< 역대상 12 >

1 다윗이 기스의 아들 사울을 인하여 시글락에 숨어 있을 때에 그에게 와서 싸움을 돕는 용사 중에 든 자가 있었으니
कीशाचा पुत्र शौल याच्या भीतीने दावीद सिकलागला, लपून राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते.
2 저희는 활을 가지며 좌우 손을 놀려 물매도 던지며 살도 발하는 자요 베냐민 지파 사울의 동족인데 그 이름은 이러하니라
धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या व उजव्या दोन्ही हातांनी करीत होते. बन्यामीनच्या वंशात जे शौलाचे नातेवाईक होते.
3 그 두목은 아히에셀이요 다음은 요아스니 기브아 사람 스마아의 두 아들이요 또 아스마웹의 아들 여시엘과 벨렛과 또 브라가와 아나돗 사람 예후와
अहीएजर हा त्यांच्यातला प्रमुख होता. मग योवाश, गिबा येथील शमा याचे हे पुत्र त्यानंतर यजिएल आणि पेलेट. हे अजमावेथ याचे पुत्र. अनाथोच येथील बराका व येहू.
4 기브온 사람 곧 삼십인 중에 용사요 삼십인의 두목된 이스마야며 또 예레미야와 야하시엘과 요하난과 그데라 사람 요사밧과
गिबोन येथील इश्माया हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख. गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद.
5 엘루새와 여리못과 브아랴와 스마랴와 하룹 사람 스바댜와
एलूजय, यरीमोथ, बाल्या, शमऱ्या, हरुफी शफट्या
6 고라 사람들 엘가나와 잇시야와 아사렐과 요에셀과 야소브암이며
एलकाना, इश्शिया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरहाचे वंशज,
7 그돌 사람 여로함의 아들 요엘라와 스바댜더라
तसेच यरोहाम गदोरी याचे पुत्र योएला आणि जबद्या.
8 갓 사람 중에서 거친 땅 견고한 곳에 이르러 다윗에게 돌아온 자가 있었으니 다 용사요 싸움에 익숙하여 방패와 창을 능히 쓰는 자라 그 얼굴은 사자 같고 빠르기는 산의 사슴 같으니
गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते.
9 그 두목은 에셀이요 둘째는 오바댜요 세째는 엘리압이요
गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा.
10 네째는 미스만나요 다섯째는 예레미야요
१०मिश्मन्ना चौथा क्रमाकांवर तर यिर्मया पाचव्या वर होता.
11 여섯째는 앗대요 일곱째는 엘리엘이요
११अत्तय सहावा, अलीएल सातवा,
12 여덟째는 요하난이요 아홉째는 엘사밧이요
१२योहानन आठवा, एलजाबाद नववा,
13 열째는 예레미야요 열 한째는 막반내라
१३यिर्मया दहावा, मखबन्नय अकरावा.
14 이 갓 자손이 군대 장관이 되어 그 작은 자는 일백인을 관할하고 그 큰 자는 일천인을 관할하더니
१४हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला जो लहान तो शंभरावर आणि जो मोठा तो हजारांवर होता.
15 정월에 요단강 물이 모든 언덕에 넘칠 때에 이 무리가 강물을 건너서 골짜기에 있는 모든 자로 동서로 도망하게 하였더라
१५वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती तेव्हा त्यांनी ती ओलांडून जाऊन खोऱ्यात राहणाऱ्यांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्चिमेला पळवून लावले.
16 베냐민과 유다 자손 중에서 견고한 곳에 이르러 다윗에게 나오매
१६बन्यामीन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले.
17 다윗이 나가서 맞아 저희에게 일러 가로되 만일 너희가 평화로이 와서 나를 돕고자 하면 내 마음이 너희와 연합하려니와 만일 너희가 나를 속여 내 대적에게 붙이고자 하면 내 손에 불의함이 없으니 우리 열조의 하나님이 감찰하시고 책망하시기를 원하노라 하매
१७दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही शांतीने आला असाल तर तुम्ही मला सामील होऊ शकता. पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून त्याचा निषेध करो.”
