< 고린도전서 7 >
1 너희의 쓴 말에 대하여는 남자가 여자를 가까이 아니함이 좋으나
१आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; स्त्रीला स्पर्श न करणे हे पुरुषासाठी बरे आहे.
2 음행의 연고로 남자마다 자기 아내를 두고 여자마다 자기 남편을 두라
२तरीही व्यभिचार होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा.
3 남편은 그 아내에게 대한 의무를 다하고 아내도 그 남편에게 그렇게 할지라
३पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा; आणि त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा.
4 아내가 자기 몸을 주장하지 못하고 오직 그 남편이 하며 남편도 이와 같이 자기 몸을 주장하지 못하고 오직 그 아내가 하나니
४पत्नीला तिच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पतीला असतो; आणि त्याचप्रमाणे पतीलाही त्याच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पत्नीला असतो.
5 서로 분방하지 말라 다만 기도할 틈을 얻기 위하여 합의상 얼마 동안은 하되 다시 합하라 이는 너희의 절제 못함을 인하여 사단으로 너희를 시험하지 못하게 하려 함이라
५विषयसुखासाठी एकमेकाला वंचित करू नका, तुम्हास प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास मोहात पाडू नये.
6 그러나 내가 이 말을 함은 권도요 명령은 아니라
६पण मी हे संमती म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नाही.
7 나는 모든 사람이 나와 같기를 원하노라 그러나 각각 하나님께 받은 자기의 은사가 있으니 하나는 이러하고 하나는 저러하니라
७माझी इच्छा अशी आहे की, सर्व लोक माझ्यासारखे असावेत पण प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतःचे असे देवापासून दान आहे. एकाला एका प्रकारे राहण्याचे आणि दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारे राहण्याचे.
8 내가 혼인하지 아니한 자들과 및 과부들에게 이르노니 나와 같이 그냥 지내는 것이 좋으니라
८म्हणून मी सर्व अविवाहितांना आणि विधवांना असे म्हणतो की, तुम्ही माझ्याप्रमाणे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे आहे.
9 만일 절제할 수 없거든 혼인하라 정욕이 불같이 타는 것보다 혼인하는 것이 나으니라
९तथापि जर त्यास संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे; कारण वासनेनी जळण्यापेक्षा लग्न करणे बरे.
10 혼인한 자들에게 내가 명하노니 (명하는 자는 내가 아니요 주시라) 여자는 남편에게서 갈리지 말고
१०आणि विवाहितांना मी आज्ञा देत आहे, मी नाही पण प्रभू देत आहे की पत्नीने पतीला सोडू नये.
11 (만일 갈릴지라도 그냥 지내든지 다시 그 남편과 화합하든지 하라) 남편도 아내를 버리지 말라
११पण, जर तिने सोडले तर लग्न न करता तसेच रहावे किंवा आपल्या पतीबरोबर समेट करावा आणि पतीने पत्नीला सोडू नये.
12 그 남은 사람들에게 내가 말하노니(이는 주의 명령이 아니라)만일 어떤 형제에게 믿지 아니하는 아내가 있어 남편과 함께 살기를 좋아하거든 저를 버리지 말며
१२पण इतरांना हे प्रभू सांगत नाही, पण मी सांगतो की, जर एखाद्या बंधूची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि त्याच्याबरोबर राहण्यास तिची संमती असेल तर त्याने तिला सोडू नये.
13 어떤 여자에게 믿지 아니하는 남편이 있어 아내와 함께 살기를 좋아하거든 그 남편을 버리지 말라
१३आणि एखाद्या स्त्रीचा पती विश्वास ठेवणारा झाला नसेल आणि तिच्याबरोबर राहण्यास त्याची संमती असेल तर तिने त्यास सोडू नये.
14 믿지 아니하는 남편이 아내로 인하여 거룩하게 되고 믿지 아니하는 아내가 남편으로 인하여 거룩하게 되나니 그렇지 아니하면 너희 자녀도 깨끗지 못하니라 그러나 이제 거룩하니라
१४कारण, विश्वास न ठेवणारा पती पत्नीमुळे पवित्र होतो आणि विश्वास न ठेवणारी पत्नी पतीमुळे पवित्र होते. नाही तर तुमची मुले अशुद्ध असती पण ती आता पवित्र आहेत.
15 혹믿지 아니하는 자가 갈리거든 갈리게 하라 형제나 자매나 이런 일에 구속 받을 것이 없느니라 그러나 하나님은 화평 중에서 너희를 부르셨느니라
१५पण स्वतः विश्वास ठेवत नसल्यामुळे कोणी सोडून जात असेल तर जाऊ द्या; कारण कोणी बंधू किंवा बहीण अशा बाबतीत बंधनात नाही. पण देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता बोलावले आहे.
