< 역대상 18 >
1 이 후에 다윗이 블레셋 사람을 쳐서 항복받고 블레셋 사람의 손에서 가드와 그 동네를 빼앗고
१यानंतर असे झाले की, दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्यांच्या हातातून गथ आणि त्यांची गावे घेतली.
2 또 모압을 치매 모압 사람이 다윗의 종이 되어 조공을 바치니라
२मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले.
3 소바 왕 하닷에셀이 유브라데 강 가에서 자기 권세를 펴고자 하매 다윗이 저를 쳐서 하막까지 이르고
३मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला.
4 그 병거 일천승과 기병 칠천과 보병 이만을 빼앗고 그 병거 일백승의 말만 남기고 그 외의 병거의 말은 다 발의 힘줄을 끊었더니
४दावीदाने त्याच्याकडून एक हजार रथ, सात हजार सारथी, आणि वीस हजार पायदळ एवढे घेतले. दावीदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून शंभर रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.
5 다메섹 아람 사람이 소바 왕 하닷에셀을 도우러 온지라 다윗이 아람 사람 이만 이천을 죽이고
५जेव्हा दिमिष्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजर याच्या मदतीला आले, त्यांच्यापैकी बावीस हजार लोकांसही दावीदाने जिवे मारले.
6 다메섹 아람에 수비대를 두매 아람 사람이 다윗의 종이 되어 조공을 바치니라 다윗이 어디로 가든지 여호와께서 이기게 하시니라
६नंतर अराममधील दिमिष्कात दावीदाने बस्थान बसविले. अरामी लोक दावीदाचे सेवक होऊन त्यास कर देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जेथे जेथे जात असे तेथे परमेश्वर त्यास जय देत असे.
7 다윗이 하닷에셀의 신복들의 가진 금방패를 빼앗아 예루살렘으로 가져오고
७हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरूशलेमेला आणल्या.
8 또 하닷에셀의 성읍 디브핫과 군에서 심히 많은 곳을 취하였더니 솔로몬이 그것으로 놋바다와 기둥과 놋그릇들을 만들었더라
८हद्देजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली.
9 하맛 왕 도우가 다윗이 소바 왕 하닷에셀의 온 군대를 쳐서 파하였다 함을 듣고
९जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली.
10 그 아들 하도람을 보내어 다윗 왕에게 문안하고 축복하게 하니 이는 하닷에셀이 이왕에 도우로 더불어 여러번 전쟁이 있던 터에 다윗이 하닷에셀을 쳐서 파하였음이라 하도람이 금과 은과 놋의 여러 가지 그릇을 가져온지라
१०तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले, कारण दावीद हद्देजराविरुध्द लढला व त्याचा पराभव केला, तोवू आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्याबरोबर सोने, रुपे, पितळ याची भांडी आणली.
11 다윗 왕이 그것도 여호와께 드리되 에돔과 모압과 암몬 자손과 블레셋 사람과 아말렉 등 여러 족속에게서 취하여 온 은금과 함께 하여 드리니라
११जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून, अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांच्यापासून घेतले होते, ती भांडीही दावीद राजाने परमेश्वरास समर्पिली.
12 스루야의 아들 아비새가 염곡에서 에돔 사람 일만 팔천을 쳐 죽인지라
१२सरुवेचा पुत्र अबीशय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांस मारले.
13 다윗이 에돔에 수비대를 두매 에돔 사람이 다 다윗의 종이 되니라 다윗이 어디로 가든지 여호와께서 이기게 하셨더라
१३अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला.
14 다윗이 온 이스라엘을 다스려 모든 백성에게 공과 의를 행할새
१४दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतिने वागत असे.
15 스루야의 아들 요압은 군대 장관이 되고 아힐룻의 아들 여호사밧은 사관이 되고
१५सरुवेचा पुत्र यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता.
16 아히둡의 아들 사독과 아비아달의 아들 아비멜렉은 제사장이 되고 사워사는 서기관이 되고
१६अहीटूबचा पुत्र सादोक आणि अब्याथारचा पुत्र अबीमलेख याजक होते. शवूशा हा नियमशास्त्र शिक्षक होता.
17 여호야다의 아들 브나야는 그렛 사람과 블렛 사람을 관할하고 다윗의 아들들은 왕을 모셔 대신이 되니라
१७यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार होते.