18 때에 성신이 삼십인의 두목 아마새에게 감동하시니 가로되 다윗이여 우리가 당신에게 속하겠고 이새의 아들이여 우리가 당신과 함께하리니 원컨대 평강하소서 당신도 평강하고 당신을 돕는자에게도 평강이 있을지니 이는 당신의 하나님이 당신을 도우심이니이다 한지라 다윗이 드디어 접대하여 세워 군대장관을 삼았더라
१८अमासय याच्यावर आत्मा आला, तो तीस जणांचा प्रमुख होता. तो म्हणाला “दावीदा, आम्ही तुझे आहोत. इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत. शांती, तुला शांती असो! तुला मदत करणाऱ्यांनाही शांती असो, कारण तुझा देव तुला मदत करतो.” तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.
19 다윗이 전에 블레셋 사람과 함께가서 사울을 치려할때에 므낫세 지파에서 두어 사람이 다윗에게 돌아왔으나 다윗 등이 블레셋 사람을 돕지 못하였음은 블레셋 사람의 방백이 서로 의논하고 보내며 이르기를 저가 그 주 사울에게로 돌아가리니 우리 머리가 위태할까하라 함이라
१९मनश्शेचे काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. तो पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण त्यांनी पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. कारण पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी आपसात सल्ला करून त्यांनी दावीदाला परत पाठवून दिले. ते म्हणाले, “दावीद जर आपला धनी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपल्या जीवाला धोका होईल.”
20 다윗이 시글락으로 갈 때에 므낫세 지파에서 그에게로 돌아온 자는 아드나와 요사밧과 여디아엘과 미가엘과 요사밧과 엘리후와 실르대니 다 므낫세의 천부장이라
२०तो जेव्हा सिकलागला गेला. त्याच्याबरोबर आलेले मनश्शेचे लोक अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, आणि सिलथय. हे सर्व मनश्शे वंशातील सरदार होते.
21 이 무리가 다윗을 도와 적당을 쳤으니 저희는 다 큰 용사요 군대 장관이 됨이었더라
२१लुटारुंच्या टोळीविरुध्द तोंड द्यायला त्यांनी दावीदाला मदत केली. ते लढणारे माणसे होते. दावीदाच्या सैन्यात ते अधिकारपदावर चढले.
22 그 때에 사람이 날마다 다윗에게로 돌아와서 돕고자 하매 큰 군대를 이루어 하나님의 군대와 같았더라
२२देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यंत दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत दिवसेंदिवस भर पडत गेली.
23 싸움을 예비한 군대 장관들이 헤브론에 이르러 다윗에게로 나아와서 여호와의 말씀대로 사울의 나라를 저에게 돌리고자 하였으니 그 수효가 이러하였더라
२३आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे हेब्रोन नगरात शौलाचे राज्य दावीदाच्या हाती द्यावे म्हणून सशस्त्र सैनिक त्याच्याकडे आले.
24 유다 자손 중에서 방패와 창을 들고 싸움을 예비한 자가 육천 팔백명이요
२४यहूदाच्या घराण्यातील सहा हजार आठशे, सैनिक ढाल आणि भाले यांसह लढाईस सशस्त्र होते.
25 시므온 자손 중에서 싸움하는 큰 용사가 칠천 일백명이요
२५शिमोनाच्या कुळातून सात हजार शंभर लढाईस तयार असे शूर सैनिक होते.
26 레위 자손 중에서 사천 육백명이요
२६लेवीच्या कुळातून चार हजार सहाशें शूर वीर होते.
27 아론의 집 족장 여호야다와 그와 함께한 자가 삼천 칠백명이요
२७अहरोनाच्या घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते.
28 또 젊은 용사 사독과 그 족속의 장관이 이십 이명이요
२८सादोक तरुण बलवान आणि धैर्यवान वीर असून त्याच्या वडिलाच्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले होते.
