< 箴言 知恵の泉 24 >
1 なんぢ惡き人を羨むことなかれ 又これと偕に居らんことを願ふなかれ
१दुर्जनांचा मत्सर करू नकोस, आणखी त्यांच्याबरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस.
2 そはその心に暴虐をはかり その口唇に人を害ふことをいへばなり
२कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात.
3 家は智慧によりて建られ 明哲によりて堅くせられ
३सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; आणि समजूतदारपणाने ते स्थिर राहते.
4 また室は知識によりて各種の貴く美しき寳にて充されん
४ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात.
५शूर मनुष्य बलवान असतो, परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे.
6 汝よき謀計をもて戦闘をなせ 勝利は議者の多きによる
६कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तू युध्द चालू करू शकतो; आणि पुष्कळ सल्लागारबरोबर असल्याने विजय मिळतो.
7 智慧は高くして愚なる者の及ぶところにあらず 愚なる者は門にて口を啓くことをえず
७मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे; वेशीत तो आपले तोंड उघडतो.
८जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो, लोक त्यास योजनेचा गुरू म्हणतात.
9 愚なる者の謀るところは罪なり 嘲笑者は人に憎まる
९मूर्खाची योजना पाप असते, निंदकाचा मनुष्यांना तिटकारा येतो.
१०जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर, मग तुझी शक्ती थोडीच आहे.
11 なんぢ死地に曳れゆく者を拯へ 滅亡によろめきゆく者をすくはざる勿れ
११ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर.
12 汝われら之を知らずといふとも心をはかる者これを暁らざらんや 汝の霊魂をまもる者これを知ざらんや 彼は聲のおのおのの行爲によりて人に報ゆべし
१२जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.” तर तू काय म्हणतो हे जो कोणी हृदये तोलून पाहतो त्यास हे समजणार नाही का? आणि जो कोणी तुझ्या जिवाचे रक्षण करतो त्यास माहित नाही का? आणि देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही कां?
13 わが子よ蜜を食へ 是は美ものなり また蜂のすの滴瀝を食へ 是はなんぢの口に甘し
१३माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे, कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे.
14 智慧の汝の霊魂におけるも是の如しと知れ これを得ばかならず報いありて汝の望すたれじ
१४त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे; जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे, आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही.
15 惡者よ義者の家を窺ふことなかれ その安居所を攻ること勿れ
१५अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको!
16 そは義者は七次たふるるともまた起く されど惡者は禍災によりて亡ぶ
१६कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल.
17 汝の仇たふるるとき樂しむこと勿れ 彼の亡ぶるときこころに喜ぶことなかれ
१७तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस, आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदीत होऊ देऊ नको.
18 恐くはヱホバこれを見て惡しとし その震怒を彼より離れしめたまはん
१८उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल.
19 なんぢ惡者を怒ることなかれ 邪曲なる者を羨むなかれ
१९जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको, आणि दुष्टांचा मत्सर करू नको.
20 それ惡者には後の善賚なし 邪曲なる爲の燈火は滅されん
२०कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही दुष्टांचा दिप मालवला जाईल.
21 わが子よヱホバと王とを畏れよ 叛逆者に交ること勿れ
२१माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस.
22 斯るものらの災渦は速におこる この兩者の滅亡はたれか知えんや
२२कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल, आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे?
23 是等もまた智慧ある者の箴言なり 偏り鞫するは善らず
२३हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही.
24 罪人に告て汝は義しといふものをは衆人これを詛ひ諸民これを惡まん
२४जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस; तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.
25 これを譴る者は恩をえん また福祉これにきたるべし
२५पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल, आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल.
२६जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो.
27 外にて汝の工をととのへ田圃にてこれを自己のためにそなへ 然るのち汝の家を建よ
२७तू आपले बाहेरचे काम आधी कर, आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध.
28 故なく汝の鄰に敵して證することなかれ 汝なんぞ口唇をもて欺くべけんや
२८निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्ष देऊ नको, आणि आपल्या वाणीने फसवू नको.
29 彼の我に爲しし如く我も亦かれになすべし われ人の爲ししところに循ひてこれに報いんといふこと勿れ
२९“त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन. मी त्यास त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन.” असे म्हणू नको.
30 われ曾て惰人の田圃と智慧なき人の葡萄園とをすぎて見しに
३०मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून, मी बुद्धिहीन मनुष्याच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो.
31 荊棘あまねく生え薊その地面を掩ひ その石垣くづれゐたり
३१तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती, त्याची जमीन खाजकुइरीने झाकली होती, आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती.
३२मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो.
33 しばらく臥し 暫らく睡り 手を叉きて又しばらく休む
३३“थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.”
34 さらば汝の貧窮は盗人のごとく汝の欠乏は兵士の如くきたるべし
३४आणि दारिद्र्य लुटारूसारखे, आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल.