< 열왕기하 8 >
1 엘리사가 이전에 아들을 다시 살려준 여인에게 이르되 너는 일어나서 네 권속과 함께 거할만한 곳으로 가서 거하라 여호와께서 기근을 명하셨으니 그대로 이 땅에 칠년 동안 임하리라
१अलीशामुळे जो मुलगा जिवंत झाला होता त्या मुलाच्या आईशी अलीशा बोलला. अलीशा म्हणाला, “तू आपल्या कुटुंबियासह दुसऱ्या देशात जा. कारण परमेश्वर या प्रदेशात दुष्काळ पाडणार आहे. आणि तो सात वर्षे चालेल.”
2 여인이 일어나서 하나님의 사람의 말대로 행하여 그 권속과 함께 가서 블레셋 사람의 땅에 칠년을 우거하다가
२तेव्हा देवाच्या मनुष्याच्या म्हणण्याप्रमाणे तिने केले. पलिष्ट्यांच्या देशात ती आपल्या कुटुंबियांसमावेत जाऊन सात वर्षे राहिली.
3 칠년이 다하매 여인이 블레셋 사람의 땅에서 돌아와서 자기 집과 전토를 위하여 호소하려 하여 왕에게 나아갔더라
३सात वर्षे उलटल्यावर ती पलिष्ट्यांच्या देशातून परत आली. मग ती राजाला भेटायला निघाली. आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती.
4 때에 왕이 하나님의 사람의 사환 게하시와 서로 말씀하며 가로되 너는 엘리사의 행한 모든 큰 일을 내게 고하라 하니
४अलीशा संदेष्ट्याचा सेवक गेहजी याच्याशी राजा बोलत बसला होता. राजा गेहजीला म्हणाला, “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली ती कृपाकरून मला सांग.”
5 게하시가 곧 엘리사가 죽은 자를 다시 살린 일을 왕에게 이야기 할때에 그 다시 살린 아이의 어미가 자기 집과 전토를 위하여 왕에게 호소하는지라 게하시가 가로되 내 주 왕이여 이는 그 여인 이요 저는 그 아들이니 곧 엘리사가 다시 살린 자니이다
५अलीशाने एका मृताला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच जिच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते ती स्त्री राजासमोर आली. आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती. गेहजी म्हणाला, “स्वामी, हीच ती स्त्री आणि अलीशाने जीवदान दिले तो हाच मुलगा.”
6 왕이 그 여인에게 물으매 여인이 고한지라 왕이 저를 위하여 한 관리를 임명하여 가로되 무릇 이 여인에게 속한 것과 이 땅에서 떠날 때부터 이제까지 그 밭의 소출을 다 돌려주라 하였더라
६राजाने त्या स्त्रीची विचारपूस केली आणि ती राजाशी बोलली. राजाने मग एका कारभाऱ्याला तिच्या मदतीला दिले आणि सांगितले, “तिच्या मालकीचे आहे ते सर्व तिला परत द्या. तसेच, ती हा देश सोडून गेली तेव्हापासून आतापर्यंतचे तिच्या शेतातले उत्पन्न तिला द्या.”
7 엘리사가 다메섹에 갔을 때에 아람 왕 벤하닷이 병들었더니 혹이 왕에게 고하여 가로되 하나님의 사람이 여기 이르렀나이다
७अलीशा दिमिष्क येथे गेला. अरामाचा राजा बेन-हदाद तेव्हा आजारी होता. एकाने त्यास सांगितले, “आपल्या इथे एक देवाचा मनुष्य आला आहे.”
8 왕이 하사엘에게 이르되 너는 손에 예물을 가지고 가서 하나님의 사람을 맞고 저로 말미암아 여호와께 나의 이 병이 낫겠나 물으라
८तेव्हा राजा बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “नजराणा घेऊन त्या संदेष्ट्याच्या भेटीला जा. मी या दुखण्यातून बरा होईन की नाही ते परमेश्वरास विचारायला त्यास सांग.”