29 베냐민 자손 곧 사울의 동족은 아직도 태반이나 사울의 집을 좇으나 그 중에서 나아온 자가 삼천명이요
२९बन्यामीनच्या वंशातील तीन हजार जण होते. ते शौलाचे नातेवाईक होते. तोपर्यंत ते बहुतेक शौलाच्या घराण्याशी एकनिष्ठ होते.
30 에브라임 자손 중에서 본 족속의 유명한 큰 용사가 이만 팔백명이요
३०एफ्राइमाच्या घराण्यातील आपल्या वडिलांच्या घराण्यात नावाजलेले असे वीस हजार आठशे शूर सैनिक होते.
31 므낫세 반 지파 중에 녹명된 자로서 와서 다윗을 세워 왕을 삼으려 하는 자가 일만 팔천명이요
३१मनश्शेच्या अर्ध्या वंशातील अठरा हजार लोक दावीदास राजा करण्यास आले. त्यांची नावे नोंदण्यात आली.
32 잇사갈 자손 중에서 시세를 알고 이스라엘이 마땅히 행할 것을 아는 두목이 이백명이니 저희는 그 모든 형제를 관할하는 자며
३२इस्साखाराच्या घराण्यातील दोनशे जाणती व जबाबदार माणसे आली. इस्राएलने केव्हा काय करणे योग्य आहे हे समजण्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.
33 스불론 중에서 모든 군기를 가지고 항오를 정제히 하고 두마음을 품지 아니하고 능히 진에 나아가서 싸움을 잘하는 자가 오만명이요
३३जबुलून घराण्यातले पन्नास हजार अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दावीदाशी ते एकनिष्ठ होते.
34 납달리 중에서 장관 일천명과 방패와 창을 가지고 함께한 자가 삼만 칠천명이요
३४नफतालीच्या घराण्यातून एक हजार सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे सदतीस हजार लोक होते.
35 단 자손 중에서 싸움을 잘하는 자가 이만 팔천 륙백명이요
३५दानच्या वंशातून अठ्ठावीस हजार जण युध्दाला तयार होते.
36 아셀 중에서 능히 진에 나가서 싸움을 잘하는 자가 사만명이요
३६आशेर वंशातून चाळीस हजार सैनिक युध्दावर जायला तयार असे होते.
37 요단 저편 르우벤 자손과 갓 자손과 므낫세 반 지파 중에서 모든 군기를 가지고 능히 싸우는 자가 십이만 명이었더라
३७यार्देन नदीच्या पूर्वेकडील रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील एक लाख वीस हजार लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते.
38 이 모든 군사가 항오를 정제히 하고 다 성심으로 헤브론에 이르러 다윗으로 온 이스라엘 왕을 삼고자 하고 또 이스라엘의 남은 자도 다 일심으로 다윗으로 왕을 삼고자 하여
३८हे सर्वजण पराक्रमी होते. दावीदाला इस्राएलाचा राजा करायचे याबाबतीत इतर इस्राएल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्राएलमधील इतर लोकांचीही दावीदाने राजा व्हावे हीच इच्छा होती.
39 무리가 거기서 다윗과 함께 사흘을 지내며 먹고 마셨으니 이는 그 형제가 이미 식물을 예비하였음이며
३९त्यांनी तेथे दावीदाबरोबर तीन दिवस घालवले. खाण्याचा व पिण्यांचा आस्वाद त्यांनी घेतला, कारण त्यांच्या नातलगांनी त्याच्याबरोबर सर्व अन्नपुरवठा देऊन पाठवले होते.
40 또 근처에 있는 자로부터 잇사갈과 스불론과 납달리까지도 식물을 나귀와 약대와 노새와 소에 무수히 실어 왔으니 곧 과자와 무화과병과 건포도와 포도주와 기름이요 소와 양도 많이 가져왔으니 이스라엘 가운데 희락이 있음이었더라
४०याखेरीज इस्साखार, जबुलून, नफताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढव, उंट, खेचरे, व गाई बैल यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणीक, अंजीराच्या ढेपा, मनुकांचे घोस, द्राक्षरस, तेल, गाई बैल व मेंढरे असे बरेच काही आणले. कारण इस्राएलमध्ये उत्सव चालला होता.

< 역대상 12 >