< 에스겔 3 >
1 그가 또 내게 이르시되 인자야! 너는 받는 것을 먹으라 너는 이 두루마리를 먹고 가서 이스라엘 족속에게 고하라 하시기로
१तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, जो ग्रंथ तुला प्राप्त झाला आहे तो ग्रंथ तू खाऊन टाक! आणि जा इस्राएलाच्या घराण्याशी बोल.”
2 내가 입을 벌리니 그가 그 두루마리를 내게 먹이시며
२म्हणून तेव्हा मी आपले तोंड उघडले व त्याने मला तो ग्रंथ खाऊ घातला.
3 내게 이르시되 인자야! 내가 네게 주는 이 두루마리로 네 배에 넣으며 네 창자에 채우라 하시기에 내가 먹으니 그것이 내 입에서 달기가 꿀 같더라
३तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, मी तुला दिलेल्या ग्रंथपटाने आपले पोट भरुन टाक!” मग मी ते खाल्ले, आणि ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड वाटले.
4 그가 또 내게 이르시되 인자야! 이스라엘 족속에게 가서 내 말로 그들에게 고하라
४तेव्हा तो मला म्हणाला “मानवाच्या मुला इस्राएलाच्या घराण्याकडे जा आणि माझे शब्द त्यांना सांग.
5 너를 방언이 다르거나 말이 어려운 백성에게 보내는 것이 아니요 이스라엘 족속에게 보내는 것이라
५अपरिचित वाणी आणि कठोर भाषेच्या लोकांजवळ मी तुला पाठवणार नाही, परंतू इस्राएलाच्या घरण्याकडे मी तुला पाठवतो;
6 너를 방언이 다르거나 말이 어려워 네가 알아듣지 못할 열국에 보내는 것이 아니니라 내가 너를 그들에게 보내었더면 그들은 정녕 네 말을 들었으리라
६मोठी राष्ट्रे अपरिचित, कठिण भाषेचे, ज्यांची भाषा समजत नाही त्यांच्याकडे पाठवत नाही! जर मी तुला त्यांच्याकडे पाठवले तर ते तुझे ऐकतील!
7 그러나 이스라엘 족속은 이마가 굳고 마음이 강퍅하여 네 말을 듣고자 아니하리니 이는 내 말을 듣고자 아니함이니라
७परंतु इस्राएलाचे घराणे तुझे ऐकण्याची इच्छा दाखवणार नाही, ते माझे ही ऐकण्याची इच्छा दाखवत नाहीत. म्हणून इस्राएलाचे सर्व घराणे हट्टी कपाळाचे आणि कठिण मनाचे आहेत.
8 내가 그들의 얼굴을 대하도록 네 얼굴을 굳게 하였고 그들의 이마를 대하도록 네 이마를 굳게 하였으되
८पहा! मी तुझा चेहरा त्यांच्या हट्टी चेहऱ्या सारखा त्यांच्या कठोर कपाळासारखे तुझे कपाळ केले आहे.
9 네 이마로 화석보다 굳은 금강석 같이 하였으니 그들이 비록 패역한 족속이라도 두려워 말며 그 얼굴을 무서워 말라 하시고
९तुझे कपाळ मी हिऱ्यासारखे कठोर केले आहे! त्यांना भयभीत होऊ नको; किंवा निराश होऊ नको; कारण ते पहिल्यापासून फितुर आहेत.”
10 또 내게 이르시되 인자야! 내가 네게 이를 모든 말을 너는 마음으로 받으며 귀로 듣고
१०तेव्हा तो मला म्हणाला; “मानवाच्या मुला, जे काही मी तुला बजावले आहे ते आपल्या मानात साठवून घे आणि आपल्या कानांनी त्यांचे ऐक!
11 사로잡힌 네 민족에게로 가서 그들이 듣든지 아니 듣든지 그들에게 고하여 이르기를 주 여호와의 말씀이 이러하시다 하라 하시더라
११मग गुलामांकडे तुझ्या लोकांजवळ जा आणि त्यांच्याशी बोल; ते ऐको किंवा न ऐको, परमेश्वर देव असे सांगतो”
12 때에 주의 신이 나를 들어 올리시는데 내 뒤에 크게 울리는 소리가 들려 이르기를 여호와의 처소에서 나는 영광을 찬송할지어다 하니
१२देवाच्या आत्म्याने मला वर उचलले, आणि माझ्या मागे मी भुकंपासारखा मोठा आवाज ऐकला, तो म्हणाला; त्याच्या स्थानातून परमेश्वर देवाचे गौरव धन्य आहे!
13 이는 생물들의 날개가 서로 부딪히는 소리와 생물 곁에 바퀴 소리라 크게 울리는 소리더라
१३ऐकमेकांना स्पर्श करणाऱ्या जिवंत प्राण्यांचा आवाज त्या नंतर मी ऐकला व त्यांच्या बरोबर चाकांचा आवाज व मोठ्या भुकंपाचाही आवाज होत होता!
14 주의 신이 나를 들어올려 데리고 가시는데 내가 근심하고 분한 마음으로 행하니 여호와의 권능이 힘있게 나를 감동하시더라
१४देवाच्या आत्म्याने मला उंच केले व वर नेले आणि माझ्या आत्म्यात कडवट पण घेऊन आलो, परमेश्वर देवाचा हात सामर्थ्याने माझ्यावर आला!