9 하사엘이 드디어 맞으러 갈새 다메섹 모든 아름다운 물품으로 예물을 삼아가지고 약대 사십에 싣고 나아가서 저의 앞에 서서 가로되 당신의 아들 아람 왕 벤하닷이 나를 당신에게 보내어 가로 되 나의 이 병이 낫겠나이까 하더이다
९तेव्हा हजाएल अलीशाच्या भेटीला गेला. दिमिष्कातील उत्तमोत्तम पदार्थाचा नजराणा तो अलीशासाठी घेऊन गेला. या गोष्टी त्याने चाळीस उंटांवर लादल्या होत्या. हजाएल अलीशाकडे जाऊन म्हणाला, “तुमचा शिष्य अरामाचा राजा बेन-हदाद याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. या दुखण्यातून आराम पडेल का असे त्यांनी विचारले आहे.”
10 엘리사가 가로되 너는 가서 저에게 고하기를 왕이 정녕 나으리라 하라 그러나 여호와께서 저가 정녕 죽으리라고 내게 알게 하셨느니라 하고
१०तेव्हा अलीशा हजाएलला म्हणाला, “बेन-हदादला जाऊन सांग, ‘तू खात्रीने बरा होशील.’ पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
11 하나님의 사람이 저가 부끄러워하기까지 쏘아보다가 우니
११एवढे बोलून मग देवाच्या मनुष्याने, हजाएलास लाज वाटेपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर अलीशा रडू लागला.
12 하사엘이 가로되 내 주여 어찌하여 우시나이까 대답하되 네가 이스라엘 자손에게 행할 모든 악을 내가 앎이라 네가 저희 성에 불을 놓으며 장정을 칼로 죽이며 어린 아이를 메어차며 아이 밴 부녀를 가르리라
१२हजाएलने त्यास विचारले, “माझ्या स्वामी, तुम्ही का रडत आहात?” अलीशाने सांगितले, “इस्राएलवर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहित आहे म्हणून मला वाईट वाटते. त्यांची मजबूत नगरे तू जाळशील. आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील. त्यांच्या लहान मुलांना ठार करशील त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील.”
13 하사엘이 가로되 당신의 개 같은 종이 무엇이관대 이런 큰 일을 행하오리이까 엘리사가 대답하되 여호와께서 네가 아람 왕이 될 것을 내게 알게 하셨느니라
१३हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र मनुष्य एक दुबळामनुष्य या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार असे परमेश्वराने मला सांगितले आहे.”
14 저가 엘리사를 떠나가서 그 주인에게 나아가니 왕이 묻되 엘리사가 네게 무슨 말을 하더냐 대답하되 저가 내게 이르기를 왕이 정녕 나으시리라 하더이다
१४मग हजाएल तिथून निघाला आणि आपल्या धन्याकडे आला. बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “अलीशा तुला काय म्हणाला?” हजाएल म्हणाला, “तुम्ही जगणार आहात असे अलीशाने मला सांगितले.”
15 그 이튿날에 하사엘이 이불을 물에 적시어 왕의 얼굴에 덮으매 왕이 죽은지라 저가 대신하여 왕이 되니라
१५पण दुसऱ्या दिवशी हजाएलने एक रजई घेतली आणि पाण्यात ती भिजवली मग ती बेनहदादच्या तोंडावर टाकली. त्याने बेन-हदाद गुदमरला आणि मरण पावला. अशा प्रकारे हजाएल नवा राजा झाला.
16 이스라엘 왕 아합의 아들 요람 제 오년에 유다 왕 여호사밧이 오히려 위에 있을 때에 그 아들 여호람이 왕이 되니라
१६यहोशाफाटाचा मुलगा यहोराम यहूदाचा राजा होता. इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना यहोराम इस्राएलच्या राज्यावर आला.
17 여호람이 위에 나아갈 때에 나이 삼십 이세라 예루살렘에서 팔년을 치리하니라
१७त्यावेळी यहोराम बत्तीस वर्षाचा होता. यरूशलेमेवर त्याने आठ वर्षे राज्य केले.
18 저가 이스라엘 왕들의 길로 행하여 아합의 집과 같이 하였으니 이는 아합의 딸이 그 아내가 되었음이라 저가 여호와 보시기에 악을 행하였으나
१८पण इस्राएलच्या इतर राजाप्रमाणेच यहोराम वागला. परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये त्याने केली. अहाबाच्या घरचे लोक वागत तसाच तो वागला. त्याची पत्नी अहाबाची मुलगी होती.
