< 이사야 11 >
1 이새의 줄기에서 한 싹이 나며 그 뿌리에서 한 가지가 나서 결실할 것이요
१इशायाच्या बुंध्याला अंकुर फुटेल, व त्याच्या मुळातून निघालेल्या शाखेला फळ येईल.
2 여호와의 신 곧 지혜와 총명의 신이요 모략과 재능의 신이요 지식과 여호와를 경외하는 신이 그 위에 강림하시리니
२परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, मार्गदर्शन व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर येईल,
3 그가 여호와를 경외함으로 즐거움을 삼을 것이며 그 눈에 보이는대로 심판치 아니하며 귀에 들리는 대로 판단치 아니하며
३परमेश्वराचे भय त्याचा हर्षोल्हास होईल; त्याच्या डोळ्यांनी काय पाहिले त्यावरून तो न्याय करणार नाही, त्याच्या कानांनी काय ऐकले यावरुन तो निर्णय करणार नाही.
4 공의로 빈핍한 자를 심판하며 정직으로 세상의 겸손한 자를 판단할 것이며 그 입의 막대기로 세상을 치며 입술의 기운으로 악인을 죽일 것이며
४याउलट तो दीनांचा न्याय चांगुलपणाने करील व पृथ्वीवरील दिनांचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुख दंडाने पृथ्वीला तडाखा देईल. आणि फुंकराने दुष्टांना ठार करील.
5 공의로 그 허리띠를 삼으며 성실로 몸의 띠를 삼으리라
५धार्मिकता त्याचा कमरबंद असेल, आणि विश्वास त्याचा कमरवेष्टन होईल.
6 그 때에 이리가 어린 양과 함께 거하며 표범이 어린 염소와 함께 누우며 송아지와 어린 사자와 살찐 짐승이 함께 있어 어린 아이에게 끌리며
६लांडगा कोकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल. वासरू, तरूण सिंह व पुष्ठ बैल एकत्र राहतील लहान मुल त्यांना चालवील.
7 암소와 곰이 함께 먹으며 그것들의 새끼가 함께 엎드리며 사자가 소처럼 풀을 먹을 것이며
७गाय व अस्वल एकत्र चरतील, आणि त्यांचे बच्चे एकत्र लोळतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.
8 젖먹는 아이가 독사의 구멍에서 장난하며 젖뗀 어린 아이가 독사의 굴에 손을 넣을 것이라
८तान्हे बाळ सापाच्या वारुळाजवळ खेळेल आणि दुधपीते बालक सापाच्या बिळात आपला हात घालील.
9 나의 거룩한 산 모든 곳에서 해됨도 없고 상함도 없을 것이니 이는 물이 바다를 덮음 같이 여호와를 아는 지식이 세상에 충만할 것임이니라
९माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.
10 그 날에 이새의 뿌리에서 한 싹이 나서 만민의 기호로 설 것이요 열방이 그에게로 돌아오리니 그 거한 곳이 영화로우리라
१०त्यादिवशी, इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशानी असे उभे होईल. राष्ट्रे त्यास शोधून काढतील, आणि त्याचे विश्रामस्थान वैभवशाली होईल.
11 그 날에 주께서 다시 손을 펴사 그 남은 백성을 앗수르와 애굽과 바드로스와 구스와 엘람과 시날과 하맛과 바다 섬들에서 돌아오게 하실 것이라
११त्यादिवशी, असे होईल की प्रभू आपल्या अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व भूसमुद्रातील त्याच्या उर्वरीत लोकांस परत मिळविण्यासाठी आपले हात लांब करील.
12 여호와께서 열방을 향하여 기호를 세우시고 이스라엘의 쫓긴 자를 모으시며 땅 사방에서 유다의 이산한 자를 모으시리니
१२तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील व इस्राएलातून बहिष्कृत केलेल्या आणि यहूदातील विखुरलेल्यांस पृथ्वीच्या चारही दिशांकडून एकत्र करील.
13 에브라임의 투기는 없어지고 유다를 괴롭게 하던 자는 끊어지며 에브라임은 유다를 투기하지 아니하며 유다는 에브라임을 괴롭게하지 아니할 것이요
१३तो एफ्राइमाचे वैर संपवेल, आणि यहूदाचे जे विरोधी त्यांचा बिमोड करेल. एफ्राइम यहूदाचा द्वेष करणार नाही, आणि यहूदा एफ्रइमाशी विरोध करणार नाही.
14 그들이 서으로 블레셋 사람의 어깨에 날아 앉고 함께 동방 백성을 노략하며 에돔과 모압에 손을 대며 암몬 자손을 자기에게 복종 시키시리라
१४याउलट ते पश्चिमेकडील पलिष्ट्यांच्या टेकड्यांवर झडप घालतील, आणि एकत्रितपणे पूर्वेकडील लोकांस लुटतील. अदोम व मवाब यांच्यावर ते हमला करतील आणि अम्मोनाचे लोक त्यांच्या आज्ञा पाळतील.
15 여호와께서 애굽 해고를 말리우시고 손을 유브라데 하수 위에 흔들어 뜨거운 바람을 일으켜서 그 하수를 쳐서 일곱 갈래로 나눠 신 신고 건너가게 하실 것이라
१५परमेश्वर मिसराच्या समुद्राची खाडी दुभागील. आपल्या उष्ण श्वासाने फरात नदीवर आपला हात चालवील, आणि जोडे घालून तिला ओलांडता येईल अशा रीतीने तिला सात फाटयांमध्ये विभागील.
16 그의 남아 있는 백성을 위하여 앗수르에서부터 돌아오는 대로가 있게 하시되 이스라엘이 애굽 땅에서 나오던 날과 같게 하시리라
१६इस्राएल मिसर देशातून वर आला, तेव्हा त्याचप्रमाणे त्याच्या अवशिष्ट लोकांस अश्शूरातून परतण्यास हमरस्ता होईल.