< 전도서 12 >
1 너는 청년의 때 곧 곤고한 날이 이르기 전, 나는 아무 낙이 없다고 할 해가 가깝기 전에 너의 창조자를 기억하라
१तू आपल्या तारुण्याच्या दिवसातसुद्धा आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. अनर्थाचे दिवस येण्यापूर्वी, आणि तेव्हा अशी वर्षे येण्यापूर्वी तू म्हणशील, त्यामध्ये मला काही सुख नाही.
2 해와 빛과 달과 별들이 어둡기 전에 비 뒤에 구름이 다시 일어나기 전에 그리하라
२सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या प्रकाशापूर्वी अंधकार वाढेल आणि पावसानंतर काळोखे ढग परत येतील.
3 그런 날에는 집을지키는 자들이 떨 것이며 힘있는 자들이 구부러질 것이며 맷돌질 하는 자들이 적으므로 그칠 것이며 창들로 내어다 보는 자가 어두워질 것이며
३त्यावेळी महालाचे पहारेकरी थरथरतील आणि बळकट मनुष्य वाकतील, आणि दळणाऱ्या स्त्रिया थांबतील कारण त्या थोड्या आहेत, आणि ज्या खिडक्यातून पाहणाऱ्या आहेत त्यांना स्पष्ट दिसणार नाही.
4 길거리 문들이 닫혀질 것이며 맷돌 소리가 적어질 것이며 새의 소리를 인하여 일어날 것이며 음악하는 여자들은 다 쇠하여질 것이며
४त्यासमयी जेव्हा रस्त्यातील दरवाजे बंद होतील आणि जात्याचा आवाज थांबेल, तेव्हा पक्ष्याच्या शब्दाने मनुष्य बिथरेल, आणि मुलींच्या गायनाचास्वर लुप्त होईल.
5 그런 자들은 높은 곳을 두려워할 것이며 길에서는 놀랄 것이며 살구나무가 꽃이 필 것이며 메뚜기도 짐이 될 것이며 원욕이 그치리니 이는 사람이 자기 영원한 집으로 돌아가고 조문자들이 거리로 왕래하게 됨이라
५तेव्हा मनुष्यास उंचावरच्या ठिकाणांची आणि रस्त्यावरील पुढील धोक्यांची भीती वाटेल, आणि तेव्हा बदामाचे झाड फुलेल, आणि तेव्हा टोळ स्वतःपुढे भारी असा वाटेल, आणि तेव्हा स्वाभाविक इच्छा दुर्बल होईल. नंतर मनुष्य आपल्या सनातन घरास जातो, आणि शोक करणारे रस्त्यात फिरतात.
6 은줄이 풀리고 금 그릇이 깨어지고 항아리가 샘 곁에서 깨어지고 바퀴가 우물 위에서 깨어지고
६तू आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, रुप्याची तार तुटण्यापूर्वी किंवा सोन्याचा कटोरा चेपण्यापूर्वी, अथवा झऱ्याजवळ घागर फुटण्यापूर्वी, अथवा पाण्याचा रहाट विहिरीकडे मोडला जाईल,
7 흙은 여전히 땅으로 돌아가고 신은 그 주신 하나님께로 돌아가기 전에 기억하라
७ज्या ठिकाणापासून ती आली, माती परत मातीला मिळेल, आणि देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल.
8 전도자가 가로되 헛되고 헛되도다 모든 것이 헛되도다
८उपदेशक म्हणतो, धुक्याची वाफ, प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी वाफ आहे.
9 전도자가 지혜로움으로 여전히 백성에게 지식을 가르쳤고 또 묵상하고 궁구하여 잠언을 많이 지었으며
९उपदेशक ज्ञानी होता आणि म्हणून तो लोकांस ज्ञान शिकवीत गेला. त्याने अभ्यास व निरक्षण करून व पुष्कळ म्हणीचा संच केला.
10 전도자가 힘써 아름다운 말을 구하였나니 기록한 것은 정직하여 진리의 말씀이니라
१०उपदेशकाने स्पष्ट व सत्याची सरळमार्गी वचने शोधून लिहिण्याचा प्रयत्न केला.
11 지혜자의 말씀은 찌르는 채찍같고 회중의 스승의 말씀은 잘 박힌못 같으니 다 한 목자의 주신 바니라
११ज्ञानाची वचने आरींसारखी आहेत. शिक्षकाची त्याच्या म्हणीच्या संग्रहातील वचने खोल ठोकलेल्या खिळ्यांसारखी आहेत. ती एकाच मेंढपाळाकडून शिकविण्यात आली आहेत.
12 내 아들아 또 경계를 받으라 여러 책을 짓는 것은 끝이 없고 많이 공부하는 것은 몸을 피곤케 하느니라
१२माझ्या मुला, त्याखेरीज अधिक सावध रहा. पुष्कळ पुस्तके रचण्याला, काही अंत नाही. खूप अभ्यास देहाला थकवा आणेल.
13 일의 결국을 다 들었으니 하나님을 경외하고 그 명령을 지킬지어다 이것이 사람의 본분이니라
१३याविषयाचा शेवट हाच आहे, सर्व काही ऐकल्यानंतर, तू देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. कारण सर्व मानवजातीचे सारे कर्तव्य हेच आहे.
14 하나님은 모든 행위와 모든 은밀한 일을 선악간에 심판하시리라
१४देव सगळ्या कृत्यांचा न्याय करील, त्याबरोबर प्रत्येक गुप्त गोष्टीचा, मग ती वाईट असो किंवा चांगली.