< ゼパニヤ書 2 >
1 あなたがた、恥を知らぬ民よ、共につどい、集まれ。
१हे निर्लज्ज राष्ट्रा, तुम्ही सर्वजण गोळा व्हा आणि एकत्र या.
2 すなわち、もみがらのように追いやられる前に、主の激しい怒りがまだあなたがたに臨まない前に、主の憤りの日がまだあなたがたに来ない前に。
२फर्मान सादर होण्या आधी आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी, परमेश्वराचा कोप तुमच्यावर येईल त्यापुर्वी, परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वी तुम्ही एकत्र या.
3 すべて主の命令を行うこの地のへりくだる者よ、主を求めよ。正義を求めよ。謙遜を求めよ。そうすればあなたがたは主の怒りの日に、あるいは隠されることがあろう。
३पृथ्वीवरील सर्व नम्र लोकहो, जे तुम्ही परमेश्वराचे नियम पाळता, ते तुम्ही त्यास शोधा, धार्मिकता शोधा! नम्रता शोधा! नम्र होण्यास शिका. कदाचित परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही सुरक्षित रहाल.
4 ともあれ、ガザは捨てられ、アシケロンは荒れはて、アシドドは真昼に追い払われ、エクロンは抜き去られる。
४गज्जाचा त्याग करण्यात येईल व अष्कलोन ओसाड होईल. ते भरदुपारी अश्दोदला बाहेर काढतील, आणि एक्रोन उपटले जाईल.
5 わざわいなるかな、海べに住む者、ケレテの国民。ペリシテびとの地、カナンよ、主の言葉があなたがたに臨む。わたしはあなたを滅ぼして、住む者がないようにする。
५समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांस, करेथी राष्ट्राला हाय हाय! परमेश्वर तुमच्याविरुध्द बोलला आहे. कनान, जो पलिष्ट्यांचा देश आहे, मी तुझा असा नाश करणार की, तुझ्यात कोणीही रहीवासी उरणार नाही.
6 海べよ、あなたは牧場となり、羊飼の牧草地となり、また羊のおりとなる。
६तेव्हा समुद्राकाठचा प्रांत मेंढपाळासाठी मोकळी राने होतील व मेंढ्यांच्या कळपांसाठी वाडे असलेली कुरणे असा होईल.
7 海べはユダの家の残りの者に帰する。彼らはその所で群れを養い、夕暮にはアシケロンの家に伏す。彼らの神、主が彼らを顧み、その幸福を回復されるからである。
७किनाऱ्याचा प्रदेश यहूदाच्या घराण्यातील राहिलेल्यांचा होईल. ते त्यावर आपले कळप चारतील. संध्याकाळी, ते अष्कलोनमधील घरात विश्रांती घेतील, कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांची काळजी घेईल, आणि त्यांचे भविष्य पुनर्संचयित करीन.
8 「わたしはモアブのあざけりと、アンモンの人々の、ののしりを聞いた。彼らはわが民をあざけり、自ら誇って彼らの国境を侵した。
८मवाबाने मारलेले टोमणे व अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत. त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली व त्यांच्या सीमांचे उल्लंघन केले आहे.
9 それゆえ、万軍の主、イスラエルの神は言われる、わたしは生きている。モアブは必ずソドムのようになる。アンモンの人々はゴモラのようになる。いらくさと塩穴とがここを占領して、永遠に荒れ地となる。わが民の残りの者は彼らをかすめ、わが国民の残りの者はこれを所有する」。
९ह्यास्तव सैन्याचा परमेश्वर, इस्राएलाचा प्रभू असे म्हणतो, “मी जिवंत आहे, म्हणून मवाब सदोमासारखा होईल व अम्मोनवासी गमोरा यांसारखे होतील. ते एक निरुपयोगी ठिकाण व मिठाच्या खांचा व कायमचे ओसाड असे होतील. पण माझ्या लोकांतील राहिलेले त्यांना लूटतील, आणि माझ्या राष्ट्रातले शेष त्यांचे वतन पावेल.”
10 この事の彼らに臨むのはその高ぶりによるのだ。彼らが万軍の主の民をあざけり、みずから誇ったからである。
१०मवाब व अम्मोन यांची अशी स्थिती होण्याचे कारण गर्विष्ठपणा असेल, कारण त्यांनी सैन्याचा परमेश्वर याच्या लोकांस टोमणे मारले व त्यांची थट्टा केली.
11 主は彼らに対して恐るべき者となられる。主は地のすべての神々を飢えさせられる。もろもろの国の民は、おのおの自分の所から出て主を拝む。
११ते लोक परमेश्वरास घाबरतील, कारण तो पृथ्वीवरील त्यांच्या दैवतांची थट्टा करेल, सर्व लोक त्याची उपासना करतील. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी व सर्व राष्ट्रद्विपे त्याची आराधना करतील.
12 エチオピヤびとよ、あなたがたもまたわがつるぎによって殺される。
१२अहो कूशींनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मराल.
13 主はまた北に向かって手を伸べ、アッスリヤを滅ぼし、ニネベを荒して、荒野のような、かわいた地とされる。
१३नंतर परमेश्वराचा हात उत्तरेकडे हल्ला करेल आणि अश्शूरचा नाश करीन, आणि निनवेला ओसाड व रूक्ष वाळवंट असे करेल.
14 家畜の群れ、もろもろの野の獣はその中に伏し、はげたかや、やまあらしはその柱の頂に住み、ふくろうは、その窓のうちになき、からすは、その敷居の上に鳴く。その香柏の細工が裸にされるからである。
१४तेथे फक्त कळप व राष्ट्रांचे पशू तिच्यामध्ये वसतील, तिच्या खांबांवर घुबडे व पक्षी आपले घरटे करतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे त्याच्या दारापाशी ओरडतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. करण त्याने गंधसरूचे लाकडी खांब उघडे केले आहे.
15 この町は勝ち誇って、安らかに落ち着き、その心の中で、「ただわたしだけだ、わたしの外にはだれもない」と言った町であるが、このように荒れはてて、獣の伏す所になってしまった。ここを通り過ぎる者は皆あざけって、手を振る。
१५जी नगरी आधी हर्षात व भीती शिवाय जगत होती, आणि आपल्या मनात म्हणत होती की, मीच आहे आणि माझ्याबरोबरीची दुसरी कोणीच नाही, तीच ही आहे. ती आता कशी ओसाड व वनपशू बसण्याचे स्थान अशी झाली आहे! आणि तिच्याजवळून जाणारा येणारा प्रत्येकजण फुसफुसणार व आपला हात हलवणार!