15 이에 내가 델아빕에 이르러 그 사로잡힌 백성 곧 그발강 가에 거하는 자들에게 나아가 그 중에서 민답히 칠일을 지내니라
१५तेल-अबीब या ठिकाणी मी गुलामांकडे गेलो, जे खबार ओढ्याच्या शेजारी राहत होते, आणि मी तेथे सात दिवस राहिलो आणि चकीत होऊन व्यापून गेलो.
16 칠일 후에 여호와의 말씀이 내게 임하여 가라사대
१६मग सातव्या दिवसानंतर परमेश्वर देवाचे वचन मला मिळाले, आणि म्हणाले,
17 인자야! 내가 너를 이스라엘 족속의 파숫군으로 세웠으니 너는 내 입의 말을 듣고 나를 대신하여 그들을 깨우치라
१७“मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घरण्यावर पहारा देण्यासाठी नेमलेले आहे, म्हणून माझ्या तोंडचा शब्द ऐकून घे व त्यांना सावध कर!
18 가령 내가 악인에게 말하기를 너는 꼭 죽으리라 할 때에 네가 깨우치지 아니하거나 말로 악인에게 일러서 그 악한 길을 떠나 생명을 구원케 하지 아니하면 그 악인은 그 죄악 중에서 죽으려니와 내가 그 피 값을 네 손에서 찾을 것이고
१८‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यांना बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून, तू त्यास बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.
19 네가 악인을 깨우치되 그가 그 악한 마음과 악한 행위에서 돌이키지 아니하면 그는 그 죄악 중에서 죽으려니와 너는 네 생명을 보존하리라
१९परंतू जर दुष्टाला त्याच्या मार्गापासून सावध केले, आणि तो आपल्या दुष्ट मार्गापासून किंवा कामापासून मागे वळला नाही तर तो त्याच्या पापात मरेल; मग त्याचा जाब तुझ्याकडे विचारला जाणार नाही.
20 또 의인이 그 의에서 돌이켜 악을 행할 때에는 이미 행한 그 의는 기억할 바 아니라 내가 그 앞에 거치는 것을 두면 그가 죽을지니 이는 네가 그를 깨우치지 않음이라 그가 그 죄 중에서 죽으려니와 그 피 값은 내가 네 손에서 찾으리라
२०जर देवभीरु व्यक्ती आपल्या देवाच्या भयापासून व कार्यापासून अधम वागेल, तर मी त्याच्या पुढे अडखळण ठेवेल, आणि तो मरेल जर तू त्यास सावध केले नाही, तो त्याच्या पापात मरेल, आणि त्याने केलेले धार्मिक काम आठवले जाणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाब मी तुला विचारेन.”
21 그러나 네가 그 의인을 깨우쳐 범죄치 않게 하므로 그가 범죄치 아니하면 정녕 살리니 이는 깨우침을 받음이며 너도 네 영혼을 보존하리라
२१परंतू जर तू देवभीरु मनुष्यास पाप करण्यापासून सावध करशील, तो निश्चित वाचेल; आणि त्याचा जाब तुला विचारला जाणार नाही.
22 여호와께서 권능으로 거기서 내게 임하시고 또 내게 이르시되 일어나 들로 나아가라 내가 거기서 너와 말하리라 하시기로
२२मग परमेश्वर देवाचा हात माझ्यावर आला, आणि तो मला म्हणाला, “उठ आणि दरीत जा, तेथे मी तुझ्याशी बोलेन!”
23 내가 일어나 들로 나아가니 여호와의 영광이 거기 머물렀는데 내가 전에 그발강 가에서 보던 영광과 같은지라 내가 곧 엎드리니
२३मी उठलो आणि दरीत खबार नदीजवळ गेलो, परमेश्वर देवाचे गौरव तेथे प्रकाशत होते; तेथे मी उपडा पडलो.
24 주의 신이 내게 임하사 나를 일으켜 세우시고 내게 말씀하여 가라사대 너는 가서 네 집에 들어가 문을 닫으라
२४देवाच्या आत्म्याने येऊन मला तेव्हा माझ्या पाया वर उभे केले; आणि माझ्याशी बोलला, व म्हणाला, जा आणि स्वतःला आपल्या घरात बंद करून ठेव,
25 인자야! 무리가 줄로 너를 동여매리니 네가 그들 가운데서 나오지 못할 것이라
२५आता, मानवाच्या मुला, ते तुला दोरीने बांधतील म्हणून त्याच्यामध्ये तू बाहेर जाऊ शकणार नाही.
26 내가 네 혀로 네 입천장에 붙게 하여 너로 벙어리 되어 그들의 책망자가 되지 못하게 하리니 그들은 패역한 족속임이니라
२६तुझी जीभ टाळूला चिकटेल असे मी करेन आणि तू मुका होशील त्यांना धमकावु शकणार नाहीस, कारण ते फितुर घराणे आहे.
27 그러나 내가 너와 말할 때에 네 입을 열리니 너는 그들에게 이르기를 주 여호와의 말씀이 이러하시다 하라 들을 자는 들을 것이요 듣기 싫은 자는 듣지 아니하리니 그들은 패역한 족속임이니라
२७पण जेव्हा मी तुझ्याशी बोलेन तेव्हा तुझे तोंड मी उघडीन व परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, ज्याला ऐकायचे असेल त्याने ऐकावे ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये कारण ते फितुर घराणे आहे.