< 사무엘상 13 >
1 사울이 왕이 될 때에 사십세라 그가 이스라엘을 다스린지 이년에
१शौल राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने (दोन) वर्षे इस्राएलावर राज्य केल्यानंतर,
2 이스라엘 사람 삼천을 택하여 그 중에서 이천은 자기와 함께 믹마스와 벧엘산에 있게 하고 일천은 요나단과 함께 베냐민 기브아에 있게 하고 남은 백성은 각기 장막으로 보내니라
२त्याने इस्राएलातून तीन हजार पुरुष निवडून घेतले; त्यातले दोन हजार त्याच्याबरोबर मिखमाशांत व बेथेलाच्या डोंगरात होते आणि योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात एक हजार होते. बाकीच्या लोकांस त्याने त्यांच्या घराकडे पाठवले, प्रत्येकजण त्याच्या तंबूकडे गेला.
3 요나단이 게바에 있는 블레셋 사람의 수비대를 치매 블레셋 사람이 이를 들은지라 사울이 온 땅에 나팔을 불어 이르되 `히브리 사람들은 들으라' 하니
३गिब्यात पलिष्ट्यांच्या सैन्यांना योनाथानाने पराजित केले आणि पलिष्ट्यांनी त्याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने सर्व मुलखात शिंग वाजवून म्हटले, “इब्र्यांना ऐकू द्या.”
4 온 이스라엘이 사울의 블레셋 사람의 수비대를 친 것과 이스라엘이 블레셋 사람의 가증히 여김이 되었다 함을 듣고 길갈로 모여 사울을 좇으니라
४शौलाने पलिष्ट्यांच्या सैन्याला पराजित केले आणि पलिष्ट्यांना इस्राएलाचा तिरस्कार वाटू लागला, असे सर्व इस्राएलांनी ऐकले. त्यानंतर लोक शौलाजवळ गिलगालात एकत्र जमले.
5 블레셋 사람이 이스라엘과 싸우려 하여 모였는데 병거가 삼만이요 마병이 육천이요 백성은 해변의 모래 같이 많더라 그들이 올라와서 벧아웬 동편 믹마스에 진 치매
५मग तीस हजार रथ व सहा हजार रथ चालवणारे, आणि समुद्राच्या वाळूसारखे असंख्य लोक घेऊन पलिष्टी इस्राएलाशी लढाई करायला जमले आणि त्यांनी मिखमाशात येऊन बेथ-आवेनाच्या पूर्वेस तळ दिला.
6 이스라엘 사람들이 위급함을 보고 절박하여 굴과 수풀과 바위틈과 은밀한 곳과 웅덩이에 숨으며
६आपण अडचणीत आलो आहो हे इस्राएलांनी पाहिले. कारण लोक निराश झाले होते, तेव्हा लोक गुहा, झुडपात, खडकात, विहीरीत, व खड्यात लपले.
7 어떤 히브리 사람들은 요단을 건너 갓과 길르앗 땅으로 가되 사울은 아직 길갈에 있고 그를 좇은 모든 백성은 떨더라
७कित्येक इब्री यार्देनेच्या पलीकडे गाद व गिलाद या प्रांतात गेले. पण शौल गिलगालात तसाच राहिला आणि सर्व लोक त्याच्यामागे थरथर कापत गेले.
8 사울이 사무엘의 정한 기한대로 이레를 기다리되 사무엘이 길갈로 오지 아니하매 백성이 사울에게서 흩어지는지라
८शमुवेलाने नेमलेल्या वेळेप्रमाणे तो सात दिवस थांबला परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि लोक शौलापासून विखरून जाऊ लागले.
9 사울이 가로되 `번제와 화목제물을 이리로 가져오라' 하여 번제를 드렸더니
९तेव्हा शौलाने म्हटले, “होमार्पणे व शांत्यर्पणे इकडे माझ्यापाशी आणा.” मग त्याने होमार्पण अर्पिले.
10 번제 드리기를 필하자 사무엘이 온지라 사울이 나가 맞으며 문안하매
१०त्याने होमार्पण अर्पिण्याची समाप्ती केली तितक्यात पाहा शमुवेलाचे आगमन झाले. शौल त्यास भेटण्यास आणि अभिवादन करण्यास बाहेर गेला.
