< 출애굽기 27 >
1 너는 조각목으로 장이 오 규빗, 광이 오 규빗의 단을 만들되 네모 반듯하게 하며 고는 삼 규빗으로 하고
१परमेश्वर मोशेला म्हणाला, बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच अशी चौरस वेदी तयार कर.
2 그 네 모퉁이 위에 뿔을 만들되 그 뿔이 그것에 연하게 하고 그 단을 놋으로 쌀지며
२वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे अंगचीच बनलेली असावी; मग वेदी पितळेने मढवावी.
3 재를 담는 통과, 부삽과, 대야와, 고기 갈고리와, 불 옮기는 그릇을 만들되 단의 그릇을 다 놋으로 만들지며
३वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.
4 단을 위하여 놋으로 그물을 만들고 그 위 네 모퉁이에 놋고리 넷을 만들고
४तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.
5 그물은 단 사면 가장자리 아래 곧 단 절반에 오르게 할지며
५ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखाली, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.
6 또 그 단을 위하여 채를 만들되 조각목으로 만들고 놋으로 쌀지며
६वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत.
7 단 양편 고리에 그 채를 꿰어 단을 메게 할지며
७ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
8 단은 널판으로 비게 만들되 산에서 네게 보인대로 그들이 만들지니라!
८वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूंना फळ्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.
9 너는 성막의 뜰을 만들찌니 남을 향하여 뜰 남편에 광이 백 규빗의 세마포장을 쳐서 그 한 편을 당하게 할지니
९निवासमंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची कनात कर, तिची लांबी एका बाजूला शंभर हात असावी.
10 그 기둥이 스물이며 그 받침 스물은 놋으로 하고 그 기둥의 갈고리와 가름대는 은으로 할찌며
१०तिच्याकरता वीस खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत.
11 그 북편에도 광이 백 규빗의 포장을 치되 그 기둥이 스물이며 그 기둥의 받침 스물은 놋으로 하고 그 기둥의 갈고리와 가름대는 은으로 할지며
११वेदीच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.
12 뜰의 옆 곧 서편에 광 오십 규빗의 포장을 치되 그 기둥이 열이요, 받침이 열이며
१२अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.
13 동을 향하여 뜰 동편의 광도 오십 규빗이 될지며
१३अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पन्नास हात असावी.
14 문 이편을 위하여 포장이 십 오 규빗이며, 그 기둥이 셋이요, 받침이 셋이요
१४अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीची पडद्याची कनात असावी; या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात;
15 문 저편을 위하여도 포장이 십오 규빗이며, 그 기둥이 셋이요, 받침이 셋이며
१५फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाही पंधरा हात लांबीची पडद्याची कनात, व तिलाही तीन खांब व तीन खुर्च्या हे सर्व असावे.
16 뜰 문을 위하여는 청색, 자색, 홍색실과, 가늘게 꼰 베실로 수 놓아 짠 이십 규빗의 장이 있게 할지니 그 기둥이 넷이요, 받침이 넷이며
१६अंगणाच्या फाटकासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वीस हात लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीदार विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात.
17 뜰 사면 모든 기둥의 가름대와 갈고리는 은이요, 그 받침은 놋이며
१७अंगणाच्या सभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
18 뜰의 장은 백 규빗이요, 광은 오십 규빗이요, 세마포장의 고는 오규빗이요, 그 받침은 놋이며
१८अंगणाची लांबी शंभर हात असावी व पन्नास हात रुंद असावी; अंगणासभोवतीची पडद्याची कनात पाच हात उंच असावी व ती कातलेल्या तलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
19 성막에서 쓰는 모든 기구와 그 말뚝과 뜰의 포장 말뚝을 다 놋으로 할지니라!
१९पवित्र निवासमंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणासभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात.
20 너는 또 이스라엘 자손에게 명하여 감람으로 찧어낸 순결한 기름을 등불을 위하여 네게로 가져오게 하고 끊이지 말고 등불을 켜되
२०इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतुनाचे हाताने कुटलेले निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे;
21 아론과 그 아들들로 회막한 증거궤 앞 휘장 밖에서 저녁부터 아침까지 항상 여호와 앞에 그 등불을 간검하게 하라! 이는 이스라엘 자손의 대대로 영원한 규례니라
२१अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शनमंडपामध्ये अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची व्यवस्था करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यानपिढ्या कायमचा विधी आहे.