< 열왕기상 12 >
1 르호보암이 세겜으로 갔으니 이는 온 이스라엘이 저로 왕을 삼고자 하여 세겜에 이르렀음이더라
१रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यास सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.
2 느밧의 아들 여로보암이 전에 솔로몬 왕의 얼굴을 피하여 애굽으로 도망하여 있었더니 이제 그 소문을 듣고 오히려 애굽에 있는 중에
२शलमोन राजाकडून पळाल्यावर नबाटाचा पुत्र यराबाम मिसरमध्ये जाऊन राहीला होता, त्याने हे ऐकले,
3 무리가 보내어 저를 불렀더라 여로보암과 이스라엘의 온 회중이 와서 르호보암에게 고하여 가로되
३लोकांनी त्यास बोलावून आणले, तेव्हा यराबाम व सर्व इस्राएल लोक रहबामाकडे येऊन त्यास म्हणाले,
4 `왕의 부친이 우리의 멍에를 무겁게 하였으나 왕은 이제 왕의 부친이 우리에게 시킨 고역과 메운 무거운 멍에를 가볍게 하소서 그리하시면 우리가 왕을 섬기겠나이다'
४“तुझ्या वडिलांनी कामाच्या ओझ्याखाली आम्हास भरडून काढले. आता आमचे ओझे थोडे हलके कर. आमच्यावर लादलेले मेहनतीचे जू काढ म्हणजे आम्ही तुझी सेवा करु.”
5 르호보암이 대답하되 `갔다가 삼일 후에 다시 내게로 오라' 하매 백성이 가니라
५रहबाम म्हणाला, “तीन दिवसानंतर मला भेटा. तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” मग लोक निघून गेले.
6 르호보암 왕이 그 부친 솔로몬의 생전에 그 앞에 모셨던 노인들과 의논하여 가로되 `너희는 어떻게 교도하여 이 백성에게 대답하게 하겠느뇨'
६शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृध्द मंडळी होती. त्यांनाच राजा रहबामाने याबाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, “या लोकांस मी काय सांगू?”
7 대답하여 가로되 `왕이 만일 오늘날 이 백성의 종이 되어 저희를 섬기고 좋은 말로 대답하여 이르시면 저희가 영영히 왕의 종이 되리이다' 하나
७यावर ही वयोवृध्द मंडळी म्हणाली, “तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील. त्यांच्याशी प्रेमाने, समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील.”
8 왕이 노인의 교도하는 것을 버리고 그 앞에 모셔 있는 자기와 함께 자라난 소년들과 의논하여
८पण रहबामाने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले.
9 가로되 `너희는 어떻게 교도하여 이 백성에게 대답하게 하겠느뇨 백성이 내게 말하기를 왕의 부친이 우리에게 메운 멍에를 가볍게하라 하였느니라'
९रहबाम त्यांना म्हणाला, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीतल्यापेक्षा “या लोकांस कामाचे जू हलके करून हवे आहे. त्यांना आता मी काय सांगू, त्यांच्याशी काय बोलू?”
10 함께 자라난 소년들이 왕께 고하여 가로되 `이 백성들이 왕께 고하기를 왕의 부친이 우리의 멍에를 무겁게 하였으나 왕은 우리를 위하여 가볍게 하라 하였은즉 왕은 대답하기를 나의 새끼손가락이 내 부친의 허리보다 굵으니
१०तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, “ते लोक येऊन असे म्हणत आहेत, ‘तुझ्या वडिलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करवून घेतले, तर आता आमचे जू हलके करा.’ तर तू त्यांना बढाई मारुन सांग, ‘माझ्या वडिलांच्या कंबरेपेक्षा ही माझी करंगळी जास्त मोठी आहे.
11 내 부친이 너희로 무거운 멍에를 메게 하였으나 이제 나는 너희의 멍에를 더욱 무겁게 할지라 내 부친은 채찍으로 너희를 징치하였으나 나는 전갈로 너희를 징치하리라 하소서'
११माझ्या वडिलांनी तुम्हावर भारी जू लादले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हास चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी तर तुम्हास विंचवानी शिक्षा करीन.”