16 아내된 자여 네가 남편을 구원할는지 어찌 알 수 있으며 남편된 자여 네가 네 아내를 구원할는지 어찌 알 수 있으리요
१६कारण पत्नी, तू हे कशावरून जाणतेस की, तू आपल्या पतीला तारशील की नाही? किंवा तू, पती, हे कशावरून जाणतोस की, तू आपल्या पत्नीला तारशील की नाही?
17 오직 주께서 각 사람에게 나눠주신 대로 하나님이 각 사람을 부르신 그대로 행하라 내가 모든 교회에서 이와 같이 명하노라
१७तर जसे प्रभूने प्रत्येकाला वाटून दिले आहे, जसे देवाने प्रत्येकाला बोलावले आहे, तसे त्याने चालावे आणि ह्याप्रमाणे, मी सर्व मंडळ्यांना आज्ञा देत आहे.
18 할례자로 부르심을 받은 자가 있느냐 무할례자가 되지 말며 무할례자로 부르심을 받은 자가 있느냐 할례를 받지 말라
१८सुंता झालेली असता कोणाला विश्वासासाठी पाचारण झाले काय? तर त्याने सुंतेचे चिन्ह काढून टाकू नये. बेसुंता असलेल्या कोणाला विश्वासासाठी पाचारण आहे? त्याने सुंता करून घेऊ नये.
19 할례 받는 것도 아무 것도 아니요 할례 받지 아니하는 것도 아무것도 아니로되 오직 하나님의 계명을 지킬 따름이니라
१९कारण सुंता झालेला असणे काही नाही किंवा बेसुंता असणे काही नाही; पण देवाच्या आज्ञांचे पालन करणे हे सर्वकाही आहे.
20 각 사람이 부르심을 받은 그 부르심 그대로 지내라
२०ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्याच स्थितीत रहावे.
21 네가 종으로 있을 때에 부르심을 받았느냐 염려하지 말라 그러나 자유할 수 있거든 차라리 사용하라
२१तू दास असता बोलावला गेलास काय? त्याची पर्वा करू नकोस; पण तुला स्वतंत्र होता आले तर त्याचा उपयोग कर.
22 주 안에서 부르심을 받은 자는 종이라도 주께 속한 자유자요 또 이와 같이 자유자로 있을 때에 부르심을 받은 자는 그리스도의 종이니라
२२कारण दास असता जो प्रभूत बोलावला गेला तो प्रभूचा स्वतंत्र मनुष्य आहे; त्याचप्रमाणे जो स्वतंत्र असता बोलावला गेला तो ख्रिस्ताचा दास आहे.
23 너희는 값으로 사신 것이니 사람들의 종이 되지 말라
२३देवाने तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुम्ही मनुष्यांचे दास होऊ नका.
24 형제들아 각각 부르심을 받은 그대로 하나님과 함께 거하라
२४बंधूंनो जो ज्या स्थितीत बोलावला गेला आहे त्याने त्या स्थितीत देवाबरोबर रहावे.
25 처녀에 대하여는 내가 주께 받은 계명이 없으되 주의 자비하심을 받아서 충성된 자가 되어 의견을 고하노니
२५आता कुमारिकांविषयी मला प्रभूकडून काही आज्ञा नाही; पण, विश्वासू राहता येण्यास ज्याच्यावर प्रभूने दया केली आहे असा मी एक असल्यामुळे मी माझे मत देतो.
26 내 생각에는 이것이 좋으니 곧 임박한 환난을 인하여 사람이 그냥 지내는 것이 좋으니라
२६म्हणून मला वाटते की, आताच्या परिस्थीतीत हे चांगले आहे; म्हणजे जो ज्या स्थितीत असेल तसेच त्याने रहावे हे त्याच्यासाठी चांगले आहे.
27 네가 아내에게 매였느냐 놓이기를 구하지 말며 아내에게서 놓였느냐 아내를 구하지 말라
२७तू पत्नीला विवाहाच्या वचनाने बांधलेला आहेस काय? तर तू स्वतः मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून सोडविला गेलास का? तर तू पत्नी मिळवण्यास पाहू नकोस.
28 그러나 장가 가도 죄 짓는 것이 아니요 처녀가 시집 가도 죄 짓는 것이 아니로되 이런 이들은 육신에 고난이 있으리니 나는 너희를 아끼노라
२८पण तू जर लग्न केलेस तर तू पाप केले नाहीस; आणि कुमारिकेने लग्न केले तर तिने पाप केले नाही; पण अशांना संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील आणि अशा हालअपेष्टा तुम्हास भोगाव्या लागू नयेत अशी माझी इच्छा आहे.
