< ヨシュア記 21 >
1 時にレビの族長たちは、祭司エレアザル、ヌンの子ヨシュアおよびイスラエルの部族の族長たちのもとにきて、
१तेव्हा लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएली वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे मुख्य त्यांच्याजवळ आले.
2 カナンの地のシロで彼らに言った、「主はかつて、われわれに住むべき町々を与えることと、それに属する放牧地を、家畜のために与えることを、モーセによって命じられました」。
२ते कनान देशातील शिलो येथे म्हणाले की, परमेश्वराने मोशेच्या द्वारे अशी आज्ञा दिली होती की “आम्हांला राहण्यासाठी नगरे आणि आमच्या पशूंसाठी त्यांची गायराने द्यावी.”
3 それでイスラエルの人々は、主の命にしたがって、自分たちの嗣業のうちから、次の町々と、その放牧地とを、レビびとに与えた。
३यास्तव इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वतनांतून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
4 まずコハテびとの氏族のために、くじを引いた。祭司アロンの子孫であるこれらのレビびとは、くじによって、ユダの部族、シメオンの部族、およびベニヤミンの部族のうちから、十三の町を獲た。
४तेव्हा कहाथीच्या कुळांसाठी चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांतल्या अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा व शिमोनी, बन्यामीन या वंशांच्या वाट्यातून तेरा नगरे मिळाली.
5 その他のコハテびとは、くじによって、エフライムの部族の氏族、ダンの部族、およびマナセの半部族のうちから、十の町を獲た。
५कहाथीच्या राहिलेल्या वंशजांना एफ्राइमाच्या वंशांतल्या कुळाच्या वाट्यातून व दानाच्या वंशांच्या वाट्यातून व मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून दहा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
6 またゲルションびとは、くじによって、イッサカルの部族の氏族、アセルの部族、ナフタリの部族、およびバシャンにあるマナセの半部族のうちから、十三の町を獲た。
६आणि गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार वंशातील कुळांच्या व आशेर, नफताली, बाशानात मनश्शेच्या अर्ध्या वंशांच्या नगरांपैकी तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
7 またメラリびとは、その氏族にしたがって、ルベンの部族、ガドの部族、およびゼブルンの部族のうちから、十二の町を獲た。
७मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, व गाद व जबुलून याच्या वंशांतून बारा नगरे मिळाली.
8 イスラエルの人々は、主がモーセによって命じられたとおりに、これらの町と、その放牧地とを、くじによって、レビびとに与えた。
८परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्ठ्या टाकून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
9 まずユダの部族と、シメオンの部族のうちから、次に名をあげる町々を与えた。
९त्यांनी यहूदा व शिमोन यांच्या वंशाच्या विभागातली नगरे दिली, त्यांची नावे सांगितलेली आहेत,
10 これらはレビびとに属するコハテびとの氏族の一つである、アロンの子孫に与えられた。最初のくじが彼らに当ったからである。
१०लेवी वंशातील कहाथीच्या कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी ही नगरे होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली.
11 すなわちユダの山地にあるキリアテ・アルバすなわちヘブロンおよびその周囲の放牧地を彼らに与えた。このアルバはアナクの父であった。
११त्यांना त्यांनी यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले अनाक्याचा पिता याचे नगर किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन आणि त्याची चहुकडली गायराने त्यांना दिली.
12 ただし、この町の畑と、それに属する村々とは、すでにエフンネの子カレブが、それを受けて所有していた。
१२परंतु नगराची शेतभूमी व त्याकडली खेडी यफुन्नेचा पुत्र. कालेब याला वतन करून दिली होती.