12 삼일만에 여로보암과 모든 백성이 르호보암에게 나아왔으니 이는 왕이 명하여 이르기를 삼일만에 내게로 다시 오라 하였음이라
१२रहबाम राजाने त्या लोकांस “तीन दिवसानी यायला” सांगितले होते. त्याप्रमाणे यराबाम व सर्व इस्राएल लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले.
13 왕이 포악한 말로 백성에게 대답할새 노인의 교도를 버리고
१३त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
14 소년의 가르침을 좇아 저희에게 고하여 가로되 `내 부친은 너희의 멍에를 무겁게 하였으나 나는 너희의 멍에를 더욱 무겁게 할지라 내 부친은 채찍으로 너희를 징치하였으나 나는 전갈로 너희를 징치하리라' 하니라
१४मित्रांच्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुमच्यावर कष्टाचे जू लादले. मी तर तुम्हास आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण ती तर तुम्हास विंचवानी शिक्षा करील.”
15 왕이 이같이 백성의 말을 듣지 아니하였으니 이 일은 여호와께로 말미암아 난 것이라 여호와께서 전에 실로 사람 아히야로 느밧의 아들 여로보암에게 고한 말씀을 응하게 하심이더라
१५या प्रकारे राजाने इस्राएल लोकांचे ऐकले नव्हते. परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा पुत्र यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहीया याच्यामार्फत परमेश्वराने हे वचन दिले.
16 온 이스라엘이 자기들의 말을 왕이 듣지 아니함을 보고 왕에게 대답하여 가로되 `우리가 다윗과 무슨 관계가 있느뇨 이새의 아들에게서 업이 없도다 이스라엘아 너희의 장막으로 돌아가라 다윗이여 이제 너는 네 집이나 돌아보라' 하고 이스라엘이 그 장막으로 돌아가니라
१६नवा राजा आपले म्हणणे मानत नाही, हे इस्राएली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले, “आम्ही दाविदाच्या घराण्यातील थोडेच आहोत. काय? नाही! इशायच्या जमिनीत आम्हास थोडाच वाटा मिळणार आहे काय? नाही! तेव्हा इस्राएलींनो, जा आपापल्या घरी तंबूकडे जा, या दाविदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य करू दे.” एवढे बोलून ते निघून गेले.
17 그러나 유다 성읍들에 사는 이스라엘 자손에게는 르호보암이 그 왕이 되었더라
१७तरीही यहूदा नगरांमध्ये राहणाऱ्या इस्राएल लोकांवर रहबामाची सत्ता होतीच.
18 르호보암 왕이 역군의 감독 아도니람을 보내었더니 온 이스라엘이 저를 돌로 쳐 죽인지라 르호보암 왕이 급히 수레에 올라 예루살렘으로 도망하였더라
१८अदोराम नावाचा एक मनुष्य सर्व कामगारांवर देखरेख करत असे. तेव्हा राजा रहबामाने त्यास लोकांशी बोलणी करायला पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर इतकी दगडफेक केली की तो प्राणाला मुकला. तेव्हा राजाने आपल्या रथात बसून पळ काढला आणि तो यरूशलेम येथे आला.
19 이에 이스라엘이 다윗의 집을 배반하여 오늘날까지 이르렀더라
१९इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याविरुध्द बंड पुकारले. आजही त्या घराण्याशी त्यांचे वैर आहे.
20 온 이스라엘이 여로보암의 돌아왔다 함을 듣고 보내어 저를 공회로 청하여다가 온 이스라엘의 왕을 삼았으니 유다 지파 외에는 다윗의 집을 좇는 자가 없으니라
२०यराबाम परत आला आहे असे इस्राएल लोकांस कळले. तेव्हा त्यांनी सगळ्यांची सभा भरवून त्यास सर्व इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहूदाच्या घराण्याने तेवढा दाविदाच्या घराण्याला आपला पठिंबा दिला.
21 르호보암이 예루살렘에 이르러 유다 온 족속과 베냐민 지파를 모으니 택한 용사가 십 팔만이라 이스라엘 족속과 싸워 나라를 회복하여 솔로몬의 아들 르호보암에게 돌리려 하더니
२१रहबाम यरूशलेमेला परतला. यहूदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर एक लक्ष ऐंशी हजाराचे सैन्य जमले. इस्राएल लोकांशी लढून शलमोनाचे राज्य परत मिळवायचा रहबामाचा विचार होता.
