< ヨシュア記 15 >
1 ユダの人々の部族が、その家族にしたがって、くじで獲た地は、南の方では、エドムの境に達し、南のはてにあるチンの荒野に及んでいた。
१यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.
2 その南の境は、塩の海の南の端の、入海から起り、
२आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.
3 アクラビムの坂の南に出てチンに進み、カデシ・バルネアの南から上って、ヘヅロンに進み、アダルに上っていって、カルカに回り、
३ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे.
4 アヅモンに進んで、エジプトの川に達し、その境は海に至って尽きる。これが彼らの南の境である。
४आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी.
5 東の境は塩の海であって、ヨルダンの川口に達する。北の方の境は、ヨルダンの川口の、入海から起り、
५आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.
6 上ってベテホグラに行き、ベテアラバの北を過ぎ、上ってルベンびとボハンの石に達し、
६मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली;
7 またアコルの谷からデビルに上って、北におもむき、川の南にあるアドミムの坂に対するギルガルに向かって進み、エンシメシの水に達し、エンロゲルに至って尽きる。
७मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.
8 またその境はベンヒンノムの谷に沿って、エブスびとの地、すなわちエルサレムの南のわきに上り、ヒンノムの谷の西にある山の頂に上る。これはレパイムの谷の北の果にあるものである。
८मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरूशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली.
9 その境は、この山の頂からネフトアの水の源に至り、その所からエフロン山の町々に及び、その境は曲ってバアラに達する。これは、すなわちキリアテ・ヤリムである。
९मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,
10 その境は、バアラから西に回って、セイル山に及び、ヤリム山、すなわちケサロンの北のわきを経て、ベテシメシに下り、テムナに進み、
१०मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.
11 エクロンの北の丘のわきに出て、シッケロンに曲り、バアラ山に進み、ヤブネルに達し、海に至って尽きる。
११मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता.
12 また西の境は大海であって、海岸を境とした。これがユダの人々の、その家族にしたがって獲た地の四方の境である。
१२आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.
13 ヨシュアは、主に命じられたように、エフンネの子カレブに、ユダの人々のうちで、キリアテ・アルバ、すなわちヘブロンを与えて、その分とさせた。アルバはアナクの父であった。
१३आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता.
14 カレブはその所から、アナクの子三人を追い払った。すなわち、セシャイ、アヒマン、およびタルマイであって、アナクから出たものである。
१४मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.
15 そして彼はこの所からデビルに住む民の所に攻め上った。デビルの名は、もとはキリアテ・セペルといった。
१५नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
16 カレブは言った、「キリアテ・セペルを撃って、これを取る者には、わたしの娘アクサを妻として与えるであろう」。
१६तेव्हा कालेब म्हणाला, “जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्यास मी आपली कन्या अखसा पत्नी करून देईन.
17 ケナズの子で、カレブの弟オテニエルがそれを取ったので、カレブは娘アクサを、妻として彼に与えた。
१७तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्यास पत्नी करून दिली.”
18 彼女がとつぐ時、畑を父に求めるようにと、オテニエルに勧められた。そして彼女が、ろばから降りたので、カレブは彼女に、何を望むのかとたずねた。
१८आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?
19 彼女は答えて言った、「わたしに贈り物をください。あなたはネゲブの地に、わたしをやられるのですから、泉をもください」。カレブは彼女に上の泉と下の泉とを与えた。
१९अखसाने उत्तर दिले, “मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या.” त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.
20 ユダの人々の部族が、その家族にしたがって獲た嗣業は、次のとおりである。
२०यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;
21 ユダの人々の部族が、南でエドムの境の方にもっていた遠くの町々は、カブジエル、エデル、ヤグル、
२१यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;
२३आणि केदेश व हासोर व इथनान;
25 ハゾル・ハダッタ、ケリオテ・ヘヅロンすなわちハゾル、
२५हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुद्धा म्हणत)
२७आणि हसर-गदा व हेष्मोन व बेथ-पेलेट;
२८आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा;
३०आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;
३१आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना;
32 レバオテ、シルヒム、アイン、リンモン。これらの町は合わせて二十九、ならびにそれに属する村々。
३२आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे.
३३तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;
३४जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम;
३५यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;
36 シャアライム、アデタイム、ゲデラ、ゲデロタイム。すなわち十四の町々と、それに属する村々。
३६आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;
३७सनान व हदाशा व मिग्दल-गाद;
३९लाखीश व बसकाथ व एग्लोन;
४०कब्बोन व लहमाम व किथलीश;
41 ゲデロテ、ベテダゴン、ナアマ、マッケダ。すなわち十六の町々と、それに属する村々。
४१गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.
44 ケイラ、アクジブ、マレシャ。すなわち九つの町々と、それに属する村々。
४४आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे.
४५एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे;
46 エクロンから海まで、すべてアシドドのほとりにある町々、およびそれに属する村々。
४६एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.
47 アシドドとその町々および村々。ガザとその町々および村々。エジプトの川と大海の海岸までが、その境であった。
४७अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.
४८आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;
४९दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर;
51 ゴセン、ホロン、ギロ。すなわち十一の町々と、それに属する村々。
५१आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी,
५३यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका,
54 ホムタ、キリアテ・アルバすなわちヘブロン、ヂオル。すなわち九つの町々と、それに属する村々。
५४हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.
५५मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,
५६इज्रेल व यकदाम व जानोहा,
57 カイン、ギベア、テムナ。すなわち十の町々と、それに属する村々。
५७काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.
५८हल्हूल, बेथ-सूर व गदोर,
59 マアラテ、ベテアノテ、エルテコン。すなわち六つの町々と、それに属する村々。
५९माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
60 キリアテ・バアルすなわちキリアテ・ヤリム、ラバ。これらの二つの町とそれに属する村々。
६०किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.
६१रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
62 ニブシャン、塩の町、エンゲデ。すなわち六つの町々と、それに属する村々。
६२आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
63 しかし、ユダの人々は、エルサレムの住民エブスびとを追い払うことができなかった。それでエブスびとは今日まで、ユダの人々と共にエルサレムに住んでいる。
६३तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरूशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.