13 祭司アロンの子孫に与えたのは、人を殺した者の、のがれる町であるヘブロンとその放牧地、リブナとその放牧地、
१३त्यांनी अहरोन याजकाच्या वंशजाला हत्या करणाऱ्यासाठी आश्रयाचे म्हणून हेब्रोन नगर व त्याचे गायरान दिले, आणि लिब्ना व त्याचे गायरान;
14 ヤッテルとその放牧地、エシテモアとその放牧地、
१४आणि यत्तीर व त्याचे गायरान, आणि एष्टमोवा व त्याचे गायरान;
१५होलोन व त्याचे गायरान आणि दबीर व त्याचे गायरान;
16 アインとその放牧地、ユッタとその放牧地、ベテシメシとその放牧地など、九つの町であって、この二つの部族のうちから分け与えたものである。
१६अईन व त्याचे गायरान, आणि युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान; अशी त्या दोन वंशांतली नऊ नगरे दिली;
17 またベニヤミンの部族のうちから、ギベオンとその放牧地、ゲバとその放牧地、
१७बन्यामीन वंशातले गिबोन व त्याचे गायरान; गिबा व त्याचे गायरान;
18 アナトテとその放牧地、アルモンとその放牧地など、四つの町を与えた。
१८अनाथोथ व त्याचे गायरान, आणि अलमोन व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली.
19 アロンの子孫である祭司たちの町は、合わせて十三であって、それに属する放牧地があった。
१९अहरोन वंशातील याजकांना त्यांची तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.
20 その他のコハテびとであるレビびとの氏族は、くじによって、エフライムの部族のうちから町を獲た。
२०राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यांना एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठ्ठी टाकून नगरे दिली.
21 すなわち、その町は、人を殺したものの、のがれる町であるエフライムの山地のシケムとその放牧地、ゲゼルとその放牧地、
२१त्यांनी हत्या करणाऱ्याच्या आश्रयासाठी एफ्राइमाच्या डोंगरावरचे नगर शखेम व त्याचे गायराने त्यांना दिले; आणि गेजेर व त्याचे गायरान;
22 キブザイムとその放牧地、ベテホロンとその放牧地など、四つの町である。
२२किबसाईम व त्याचे गायरान; आणि बेथ-होरोन तिचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली;
23 またダンの部族のうちから分け与えた町は、エルテケとその放牧地、ギベトンとその放牧地、
२३दानाच्या वंशातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान;
24 アヤロンとその放牧地、ガテリンモンとその放牧地など、四つの町である。
२४अयालोन व त्याचे गायरान, गथ-रिम्मोन व त्यांचे गायरान अशी चार नगरे दिली;
25 またマナセの半部族のうちから分け与えた町は、タアナクとその放牧地、およびガテリンモンとその放牧地など、二つの町である。
२५मनश्शेच्या अर्ध्या वंशांतले तानख व गथ-रिम्मोन त्यांची गायराने, अशी दोन नगरे दिली;
26 その他のコハテびとの氏族の町は、合わせて十であって、それに属する放牧地があった。
२६बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजांना एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने दिली.
27 ゲルションびとであるレビびとの氏族の一つに与えられた町は、マナセの半部族のうちからは、人を殺した者の、のがれる町であるバシャンのゴランとその放牧地、およびベエシテラとその放牧地など、二つの町である。
२७लेवी वंशातील गेर्षोनाच्या कुळाला मनश्शेच्या दुस-या अर्ध्या वंशांतून हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर बाशानातले गोलान व त्यांचे गायरान, आणि बैश्तरा व त्यांचे गायरान अशी दोन नगरे दिली;
28 イッサカルの部族のうちからは、キションとその放牧地、ダベラテとその放牧地、
२८इस्साखार वंशातले किश्शोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान;
29 ヤルムテとその放牧地、エンガンニムとその放牧地など、四つの町である。
२९यर्मूथ व त्याचे गायरान, एन-गन्नीम व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;
30 アセルの部族のうちからは、ミシャルとその放牧地、アブドンとその放牧地、
३०आणि आशेराच्या वंशातली मिशाल व त्यांचे गायरान, अब्दोन व त्यांचे गायरान,
31 ヘルカテとその放牧地、レホブとその放牧地など、四つの町である。
३१हेलकथ व त्यांचे गायरान, आणि रहोब व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;
32 ナフタリの部族のうちからは、人を殺した者の、のがれる町であるガリラヤのケデシとその放牧地、ハンモテ・ドルとその放牧地、カルタンとその放牧地など、三つの町である。
३२नफतालीच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गालीलातले केदेश व त्यांचे गायरान, आणि हम्मोथ-दोर व त्यांचे गायरान, आणि कार्तान व त्यांचे गायरान, अशी तीन नगरे दिली.