22 하나님의 말씀이 하나님의 사람 스마야에게 임하여 가라사대
२२शमाया नामक देवाच्या मनुष्याशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला,
23 솔로몬의 아들 유다 왕 르호보암과 유다와 베냐민 온 족속과 또 그 남은 백성에게 고하여 이르기를
२३“शलमोनाचा पुत्र आणि यहूदाचा राजा रहबाम, तसेच यहूदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग,
24 여호와의 말씀이 너희는 올라가지 말라 너희 형제 이스라엘 자손과 싸우지 말고 각기 집으로 돌아가라 이 일이 내게로 말미암아 난 것이라 하셨다 하라 하신지라 저희가 여호와의 말씀을 듣고 그 말씀을 좇아 돌아갔더라
२४इस्राएलांनी आपल्या बांधवांशी तुम्ही लढू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे.” प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी परत जा. या सगळ्यांचा करता करविता मीच होतो. या आदेशानुसार रहबामाचे सैन्य माघारी गेले.
25 여로보암이 에브라임 산지에 세겜을 건축하고 거기서 살며 또 거기서 나가서 부느엘을 건축하고
२५शखेम हे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील नगर होते. ते चांगले मजबूत आणि सुरक्षित करून यराबाम तेथे राहिला. पुढे त्याने पनुएल नगराची उभारणी केली.
26 그 마음에 스스로 이르기를 나라가 이제 다윗의 집으로 돌아가리로다
२६यराबाम मनाशीच म्हणाला, “हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे.
27 만일 이 백성이 예루살렘에 있는 여호와의 전에 제사를 드리고자하여 올라가면 이 백성의 마음이 유다 왕 된 그 주 르호보암에게로 돌아가서 나를 죽이고 유다 왕 르호보암에게로 돌아가리로다 하고
२७लोक यरूशलेमेस परमेश्वराच्या घराकडे यज्ञ करावयास गेले तर यहूदाचा राजा रहबाम याच्याच मागे ते जातील मग ते माझा वध करतील व पुन्हा यहूदाचा राजा रहबाम याचे पुन्हा: होतील.”
28 이에 계획하고 두 금송아지를 만들고 무리에게 말하기를 `너희가 다시는 예루살렘에 올라갈 것이 없도다 이스라엘아! 이는 너희를 애굽 땅에서 인도하여 올린 너희 신이라' 하고
२८त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. “त्यांनी त्यास एक तोड सुचवली. त्यानुसार राजा यराबामाने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांस म्हणाला, तुम्हास यरूशलेमेला उपासनेसाठी जायची गरज नाही. हे इस्राएला तुम्हास मिसर देशाबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”
२९राजाने मग एक सोन्याचे वासरु बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले.
30 이 일이 죄가 되었으니 이는 백성들이 단까지 가서 그 하나에게 숭배함이더라
३०पण त्याने हे मोठे पाप केले होते. इसाएलाचे लोक बेथेल आणि दान येथे वासरांच्या पूजेसाठी जाऊ लागले. पण हेही मोठेच पाप होते.
31 저가 또 산당들을 짓고 레위 자손 아닌 보통 백성으로 제사장을 삼고
३१उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामाने देऊळे बांधली. त्यासाठी याजकही त्याने फक्त लेवी वंशातले न निवडता इस्राएलाच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले.
32 팔월 곧 그 달 십 오일로 절기를 정하여 유다의 절기와 비슷하게 하고 단에 올라가되 벧엘에서 그와 같이 행하여 그 만든 송아지에게 제사를 드렸으며 그 지은 산당의 제사장은 벧엘에서 세웠더라
३२याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यराबामाने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बली अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवाळांसाठी बेथेल मधले याजकही नेमले.
33 저가 자기 마음대로 정한 달 곧 팔월 십오일로 이스라엘 자손을 위하여 절기로 정하고 벧엘에 쌓은 단에 올라가서 분향하였더라
३३अशाप्रकारे यराबामाने इस्राएल लोकांसाठी आठव्या महिन्याचा पंधरावा दिवस सण म्हणून ठरवला. त्यादिवशी बेथेलच्या वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.