ्याविषयी देवाचे गौरव करू लागले.