29 형제들아 내가 이 말을 하노니 때가 단축하여진고로 이 후부터 아내 있는 자들은 없는 자같이 하며
२९पण बंधूंनो मी हे सांगतो की, हा काळ थोडका आहे. आता, ज्यांना स्त्रिया आहेत त्यांना स्त्रिया नसल्यासारखे त्यांनी जगावे;
30 우는 자들은 울지 않는 자같이 하며 기쁜 자들은 기쁘지 않은 자같이 하며 매매하는 자들은 없는 자같이 하며
३०जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे आणि जे विकत घेतात त्यांनी ते आपले स्वतःचे नसल्यासारखे रहावे.
31 세상 물건을 쓰는 자들은 다 쓰지 못하는 자같이 하라 이 세상의 형적은 지나감이니라
३१जे या जगाचा उपयोग करतात त्यांनी दुरुपयोग न करणारे व्हावे; कारण या जगाचे स्वरूप लयास जात आहे.
32 너희가 염려 없기를 원하노라 장가 가지 않은 자는 주의 일을 염려하여 어찌하여야 주를 기쁘시게 할꼬 하되
३२पण तुम्ही निश्चित असावे अशी माझी इच्छा आहे. जो अविवाहित आहे तो प्रभूच्या गोष्टींची, म्हणजे आपण प्रभूला कसे संतुष्ट करावे याची काळजी करतो;
33 장가 간 자는 세상 일을 염려하여 어찌하여야 아내를 기쁘게 할꼬 하여 마음이 나누이며
३३पण जो विवाहित आहे तो जगातल्या गोष्टींची, म्हणजे पत्नीला कसे संतुष्ट करावे याची काळजी करतो.
34 시집 가지 않은 자와 처녀는 주의 일을 염려하여 몸과 영을 다 거룩하게 하려 하되 시집 간 자는 세상 일을 염려하여 어찌하여야 남편을 기쁘게 할꼬 하느니라
३४जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करते; पण जी विवाहित आहे ती जगातल्या गोष्टींची, म्हणजे आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे याची काळजी करते.
35 내가 이것을 말함은 너희의 유익을 위함이요 너희에게 올무를 놓으려 함이 아니니 오직 너희로 하여금 이치에 합하게 하여 분요함이 없이 주를 섬기게 하려 함이라
३५हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो, तुमच्यावर बंधन टाकावे म्हणून नाही; पण तुम्ही विचलित न होता प्रभूची सेवा करावी म्हणून सांगतो.
36 누가 자기의 처녀 딸에 대한 일이 이치에 합당치 못한 줄로 생각할 때에 혼기도 지나고 그같이 할 필요가 있거든 마음대로 하라 이것은 죄 짓는 것이 아니니 혼인하게 하라
३६जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेच्या अपमानास कारण होत आहोत, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे, तो पाप करीत नाही, त्याने लग्न करून घ्यावे.
37 그러나 그 마음을 굳게 하고 또 부득이한 일도 없고 자기 뜻대로 할 권리가 있어서 그 처녀 딸을 머물러 두기로 마음에 작정하여도 잘 하는 것이니라
३७पण ज्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला, ज्याला कशाची निकड नाही व ज्याची इच्छेवर सत्ता आहे आणि असे ज्याने मनात ठरवले आहे तो चांगले करतो.
38 그러므로 처녀 딸을 시집 보내는 자도 잘 하거니와 시집 보내지 아니하는 자가 더 잘 하는 것이니라
३८म्हणून जो लग्न करून देतो तो चांगले करतो; पण लग्न करून देत नाही तो अधिक चांगले करतो.
39 아내가 그 남편이 살 동안에 매여 있다가 남편이 죽으면 자유하여 자기 뜻대로 시집 갈 것이나 주 안에서만 할 것이니라
३९विवाहित स्त्रीचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमाने बांधलेली आहे, पण जर तिचा पती मरण पावला तर, केवळ प्रभूमध्ये विश्वासी असल्यास, तिची इच्छा असेल त्याच्याशी विवाहित होण्यास ती स्वतंत्र आहे.
40 그러나 내 뜻에는 그냥 지내는 것이 더욱 복이 있으리로다 나도 또한 하나님의 영을 받은 줄로 생각하노라
४०पण ती जर अविवाहित राहील तर, माझ्या मते, ती अधिक आशीर्वादित होईल आणि मी मानतो की, माझ्यातही देवाचा आत्मा आहे.