11 사무엘이 가로되 왕의 행한 것이 무엇이뇨? 사울이 가로되 백성은 나에게서 흩어지고 당신은 정한 날 안에 오지 아니하고 블레셋 사람은 믹마스에 모였음을 내가 보았으므로
११तेव्हा शमुवेल म्हणाला, “तू हे काय केले आहे?” शौलाने म्हटले, “कारण मी पाहिले की, लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले, आणि नेमलेल्या दिवसाच्या आत तुम्ही आला नाही, आणि पलिष्टी मिखमाश येथे जमले आहेत,
12 이에 내가 이르기를 블레셋 사람은 나를 치러 길갈로 내려오겠거늘 내가 여호와께 은혜를 간구치 못하였다 하고 부득이하여 번제를 드렸나이다
१२म्हणून मी म्हणालो, पलिष्टी खाली गिलगालास माझ्याविरूद्ध येत आहेत आणि मी परमेश्वराची मर्जी अद्याप मिळवली नाही. म्हणून मी स्वत: च्या मजबुरीने भाग पडून होमार्पण अर्पिले.”
13 사무엘이 사울에게 이르되 `왕이 망령되이 행하였도다! 왕이 왕의 하나님 여호와께서 왕에게 명하신 명령을 지키지 아니하였도다 그리하였더면 여호와께서 이스라엘 위에 왕의 나라를 영영히 세우셨을 것이어늘
१३नंतर शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणाचे कृत्य केले. परमेश्वर तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञापिली ती तू मानली नाही. मानली असती तर आता परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते.
14 지금은 왕의 나라가 길지 못할 것이라 여호와께서 왕에게 명하신 바를 왕이 지키지 아니하였으므로 여호와께서 그 마음에 맞는 사람을 구하여 그 백성의 지도자를 삼으셨느니라' 하고
१४परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. परमेश्वराने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे, आणि त्यास आपल्या लोकांचा राजा होण्यास नेमले आहे, कारण परमेश्वराने जे तुला आज्ञापिले ते तू पाळले नाही.”
15 사무엘이 일어나 길갈에서 떠나 베냐민 기브아로 올라가니라 사울이 자기와 함께 한 백성을 계수하니 육백명 가량이라
१५मग शमुवेल उठून गिलगालाहून बन्यामिनातील गिबा येथे गेला. त्यानंतर शौलाने आपणाजवळ जे लोक होते त्यांची गणना केली, ते सुमारे सहाशे होते.
16 사울과 그 아들 요나단과 그들과 함께한 백성은 베냐민 게바에 있고 블레셋 사람은 믹마스에 진쳤더니
१६शौल, त्याचा मुलगा योनाथान व त्याच्याबरोबरचे लोक बन्यामिनांतील गिब्यात राहिले. पण पलिष्ट्यांनी मिखमाशात छावणी केली.
17 노략군들이 삼대로 블레셋 사람의 진에서 나와서 한 대는 오브라길로 말미암아 수알 땅에 이르렀고
१७पलिष्ट्यांच्या छावणीतून छापा मारणारे तीन टोळ्या करून निघाले. एक टोळी आफ्राच्या वाटेने शुवालाच्या प्रांताकडे गेली
18 한 대는 벧호론 길로 향하였고 한 대는 광야를 향한 스보임 골짜기가 내려다 보이는 지경 길로 향하였더라
१८आणि दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि आणखी एक टोळी जो प्रांत सबोईम खोऱ्याकडला आहे त्याच्या वाटेने रानाकडे वळली.
19 때에 이스라엘 온 땅에 철공이 없어졌으니 이는 블레셋 사람이 말하기를 `히브리 사람이 칼이나 창을 만들까 두렵다' 하였음이라
१९तेव्हा इस्राएलाच्या सर्व देशात कोणी लोहार मिळेना, कारण पलिष्ट्यांनी म्हटले होते, कदाचित इब्री आपणासाठी तलवारी किंवा भाले करून घेतील.
20 온 이스라엘 사람이 각기 보습이나 삽이나 도끼나 괭이를 벼리려면 블레셋 사람에게로 내려갔었는데
२०परंतु सर्व इस्राएली लोक, आपला नांगराचा फाळ, आपली कुदळ, आपली कुऱ्हाड, आणि विळ्यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात.
21 곧 그들이 괭이나 삽이나 쇠스랑이나 도끼나 쇠채찍이 무딜 때에 그리하였으므로
२१नांगराचा फाळ आणि कुदळ यांना धार लावण्याचे शुल्क दोन तृतीयांश शेकेल आणि एकतृतीयांश कुऱ्हाडीला धार देण्यासाठी आणि पराणी सरळ करण्यासाठी.
22 싸우는 날에 사울과 요나단과 함께한 백성의 손에는 칼이나 창이 없고 오직 사울과 그 아들 요나단에게만 있으니라
२२आणि लढाईच्या दिवशी असे झाले की, जे लोक शौल व योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यातल्या कोणाच्याही हाती तलवार व भाला नव्हता. फक्त शौल व त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ ते होते.
23 블레셋 사람의 부대가 나와서 믹마스 어귀에 이르렀더라
२३पलिष्ट्यांचे सैन्य निघून मिखमाशाच्या उताराकडे गेले.