33 ゲルションびとが、その氏族にしたがって獲た町は、合わせて十三の町であって、それに属する放牧地があった。
३३गेर्षोन्याची सर्व नगरे त्याच्या कुळांप्रमाणे तेरा नगरे व त्यांची गायराने,
34 その他のレビびとである、メラリびとの氏族に与えられた町は、ゼブルンの部族のうちからは、ヨクネアムとその放牧地、カルタとその放牧地、
३४आणि राहिलेले लेवी मरारी वंशजाच्या कुळाला जबुलूनाच्या वंशातले यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान;
35 デムナとその放牧地、ナハラルとその放牧地など、四つの町である。
३५दिम्रा व त्याचे गायरान, नहलाल व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;
36 ルベンの部族のうちからは、ベゼルとその放牧地、ヤハヅとその放牧地、
३६आणि रऊबेन वंशातले बेजेर व त्यांचे गायरान, आणि याहस व त्यांचे गायरान;
37 ケデモテとその放牧地、メパアテとその放牧地など、四つの町である。
३७कदेमोथ व त्यांचे गायरान, आणि मेफाथ व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;
38 ガドの部族のうちからは、人を殺した者の、のがれる町であるギレアデのラモテとその放牧地、マハナイムとその放牧地、
३८आणि गादाच्या वंशांतले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गिलादातले रामोथ व त्यांचे गायरान, महनाईम व त्यांचे गायरान
39 ヘシボンとその放牧地、ヤゼルとその放牧地など、合わせて四つの町である。
३९हेशबोन व त्याचे गायरान, याजेर व त्यांचे गायरान, अशी एकंदर चार नगरे दिली.
40 これらはみな、ほかのレビびとであるメラリびとが、その氏族にしたがって、くじをもって獲た町であって、合わせて十二であった。
४०लेव्यांच्या कुळातली राहिलेल्या मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांना दिली.
41 イスラエルの人々の所有のうちに、レビびとが持った町々は、合わせて四十八であって、それに属する放牧地があった。
४१इस्राएल लोकांच्या वतनातून लेव्यांना एकंदर अठ्ठेचाळीस नगरे, त्यांच्या गायरानासह दिली.
42 これらの町々は、それぞれその周囲に放牧地があった。これらの町々はみなそうであった。
४२ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार गायराने होती, असे त्या सर्व नगरांना होते.
43 このように、主が、イスラエルに与えると、その先祖たちに誓われた地を、ことごとく与えられたので、彼らはそれを獲て、そこに住んだ。
४३याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलाला जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यामध्ये राहिले.
44 主は彼らの先祖たちに誓われたように、四方に安息を賜わったので、すべての敵のうち、ひとりも彼らに手向かう者はなかった。主が敵をことごとく彼らの手に渡されたからである。
४४याप्रकारे परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेच त्यास चहूंकडून विसावा दिला, त्याच्या सर्व शत्रूंतला कोणी त्यांच्यापुढे टिकला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.
45 主がイスラエルの家に約束されたすべての良いことは、一つとしてたがわず、みな実現した。
४५परमेश्वराने इस्राएलाच्या घराण्याला दिलेल्या प्रत्येक उत्तम अभिवचनापैकी एकही पूर्ण झाल्यावाचून राहिले नाही. त्याने दिलेले प्रत्येक अभिवचन घडून आले.