19 여호와께서 그 종 다윗을 위하여 유다 멸하기를 즐겨하지 아니하셨으니 이는 저와 그 자손에게 항상 등불을 주겠다고 허하셨음이더라
१९पण परमेश्वराने आपला सेवक दावीद याला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वराने यहूद्यांचा नाश केला नाही. दाविदाच्या वंशातीलच कोणीतरी सतत गादीवर येईल असे वचन परमेश्वराने दाविदाला दिले होते.
20 여호람 때에 에돔이 배반하여 유다의 수하에서 벗어나 자기 위에 왕을 세운고로
२०यहोरामाच्या कारकिर्दीत अदोम फितूरी करून यहूदापासून वेगळा झाला. अदोमी लोकांनी स्वत: च राजाची निवड केली.
21 여호람이 모든 병거를 거느리고 사일로 갔더니 밤에 일어나 자기를 에워싼 에돔 사람과 그 병거의 장관들을 치니 이에 백성이 도망하여 각각 그 장막으로 돌아갔더라
२१तेव्हा यहोराम आपले सर्व रथ व अधिकाऱ्यास घेऊन साईर येथे गेला. अदोमी सैन्याने त्यास वेढा घातला. यहोराम आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि आपली सुटका केली. यहोरामाचे लोक पळाले आणि घरी परतले.
22 이와 같이 에돔이 배반하여 유다의 수하에서 벗어났더니 오늘날 까지 그러하였으며 그 때에 립나도 배반하였더라
२२अशाप्रकारे अदोमी यहूदाच्या सत्तेपासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत. सुमारास लिब्नानेही बंड केले आणि यहूदापासून ते मुक्त झाले.
23 여호람의 남은 사적과 그 행한 모든 일은 유다 왕 역대지략에 기록되지 아니하였느냐
२३“यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात यहोरामाने जे जे केले त्याची नोंद आहे.
24 여호람이 그 열조와 함께 자매 그 열조들과 함께 다윗 성에 장사되고 그 아들 아하시야가 대신하여 왕이 되니라
२४यहोराम मरण पावला आणि दावीद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामाचा मुलगा अहज्या मग राज्य करु लागला.
25 이스라엘 왕 아합의 아들 요람 제 십 이년에 유다 왕 여호람의 아들 아하시야가 왕이 되니
२५इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा मुलगा अहज्या यहूदाचा राजा झाला.
26 아하시야가 위에 나아갈 때에 나이 이십 이세라 예루살렘에서 일년을 치리하니라 그 모친의 이름은 아달랴라 이스라엘 왕 오므리의 손녀더라
२६त्यावेळी अहज्या बावीस वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. इस्राएलचा राजा अम्री याची ती मुलगी.
27 아하시야가 아합의 집 길로 행하여 아합의 집과 같이 여호와 보시기에 악을 행하였으니 저는 아합의 집의 사위가 되었음이러라
२७परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबाचा जावई होता. त्यामुळे अहाबाच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती.
28 저가 아합의 아들 요람과 함께 길르앗 라못으로 가서 아람 왕 하사엘로 더불어 싸우더니 아람 사람들이 요람을 상하게 한지라
२८अहाबाचा मुलगा योराम यासह अहज्या रामोथ-गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल याच्यावर चढाई करून गेला. अराम्यांनी योथामाला जखमी केले.
29 요람 왕이 아람 왕 하사엘과 싸울 때에 라마에서 아람 사람에게 맞아 상한 것을 치료하려 하여 이스르엘로 돌아왔더라 아합의 아들 요람이 병이 있으므로 유다 왕 여호람의 아들 아하시야가 이스르엘에 내려가서 방문하였더라
२९आणि रामा येथे योरामाचा राजा हा अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढत होता, तेव्हा झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी तो परत इज्रेलास गेला. आणि त्यास भेटायला यहूदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहज्या खाली इज्रेलला अहाबाचा मुलगा योराम ह्याला पाहायला गेला होता.